agriculture news in Marathi chinnor rice will get GI Maharashtra | Agrowon

चिन्नोर तांदळाला मिळणार `जीआय' 

टीम अॅग्रोवन
रविवार, 26 एप्रिल 2020

भंडारा जिल्ह्यातील भात लागवड क्षेत्राचा विचार करता चिन्नोर जातीचा वाटा १५ ते २० टक्के आहे. शेतकरी गट आणि शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून संवर्धन आणि बीजोत्पादन करीत आहोत. चांगल्या प्रतीचा तांदूळ तयार करून राज्य, परराज्यातील बाजारपेठ मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. जीआय नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या तांदळाला जागतिक ओळख मिळेल. 
- हिंदूराव चव्हाण, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, भंडारा 

पुणे ः राज्यातील भाताचे कोठार अशी भंडारा जिल्ह्याची ओळख. या जिल्ह्यातील शेतकरी भाताच्या विविध जातींचे उत्पादन घेतात. त्याचबरोबरीने येथील शेतकऱ्यांनी चिन्नोर ही भाताची सुवासिक आणि चवदार स्थानिक जात देखील जपली आहे. या जातीची भौगोलिक निर्देशांक मानांकनासाठी (जीआय) अर्ज प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली. येत्या काळात याचा शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा होणार आहे. आज जागतिक बौधिक संपदा दिवसाच्या निमित्ताने राज्याला मिळालेली ही भेटच म्हणावे लागेल. 

याबाबत माहिती देताना भौगोलिक निर्देशांक विषयातील अभ्यासक गणेश हिंगमिरे म्हणाले की, भंडारा हा परंपरागत भात उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भाताच्‍या सुधारित आणि संकरित जातींच्या लागवडीबरोबर चिन्नोर या सुवासिक,चवदार जातीचे चांगल्या प्रकारे संवर्धन केले आहे. गेल्या दीड वर्षांपासून आम्ही या जातीची वैशिष्टे तसेच गॅझेटियरमधील नोंदीचा अभ्यास केला. सध्या स्थानिक बाजारपेठेत हा तांदूळ विकला जातो. 

सुवासिकपणा आणि चव लक्षात घेता देश, विदेशात या तांदळाला चांगली मागणी वाढू शकते. शेतकऱ्यांनादेखील किफायतशीर दर मिळू शकतो. हे लक्षात घेऊन आम्ही भंडारा चिन्नोर धान उत्पादक संघ आणि कृषी विभागाच्या मदतीने या जातीच्या भौगोलिक निर्देशांक मानांकनासाठी अर्ज प्रक्रिया पूर्ण केली. आत्तापर्यंत महाराष्ट्रातील विविध भागाची ओळख असलेल्या वैशिष्टपूर्ण २७ शेतमालांना जीआय मिळाला आहे. जीआय मिळविण्यामध्ये महाराष्ट्र राज्य देशात प्रथम क्रमांकावर आहे. जीआय नोंदणीचा फायदा म्हणजे शेतमालाची वेगळी ओळख तयार होते, त्याचबरोबरीने शेतकऱ्यांना चांगला दर मिळतो. 

सुवासिक अन् चवदार चिन्नोर... 
भंडारा चिन्नोर धान उत्पादक संघाचे अध्यक्ष अनिल मेंढे म्हणाले की, चिन्नोर ही आमच्या भागातील पारंपरिक जात. याचा तांदूळ सुवासिक आणि चवदार आहे. त्यामुळे ग्राहकांच्याकडून चांगली मागणी असते. सध्या बाजारपेठेत सरासरी ६० ते ७० रुपये किलो दर मिळतो. या जातीच्या संवर्धनासाठी आम्ही शेतकरी संघ तयार केला. सध्या संघातील शेतकऱ्यांचे चिन्नोर जातीखाली सुमारे ३५ एकर क्षेत्र आहे. प्रयोगशील शेतकरी राजेश गायधने,संजय एकापुरे,अनिल ब्राम्हणकर आणि गटातील शेतकऱ्यांच्या सहकार्याने बीजोत्पादन तसेच तांदूळ विक्रीचे नियोजन आहे. जीआय मिळाल्यानंतर हा तांदूळ देश- विदेशात पोहोचेल, शेतकऱ्यांना देखील चिन्नोर जातीच्या लागवडीतून फायदा होईल. 

वैशिष्टे ः 
- उंच वाढणारी जात. 
- १३५ ते १४५ दिवसांचा कालावधी. 
- एकरी सरासरी १२ ते १५ क्विंटल उत्पादन. 
- पेंढा हा जनावरांसाठी चांगला चारा. 

 


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे महावितरणचे...सोलापूर ः महावितरणच्या अकलूज, पंढरपूर व...
वळण योजना प्रकल्प पूर्ण करा : भुजबळनाशिक : ‘‘जिल्ह्यातील पाणी पश्चिमेकडे वाहून...
कृषीकन्येकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शनबदलापूर (जि.ठाणे) ः कृषी कार्यानुभव...
मालेगावात कांदा निर्यातबंदीच्या...मालेगाव, जि. नाशिक : गेल्या महिन्यात कांद्याला...
सोलापुरातील शेतकऱ्यांनो कृषी...सोलापूर : यंदाच्या वर्षासाठीची कृषी यांत्रिकीकरण...
जीवामृत निर्मितीचे प्रात्यक्षिकनशिराबाद, जि. बुलडाणाः येथील कृषीकन्या भाग्यश्री...
हिंगोलीतील सहा मंडळात अतिवृष्टीहिंगोली :जिल्ह्यात मंगळवारी (ता.२२) सकाळी...
द्राक्ष उत्पादकांची व्यापारी,...नाशिक : सुमारे ९५ टक्के द्राक्ष व्यापारी हे...
जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादकांना विमा...जळगाव : शेतकरी प्रश्‍नी शरद जोशी प्रणित शेतकरी...
दुधना नदीला पूर, पिकांत पाणीच पाणीपरभणी : सेलू तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील निम्न...
उदगीरमधील ‘देवर्जन’ सात वर्षांनंतर भरलाउदगीर : देवर्जन (ता. उदगीर) येथील मध्यम...
बीड, लातूरमधील मंडळांत दमदार पाऊसऔरंगाबाद : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद,...
गिरणा पट्ट्यात पूर ओसरताच वाळूचा उपसा...जळगाव : गिरणा परीसरातील शेतकऱ्यांना पूर,...
सेस रद्द करा, अन्यथा बंद पुकारूपुणे ः केंद्र सरकारच्या कृषी आणि पणन विषयक तीन...
जळगावात बाजार समित्या बरखास्तीचे राजकारणजळगाव ः जिल्ह्यात दोन्ही काँग्रेस, शिवसेनेची...
शेतकऱ्यांसाठी सुखावणारा कायदा ः...कोल्हापूर ः शेती उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य...
बुलडाण्यात दहा हजार हेक्टरवर क्षेत्र...बुलडाणा ः जिल्ह्यात शनिवार (ता. १९) व रविवारी (ता...
सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने...सिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागाला सोमवारी (ता...
अखेर ६६५ शेतकऱ्यांना विम्याचा लाभअकोला ः  सन २०१९ च्या खरीप हंगामात पंतप्रधान...
संत्रा वाहतुकीसाठी रेल्वेकडून वरूड...अमरावती : किसान रेल्वेच्या माध्यमातून येत्या...