असे तयार करा कारल्यापासून चिप्स, रस

कारले चवीने कडू असले तरी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. कारल्याचा उपयोग फळभाजी बरोबरच औषधातही केला जातो. कारल्यामध्ये मोमॉर्डिका १, मोमॉर्डिका २ आणि कुकुरबिटासीन बी हे न्युट्रासिटीकल्स असतात.
 chips and juice from bitter gourd
chips and juice from bitter gourd

कारले चवीने कडू असले तरी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. कारल्याचा उपयोग फळभाजी बरोबरच औषधातही केला जातो. कारल्यामध्ये मोमॉर्डिका १, मोमॉर्डिका २ आणि कुकुरबिटासीन बी हे न्युट्रासिटीकल्स असतात. क्रिस्पी चिप्स - साहित्य  कारली, लाल मिरची पूड, मीठ, चाट मसाला, आमचूर पावडर, हळद, तेल कृती

  • प्रथम कारली धुवून पुसून घ्यावी. त्यातील बिया काढून बोटाएवढ्या लांबीचे पातळ उभे काप करावेत. नंतर हे काप मीठ व हळद घातलेल्या उकळत्या पाण्यात टाकावेत. पाच मिनिटे चांगले उकळू द्यावेत. पाच मिनिटांनंतर गॅस बंद करावा. आता हे काप चाळणीवर काढून त्यावर थंड पाणी ओतावे. तसेच चाळणीवर निथळत राहू द्यावेत.
  • पाणी पूर्ण निथळल्यानंतर कापड किंवा पेपरवर पसरवून पूर्ण कोरडे होऊ द्यावेत. नंतर गरम तेलात मंद आचेवर तांबूस गुलाबी रंग येईपर्यंत काप तळून टिश्यू पेपरवर काढावेत. तळलेल्या कापांवर चवीनुसार तिखट, मीठ, मसाला व आमचूर पावडर टाकावी. असे मस्त कुरकुरीत चिप्स तयार करता येतात.
  • रस 

  • कमीत कमी दोन कारली स्वच्छ धुऊन चिरून घ्यावी. त्यामध्ये पाणी टाकून हे मिश्रण मिक्सरमधून चांगले बारीक करून घ्यावे.
  • तयार मिश्रण गाळून त्याचा रस काढावा. या रसाचे सेवन करण्यापूर्वी त्यामध्ये अर्धे लिंबू पिळून चिमूटभर मीठ टाकावे. त्यामुळे त्याचा कडूपणा कमी होतो.
  • संपर्क - गणेश गायकवाड, ९८५०२३६३८० (अन्नतंत्र महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com