agriculture news in marathi, Chrysanthemum day celebration starts in Manjari, Pune | Agrowon

मांजरीत शेवंती दिनास प्रारंभ; १५० वाणांचे सादरीकरण

मंगळवार, 11 डिसेंबर 2018

पुणे : पुष्प संशोधन संचालनालयाच्या वतीने आज (मंगळवारी, ता. ११) शेवंती दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने मांजरीजवळील (हडपसर) प्रक्षेत्रावर विविध फुलांच्या लागवडीचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून, यामध्ये विविधारंगी शेवंतीचे सुमारे १५० वाण सादर केले आहेत. या निमित्ताने शेतकऱ्यांना मार्गदर्शन देखील मिळणार आहे. 

पुष्प संशोधन संंचालनालयाच्या वतीने देशभरातील विविध फुलांवर संशोधन सुरू असून, यामध्ये प्रामुख्याने शेवंती, गुलछडी, गुलाब, ग्लॅडिओलस फुलांचा समावेश आहे. संस्थेच्या मांजरी येथील सुमारे १०० एकरच्या क्षेत्रावर शेवंतीच्या १५०, गुलाब ८०, गुलछडी १५ आणि ग्लॅडिओलसची ६० वाणांवर संशोधन सुरू आहे. या वाणांची लागवड केली असून, सर्व वाण फुलले असून, हे वाण शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाला भेट देऊन विविध वाणांची माहिती घ्यावी, असे आवाहन संचालनालयाचे संचालक डॉ. के. व्ही. प्रसाद यांनी केले आहे. 
(छायाचित्रे : गणेश कोरे)