चोपडा, अमळनेर बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याची नगण्य आवक

चोपडा, अमळनेर बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याची नगण्य आवक
चोपडा, अमळनेर बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याची नगण्य आवक

जळगाव ः देशी व काबुली प्रकारच्या हरभऱ्याचे दर स्थिर असून, चोपडा, अमळनेर या आघाडीच्या बाजार समित्यांमध्येही नगण्य आवक होत आहे. देशी हरभऱ्याचे दर प्रतिक्विंटल ४१०० ते ४३५० रुपये आणि काबुली हरभऱ्याचे दर ६३०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोचले आहेत. या दोन्ही प्रकारच्या हरभऱ्याच्या दरात मागील ८- १० दिवसांत क्विंटलमागे फारशी सुधारणा झालेली नाही.  शासकीय खरेदी बंद झाली आहे. जळगाव जिल्ह्यात ११ केंद्रात खरेदी सुरू होती. परंतु, या केंद्रात आवक हवी तशी नव्हती. अनेक शेतकऱ्यांनी मार्चमध्येच हरभऱ्याची विक्री केली आहे. मार्चमध्ये दर ३७०० ते ४१०० रुपये असे होते. काबुली हरभऱ्यास प्रतिक्विंटल कमाल ६००० रुपये दर होते. परंतु मे महिन्याच्या मध्यानंतर दर स्थिरावले व सरत्या आठवड्यात दरात सुधारणा झाली आहे. दर स्थिर असले तरी चोपडा व अमळनेर बाजारात मिळून प्रतिदिन २०० क्विंटलदेखील हरभऱ्याची आवक होत नसल्याची स्थिती आहे. कारण, शेतकऱ्यांकडे हरभरा नाही. सध्या मोठ्या बाजार समित्यांमधील खरेदीदार व व्यापारी, यांच्यात हरभऱ्याचे व्यवहार सुरू आहेत. तर मुक्ताईनगर येथेही मागील आठवड्यात हरभऱ्याची फारशी आवक झाली नाही. 

काबुली हरभऱ्याचीदेखील शून्य आवक काबुली हरभऱ्याचे दर ६३०० रुपये प्रतिक्विंटलपेक्षा अधिक आहेत. या हरभऱ्याचीदेखील चोपडा, अमळनेर बाजारात सध्या आवक सुरू नाही. शिरपूर (जि. धुळे) येथील बाजारातून व्यापारी त्याची इंदूर, बडवानी (मध्य प्रदेश), बडोदा, सुरत (गुजरात) येथील खरेदीदारांना विक्री करीत आहेत, अशी माहिती मिळाली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com