agriculture news in marathi, 'Chowkidars' are for rich people : Priyanka Gandhi | Agrowon

शेतकऱ्यांचे नाही, तर श्रीमंतांचे चौकीदार : प्रियांका गांधी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 मार्च 2019

प्रयागराज, उत्तर प्रदेश : "गेल्या काही काळापासून शेतकरी अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कोणीही पुढे येत नाही. चौकीदार हे शेतकऱ्याचे नाही तर श्रीमंतांचे असतात. असे असताना केंद्र सरकार उद्योगपती मित्रांसाठी हजारो-कोट्यवधी रुपये देत आहे,’’ अशी टिका कॉंग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी येथे केली. 

प्रयागराज, उत्तर प्रदेश : "गेल्या काही काळापासून शेतकरी अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कोणीही पुढे येत नाही. चौकीदार हे शेतकऱ्याचे नाही तर श्रीमंतांचे असतात. असे असताना केंद्र सरकार उद्योगपती मित्रांसाठी हजारो-कोट्यवधी रुपये देत आहे,’’ अशी टिका कॉंग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी येथे केली. 

लोकसभेच्या रणधुमाळीला रंग चढत असून कॉंग्रेसच्या सरचिटणीस श्रीमती गांधी यांच्या उत्तर प्रदेश दौऱ्याला सोमवार (ता.१८) पासून प्रारंभ झाला आहे. प्रयागराज येथे हनुमान मंदिरात दर्शन घेऊन संगम येथे पूजा केली. त्यानंतर क्रूझ बोटीतून प्रयागराजहून वाराणसीकडे त्या तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी रवाना झाल्या. बोटीतून दौरा सुरू करण्यापूर्वी प्रियांका गांधी यांनी दुमदुमा घाट येथे उपस्थितांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी मोदी सरकारच्या धोरणावर जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या, "चौकीदार हे शेतकऱ्यांचे नाही तर श्रीमंतांचे असतात. राज्यातच नाही तर देशात अनेक ठिकाणी पिकांना हमीभाव मिळत नसल्याचे चित्र आहे. आज देश आणि देशाची घटना संकटात आहे.’’

मोदींच्या मतदारसंघात... 
प्रयागराज ते वाराणसी हे शंभर किलोमीटरचे अंतर बोटीतून पार करण्यात येणार आहे. वाराणसी हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ आहे. उत्तर प्रदेशात कॉंग्रेसची स्थिती मजबूत करण्यासाठी प्रियांका यांचा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे.


इतर ताज्या घडामोडी
पुण्यातील लॉकडाउनमुळे  साताऱ्यातील...सातारा  ः जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीमाल...
नगर जिल्ह्यातून पुण्याला होणारा ...नगर ः ‘कोरोना’चा संसर्ग वाढत असल्याने सोमवारी...
सोलापुरातून पुण्यात होणारा ७०० टन ...सोलापूर  ः ‘कोरोना’मुळे पुण्यात पुन्हा...
पुणे, पिंपरी-चिंचवडमधील टाळेबंदी...पुणे  ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर पुणे आणि...
लातुरात मनसे कार्यकर्त्यांनी कृषी...लातूर ः गेल्या काही दिवसांपासून महाबीजसह खासगी...
मका खरेदी न केल्याने संग्रामपूरमध्ये...संग्रामपूर, जि. बुलडाणा ः शासनाच्या भरड धान्य...
अकोला कृषी विद्यापीठाने ‘प्रमोटेड कोविड...अकोला  ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी...
उजनी धरण दोन दिवसांत प्लसमध्ये येणारसोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
सातारा जिल्ह्यात ९३ टक्के पीककर्ज वितरण सातारा ः कोरोनामुळे संथगतीने सुरू असलेली पीक...
धुळे जिल्ह्यात लष्करी अळी...देऊर, जि.धुळे : देऊर (ता.धुळे) सह तालुक्यात...
सुरवाडे परिसरात अतिमूसळधार पाऊस जळगाव : बोदवड तालुक्यातील सुरवाडे खुर्द परिसरात...
निसर्ग चक्रीवादळबाधित वीज ग्राहकांचा...मुंबई : निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या वीज...
नामपूर बाजार समितीत ‘रयत’चे आंदोलन नामपूर, जि. नाशिक :  कांदा व डाळिंब उत्पादक...
नांदेडमध्ये सव्वा दोन लाख क्विंटलवर...नांदेड : जिल्ह्यात कोरोना साथीमध्ये राज्य सहकारी...
मका, चारा, कडवळ पिकावर हिरव्या...औरंगाबाद  : तालुक्यातील आडगाव, निपाणी,...
पीक कर्जवाटपात व्यापारी बॅंकांचा ‘ना’...औरंगाबाद : मराठवाड्यात जुलैच्या पहिल्या...
मराठवाड्यातील पावसाचा जोर कमीऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात बुधवारी (...
मका पिकासाठी ठिबक सिंचनमका लागवडीसाठी गादी वाफ्याची रुंदी ७५ सेंमी आणि...
नियोजन आडसाली ऊस लागवडीचेलागवड १५ जुलै ते १५ ऑगष्टपर्यंत करावी.जोडओळ पट्टा...
पीक संरक्षणासाठी चिकट सापळ्यांचे प्रमाण...कीटकांच्या डोळ्यांच्या रचनेचा विचार करून योग्य...