चिपळूणचा पोल्र्टी उद्योग पूर्वपदावर

चिपळूण, जि. रत्नागिरी : कोरोनाच्या अफवांमुळे संकटात सापडलेल्या पोल्ट्री उद्योगाला पुन्हा चांगले दिवस आले आहेत.
Chiplun's poultry industry in the forefront
Chiplun's poultry industry in the forefront

चिपळूण, जि. रत्नागिरी : कोरोनाच्या अफवांमुळे संकटात सापडलेल्या पोल्ट्री उद्योगाला पुन्हा चांगले दिवस आले आहेत. चिपळूणच्या किरकोळ बाजारातील चिकनचा दर पुन्हा १८० ते २०० रुपयांवर पोहोचला आहे. तर, पोल्ट्रीला मिळणारा दर १०० रुपयांपर्यंत गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सध्या घाऊक बाजारात अंड्यांचे दरही वधारले आहेत. प्रतिडझन ७० रुपये भावाने त्यांची विक्री होत आहे.

अफवांमुळे फेब्रुवारी-मार्च महिन्यांत पोल्ट्रीतील प्रतिकिलोचा चिकनचा दर ८० रुपयांवरून २० रुपयांपर्यंत उतरला. मात्र, खर्च ६५ ते ७० रुपयांदरम्यान असताना किमती कमी झाल्याने व्यावसायिकांना तोटा सहन करावा लागला. त्यात लॉकडाऊन लागू झाल्यानंतर आधीच नुकसानात गेलेल्या व्यावसायिकांनी नवीन उत्पादन घेतले नाही. मात्र, अद्यापही चिकन पुरवठा सुरळीत झालेला नाही.

कोरोनाआधीच्या काळाच्या तुलनेत मागणी ८५ टक्क्यापर्यंत आली आहे. तर, उत्पादन मात्र ७० ते ७५ टक्क्यापर्यंतच आहे. परिणामी, मागणी आणि पुरवठ्यात १० ते १५ टक्क्यांचे अंतर आहे. त्यामुळे चिकनच्या दरात वाढ झाली, अशी माहिती पोल्ट्री व्यावसायिक विराज साळुंखे यांनी दिली. 

कोरोनाच्या अफवांमुळे पोल्ट्री उत्पादकांचे अतोनात नुकसान झाले. टाळेबंदीदरम्यान अनेकांनी पोल्ट्री उत्पादन बंद ठेवले. उत्पादकांकडे खाद्य, कामगार आणि भांडवल यांची कमतरता असल्यानेही उत्पादन घटल्याचे साळुंखे यांनी सांगितले.

कोरोनापूर्व काळात दरमहिना सरासरी दीड लाख कोंबड्यांची विक्री चिपळूण तालुक्यात होत होती. मात्र, सध्या सव्वालाख कोंबड्यांचा पुरवठा होत आहे. चिकन आणि अंडी यांमधून मोठ्या प्रमाणात प्रथिने मिळत असल्याने सक्षम आरोग्यासाठी नागरिकांकडून त्यांना मागणी वाढली आहे. त्यामुळे दरात वाढ झाली आहे, अशी माहिती चिकन व्यवसायिक यासीन कुरैशी यांनी  दिली.

टाळेबंदी शिथिलीकरणाच्या पाचव्या टप्प्यात राज्य सरकारने हॉटेल, उपाहारगृहे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. उपाहारगृहे सुरू झाल्यास चिकनची मागणी आणखी वाढणार आहे. पुरवठा सुरळीत न झाल्यास दरात वाढीची शक्यता आहे. याचा फायदा टाळेबंदी काळात व्यवसाय ठप्प झालेल्या पोल्ट्री उत्पादकांना होईल. नुकसान काही प्रमाणात भरून निघण्यास मदत मिळेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com