कापसाचा नवीन हंगाम (२०१९-२०) सुरू होऊन जवळपास दोन महिने संपायच्या बेतात आहेत, परंतु आज सु
बातम्या
वॉटर कप स्पर्धेत चिंचोली बार्शी तालुक्यात प्रथम
गावाच्या सर्वांगीण विकासाच्या दिशेने हे पहिले पाऊल आहे. गावाचा शाश्वत विकास करण्यासाठी आपल्याला अजून खूप पल्ला गाठायचा आहे. भविष्यातील सर्व प्रयत्नांसाठी समान ऐक्य, समर्पण आणि दृढ निश्चय करून गावाचा सर्वांगीण विकास साधू.
- डी. टी. शिंदे (ग्रामस्थ, चिंचोली)
पांगरी : सत्यमेव जयते वॉटर कप २०१९ मध्ये सहभागी झालेल्या चिंचोली (ता. बार्शी) गावाने तालुकास्तरीय पाणी फांउडेशन स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकाविले. दहा लाख रुपये, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे बक्षिसाचे स्वरूप आहे. राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग घेऊन गावासाठी मिळालेले हे पाहिलेच मोठे बक्षीस ठरले आहे.
गावकऱ्यांनी ५० दिवस श्रमदानातून गाव पाणीदार करण्यासाठी प्रयत्न केले. पुणे येथील बालेवाडी शिवछत्रपती क्रीडा संकुलात पाणी फांउडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ, मार्गदर्शक डॉ. अविनाश पोळ यांच्या हस्ते ग्रामस्थांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांनतर ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
या स्पर्धेसाठी फांउडेशनचे जिल्हा समन्वयक अधिक जगदाळे, तालुका समन्वयक नितीन आतकरे, मेघा शिंदे, नेहा आतगुडे, सुयश शिंदे, स्नेहल वाघमोडे, कोमल जगताप, सतीश लोटेकर आदींच्या टीमने वेळोवेळी भेट देऊन मार्गदर्शन केले. या वेळी पोलिस अधीक्षक डी. टी. शिंदे, डॉ. सुधीर शिंदे, उद्योजक संतोष शिंदे, माजी नगरसेवक शिवाजी पाडूळे, श्रीहरी शिंदे, धनंजय शिंदे, बाबासाहेब शिंदे आदी उपस्थित होते.
- 1 of 914
- ››