`चोसाका’ वसाहत दोन वर्षांपासून अंधारातच

चोपडा, जि.जळगाव: तब्बल सव्वादोन वर्षांपासून वसाहतीचा वीजपुरवठा खंडित केला आहे. यामुळे वसाहतीमधील जवळपास ५५ ते ६० कुटुंबांचे जगणे अंधारात सुरू आहे.
The Chosaka colony has been in darkness for two years
The Chosaka colony has been in darkness for two years

चोपडा, जि.जळगाव : चहार्डी (ता.चोपडा) येथील चोपडा सहकारी साखर कारखान्यातील काही कामगारांचे कुटुंब कारखाना परिसरातील वसाहतीत वास्तव्यास आहेत. या वसाहतीचे दोन लाख ५४ हजार रुपयांचे वीजबिल थकविल्याने वीज वितरण कंपनीने ७ मे २०१८ म्हणजे तब्बल सव्वादोन वर्षांपासून वसाहतीचा वीजपुरवठा खंडित केला आहे. यामुळे वसाहतीमधील जवळपास ५५ ते ६० कुटुंबांचे जगणे अंधारात सुरू आहे.

‘चोसाका’ने आर्थिक स्थिती कमकुवत असल्याने वीजबिल थकविले आहे. मात्र, या प्रकाराने वसाहतीत वीज नाही, पाणीही नसल्याने कुटुंबांचे हाल होत आहेत. यात कामगारांना पगारही नाही. एकप्रकारे कामगार मरणयातना सोसत आहेत. विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही परिणाम होत आहे. चोपडा येथील सहकारी साखर कारखाना चहार्डी-वेले या रस्त्यालगत चहार्डीपासून तीन किलोमीटर अंतरावर आहे. कारखान्याच्या परिसरात कामगारांसाठी राहण्यासाठी जवळपास दोनशे घरे बांधलेली आहेत.

सध्या कारखाना बिकट परिस्थितीत असल्याने अनेक कामगार काम सोडून गेले आहेत. उर्वरित जवळपास ५५ ते ६० कुटुंबे राहत आहेत. मात्र, या कुटुंबांना अंधारात राहावे लागत आहे.  वीजच नसल्याने कारखान्याच्या कूपनलिकांमधील मोटारी बंद आहेत. ७ मे २०१८ पासून वीजपुरवठा खंडित होता. यात फक्त जेमतेम एक महिनाभर वीजपुरवठा सुरळीत केला. त्यानंतर वीजपुरवठा पुन्हा खंडित झाला. तो अजूनही खंडित असल्याने जगणे मुश्कील झाले आहे.

कारखान्याकडून वीज बिल भरले जात नसेल, तर चहार्डीकडून सिंगल फेज वीजपुरवठा करून प्रत्येक घरास स्वतंत्र मीटर बसवून पुरवठा करावा. वीज बिल आम्ही भरू. मात्र, वीज द्या, अशी मागणी कामगारांनी तत्कालीन आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्याकडे केली. वैयक्तिकरीत्या कर्मचारी वीजबिल भरण्यास तयार असूनही, वीज द्या, अशी आर्त हाक कामगार देत असताना या प्रकाराकडे दुर्लक्ष होत आहे.

कामगारांना पगार तर मिळतच नाही. तसेच पिण्याचे पाणीही शेजारील तीन किलोमीटर अंतरावरून चहार्डी आणि वेले या गावाहून आणावे लागत आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com