चिपी आंतरराष्ट्रीय विमानतळ व्हायला हवे : उद्धव ठाकरे

चिपी विमानतळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला गती प्राप्त होणार आहे. भविष्यात हे विमानतळ आंतरराष्ट्रीय व्हायला हवे. विकासात कुणीही राजकारण आणू नये,’’ असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
चिपी आंतरराष्ट्रीय विमानतळ व्हायला हवे : उद्धव ठाकरे Chippewa should be an international airport: Uddhav Thackeray
चिपी आंतरराष्ट्रीय विमानतळ व्हायला हवे : उद्धव ठाकरे Chippewa should be an international airport: Uddhav Thackeray

सिंधुदुर्गनगरी : ‘‘चिपी विमानतळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला गती प्राप्त होणार आहे. भविष्यात हे विमानतळ आंतरराष्ट्रीय व्हायला हवे. विकासात कुणीही राजकारण आणू नये,’’ असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.  बहुचर्चित चिपी (ता. वेंगुर्ला) विमानतळाचे उद्‍घाटन शनिवारी (ता. ९) मुख्यमंत्री ठाकरे आणि केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादीत्य शिंदे यांच्या हस्ते झाले. शिंदे दिल्ली येथून दूरदृश्‍यप्रणालीद्वारे उपस्थित होते. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नारायण राणे, केंद्रीय मंत्री, रामदास आठवले, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री, सुभाष देसाई, परिवहनमंत्री अनिल परब, पालकमंत्री उदय सामंत, कृषिमंत्री दादा भुसे, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, खासदार अनिल देसाई, खासदार अरविंद सावंत, खासदार विनायक राऊत, जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, आमदार नीतेश राणे, वीरेंद्र म्हसकर आदी उपस्थित होते.  मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, ‘‘जिल्ह्यात गडकिल्ले, निळाशार समुद्र आणि एकापेक्षा एक शेकडो पर्यटन स्थळे आहेत. चिपी विमानतळामुळे जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला गती प्राप्त होणार आहे. देशासह जगभरातून जिल्ह्यात पर्यटक येतील, अशा सुविधा निर्माण केल्या जातील. जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळे पाहण्यासाठी चिपी विमानतळावर हेलिकॉप्टर सेवा उपलब्ध केल्यास पर्यटन अधिक बहरेल.’’ 

नारायण राणेंना ठाकरी फटकारे  केंद्रीय मंत्री राणे यांनी केलेल्या राजकीय टीका-टिप्पणीचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला. ठाकरे म्हणाले, ‘‘आजचा दिवस आदळआपट करण्याचा नाही. तर कोकणच्या विकासाचा महत्त्वाचा टप्पा पार करणारा आणि आनंदाचा आहे. विकासाच्या वल्गना करणाऱ्यांनी इतकी वर्षं चिपी विमानतळ सुरू होण्यास का उशीर लावला? अशी थेट विचारणाच केली. सिंधुदुर्ग किल्ला छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधला. पण काही जण हा किल्लाही मीच बांधला, असे म्हणतील. येथील जनता हुशार आहे, ती विकास करणाऱ्यांना निवडून देते.’’ अशा शब्दांत राणेंच्या आरोपांचा ठाकरेंनी समाचार घेतला. 

ज्योतिरादित्य शिंदे यांचे कौतुक  केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे तळमळीने बोलतात. महाराष्ट्राच्या मातीचे संस्कार ते विसरलेले नाहीत, अशा शब्दांत ठाकरे यांनी त्यांचे कौतुक केले. तर राणेचे नाव न घेताच काही लोक मळमळीने बोलतात. विकासात कुणीही राजकारण आणू नये, असेही ठाकरे म्हणाले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com