चित्ते नदी पुनरुज्जीवनाने वेधले देशाचे ‘चित्त’ 

ग्रामविकास संस्थेतर्फे राबविण्यात आलेल्या चित्ते नदी पुनरुज्जीवन अभियानाची राष्ट्रीयस्तरावर दखल घेऊन देशभरातील स्वयंसेवी संस्थेचा सर्वोच्च राष्ट्रीय तृतीय जल पुरस्कार जाहीर झाला आहे.
chitte River revives the country's 'chitt'
chitte River revives the country's 'chitt'

औरंगाबाद : ग्रामविकास संस्थेतर्फे राबविण्यात आलेल्या चित्ते नदी पुनरुज्जीवन अभियानाची राष्ट्रीयस्तरावर दखल घेऊन देशभरातील स्वयंसेवी संस्थेचा सर्वोच्च राष्ट्रीय तृतीय जल पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्रीय जलशक्तीमंत्री गजेंद्र सिंह शेखावत यानी शुक्रवारी (ता. ७) या पुरस्काराची घोषणा केली. जलसमृद्ध भारत, ही संकल्पना साध्य करण्यासाठी भारत सरकारतर्फे देशभरातील जल क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या विविध स्वयंसेवी संस्था, संघटना, उद्योग, व्यक्तीचा राष्ट्रीय पातळीवर सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन गौरविण्यात येते. 

बावीस वर्षांपासून ‘जलयज्ञ’  ग्रामविकास संस्था २२ वर्षांपासून मराठवाडा व नाशिक विभागांत दुष्काळ निवारणासाठी कार्यरत आहे. संस्थेतर्फे चित्ते नदी पुनरुज्जीवन अभियान, जल फेरभरण अभियान, पाणलोट क्षेत्र विकास प्रकल्प, जलस्वराज्य, आपलं पाणी, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल, शिवकालीन पाणीसाठवण योजना, आदर्श गाव, इत्यादी प्रकल्पाच्या माध्यमातून मराठवाड्यातील २००पेक्षा अधिक गावे जलसमृद्ध करण्याचे मोलाचे काम केले गेले आहे. 

‘ॲग्रोवन’ने घेतली होती प्रथम दखल  ‘ॲग्रोवन’ने संस्थेने केलेल्या कार्याचा लेखाजोखा सर्व प्रथम मांडला होता. या पुरस्काराचे श्रेय संस्थेचे अध्यक्ष जयश्री हदगल, सचिव नरहरी शिवपुरे यांनी चित्ते नदी खोऱ्यातील ग्रामस्थ, संस्थेचे कार्यकर्ते, प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मदत करणारे समाजातील सर्व घटकांना दिले आहे. हा पुरस्कार नवी दिल्ली येथे जलशक्तीमंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या प्रमुख उपस्थितीत दिला जाणार आहे. 

प्रतिक्रिया 

लोकसहभागातून राबविण्यात आलेल्या चित्ते नदी पुनरुज्जीवन अभियानामुळे पंधरा हजार कुटुंबाच्या घरात जलसमृद्धी आलेली आहे. फळबागा, दुग्ध व्यवसाय, थेट शेतीमाल विक्रीमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले आहे. स्थानिक पातळीवर सर्वांना रोजगार उपलब्ध झालेला आहे. या कामात व पुरस्कारात ‘सकाळ माध्यम समूह’ व ‘ॲग्रोवन’ दैनिकाचे मोलाचे सहकार्य राहिले आहे. 

-नरहरी शिवपुरे, सचिव, ग्रामविकास संस्था औरंगाबाद 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com