शेती, शेतकऱ्यांचे हित जपणारे सरकार निवडा : पवार

शेती, शेतकऱ्यांचे हित जपणारे सरकार निवडा : पवार
शेती, शेतकऱ्यांचे हित जपणारे सरकार निवडा : पवार

फलटण, सातारा : ‘‘लोकसभा निवडणुकीकडे जगाचे लक्ष लागले आहे. सत्ताधाऱ्यांकडून देशातील लोकशाही उद्‌ध्वस्त करण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळे लोकशाही टिकून आहे. देशाच्या प्रगतीच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात एकही औद्योगिक वसाहत उभी राहिली नाही. शेतकऱ्यांच्या हिताची कोणतीही भूमिका न घेता या सरकारला खाणाऱ्याची काळजी असल्याचे दिसून येते. शेती व शेतकऱ्यांचे हित जपणारे सरकार निवडून आणा,’’ असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीसह मित्र पक्षाचे उमेदवार संजय शिंदे यांच्या प्रचारार्थ फलटणमधील जाहीर सभेत पवार बोलत होते. पवार म्हणाले, ‘‘आमच्या हातात राज्य असताना पशुधन वाचविले. मात्र, आजच्या राज्यकर्त्यांना त्याची किंमत नाही. दुष्काळाशी सामना करताना काय तयारी करावी लागते, याची जाणीव नसल्याने राज्यकर्ते गोंधळून गेले आहेत. तथापि सत्तेत असताना युवकांच्या हाताला काम देण्यासाठी आम्ही उद्योग सुरू केले; पण आजची स्थिती पाहता मोदींच्या काळात एकही औद्योगिक वसाहत सुरू झाली नाही. युवकांना नवीन नोकऱ्या नाहीत, हे वास्तव आहे. शेती पिकविण्यासाठी भांडवल लागते; पण थकबाकी हीच मोठी चिंता आहे. पंतप्रधान मोदी यांनी अकलूजच्या सभेत दुष्काळी परिस्थिती, शेतकरी, उद्योगधंद्याबाबत एक शब्दही न बोलता माझ्याबाबत बोलत राहिले.’’ रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले, ‘‘निवडणूक प्रचारादरम्यान अफवा पसरवल्या जात आहेत. त्याला खतपाणी न घालता भाजपचा उमेदवार माझा पुतण्या नाही हे वास्तव आहे. त्यातच यांचे वडील हिंदूराव नाईक- निंबाळकर १९९६ ला आमच्या चुकीमुळे खासदार झाले. विकृत विचारसरणीच्या या उमेदवाराला २००९ मध्ये ताकद दिली नसती, तर स्वराज दुधाचे ३/१३ वाजले असते. अशा स्थितीत हाच माणूस आम्हाला विरोध करतो तेव्हा आम्ही बांगड्या भरल्या नाहीत. या माणसाच्या दूध डेअरीवर ३२० कोटी रुपये इतके कर्ज आहे.’’  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com