agriculture news in marathi, Churning for voting in prestigious Madha | Agrowon

प्रतिष्ठेच्या माढ्यात मतदानासाठी चुरस
टीम अॅग्रोवन
बुधवार, 24 एप्रिल 2019

सोलापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या व भाजप- शिवसेना महायुती आणि राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस महाआघाडीने अत्यंत प्रतिष्ठेच्या केलेल्या माढा लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी (ता. २३) अत्यंत चुरशीने मतदान झाले. माळशिरस, माढा, फलटण, करमाळा तालुक्‍यात अनेक ठिकाणी ही चुरस दिसून आली. या भागातील केंद्रांवर अनेक ठिकाणी सकाळपासून रांगा लागल्या. सायंकाळी सहा वाजेपर्यंत माढा 63.00 टक्के मतदान झाले. 

सोलापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या व भाजप- शिवसेना महायुती आणि राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस महाआघाडीने अत्यंत प्रतिष्ठेच्या केलेल्या माढा लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी (ता. २३) अत्यंत चुरशीने मतदान झाले. माळशिरस, माढा, फलटण, करमाळा तालुक्‍यात अनेक ठिकाणी ही चुरस दिसून आली. या भागातील केंद्रांवर अनेक ठिकाणी सकाळपासून रांगा लागल्या. सायंकाळी सहा वाजेपर्यंत माढा 63.00 टक्के मतदान झाले. 

दुपारी उन्हातही रांगा कायम होत्या. काही ठिकाणी ईव्हीएम मशिनमधील बिघाड आणि किरकोळ बाचाबाची, वादावादीचे प्रकारही घडले, त्यामुळे मतदानाला उशीर आणि ताणतणावाचे वातावरण राहिले. पण काही वेळानंतर पुन्हा मतदान सुरळीत सुरू झाले. दुपारी तीन वाजेपर्यंत सुमारे ४४.१० टक्के मतदान झाले होते. 

माढा लोकसभा मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील माढा, माळशिरस, करमाळा, सांगोला आणि सातारा जिल्ह्यातील माण, फलटण अशा सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. सुमारे १९ लाख ४ हजार ८३३ इतकी लोकसभेची मतदारसंख्या आहे. या सहाही कार्यक्षेत्रांत २०२५ मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. भाजप- शिवसेना महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटणला, तर राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेसचे उमेदवार संजय शिंदे यांनी त्यांच्या निमगाव (टें) येथे मतदान केले. माढ्यात जवळपास ३१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. पण नाईक निंबाळकर आणि शिंदे या दोघांमध्येच मुख्य लढत होत आहे.

सकाळी अकरा वाजेपर्यंत १९.३४ टक्क्यांपर्यंत मतदान झाले होते. पुन्हा मतदानास गती आली. दुपारी एक वाजेपर्यंत हा आकडा जवळपास ३५ टक्‍क्‍यांपर्यंत गेला. महिलांसाठी माळशिरस आणि माढ्यात सखी मतदान केंद्रे उभारली होती. याठिकाणी मतदारांचे आकर्षक रांगोळी काढून आणि गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. माढा, माळशिरस येथील काही केंद्रांवर दिव्यांगांसाठी खास व्यवस्था करण्यात आली. 

फेरमतदानाची मागणी
निमगाव येथे भाजपचा पोलिंग एजंट बाहेरील असल्याचे कारण देत शिंदे यांच्या समर्थकांनी त्याला आक्षेप घेतला. त्यावरून भाजप उमेदवार समर्थक, प्रहार संघटनेचे अतुल खुपसे आणि शिंदे यांच्यात शाब्दिक चकमक झडली. हे प्रकरण नंतर पोलिस ठाण्यापर्यंत गेले. खुपसे यांनी आमदार शिंदे आणि उमेदवार शिंदे या दोघांविरुद्ध पोलिसांकडे तक्रार केली. दरम्यान, शिंदे यांच्या समर्थकांनी भाजपच्या पोलिंग एजंटला हुसकावून लावले. राष्ट्रवादी काँग्रेसने मुद्दामहून आमच्या पोलिंग एजंटला हुसकावून दादागिरी केली. त्यामुळे या केंद्रावर फेरमतदान घ्यावे, अशी मागणी नाईक- निंबाळकर यांनी केली. 

ईव्हीएममध्ये बिघाड अन्‌ वादावादी
माढ्यातील लऊळमध्ये, सांगोल्यातील जिल्हा परिषद शाळा, भीमानगर येथील केंद्र, वेळापूर आणि निमगाव येथे, माण आणि फलटण भागात काही ठिकाणी मशिन बंद पडल्या. त्या बदलण्यात सुमारे तास- दीड तासाचा वेळ गेला. त्यामुळे वेळ वाढवून देण्याची मागणी करण्यात आली. त्यावरून केंद्रप्रमुख आणि गावकऱ्यांमध्ये वादावादी झाली. वेळ वाढवून देण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर वाद निवळला. जवळपास ५७ ठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाडाच्या घटना घडल्या. 

इतर बातम्या
नगर जिल्ह्यातील ४३ हेक्टर जमीन गेली...नगर  ः जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी गोदावरी...
नत्राच्या दुहेरी समस्यांवर मात...जागतिक पातळीवर नत्राचे प्रदूषण आणि शेतीसाठी...
डाळिंबाच्या मार्केटिंग, प्रक्रिया...सोलापूर  : ‘‘जिल्ह्यात उत्पादन होणारे डाळिंब...
जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाला तीन...जळगाव  ः जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
औरंगाबाद जिल्ह्यात पावसाअभावी टोमॅटोचे...औरंगाबाद :  जिल्ह्यातील टोमॅटोचे आगार...
अकोला जिल्ह्यातील पाच पशुवैद्यक दवाखाने...अकोला  ः जिल्हा परिषदेअंतर्गत चालविल्या...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २३ धरणे भरलीसिंधुदुर्ग : मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील २३...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील अनेक...
दसरा, दिवाळीसाठी चांदवड तालुक्यात...नाशिक  : चांदवड तालुक्यातील शेतकरी दसरा,...
नगर जिल्ह्यातील वाहून गेलेल्या...नगर : पुराच्या पाण्याने वाहून गेलेल्या जमिनीचे...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे...सिंधुदुर्ग   ः अतिवृष्टीचा भाजीपाला...
महापुराच्या स्थितीतही ‘त्यांनी’ तीन...नवेखेड, जि. सांगली  : मसुचिवाडी (ता....
वसंतराव नाईक यांनी आधुनिक तंत्रज्ञान...पुसद, जि. यवतमाळ   ः देशातील...
सरकारला खरीप, रब्बीतील फरक कळत नाही :...पैठण, जि. औरंगाबाद  : राज्यातील शेतकऱ्यांची...
पूरग्रस्त भागातील घरांच्या दुरुस्तीसाठी...मुंबई  : पूरग्रस्त ग्रामीण भागातील वाहून...
पीक नुकसानभरपाई नको; संपूर्ण कर्जमाफीच...कऱ्हाड, जि. सातारा   ः महापुराने हुती...
नगर जिल्ह्यात ४०५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर  ः जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पावसाने...
पूरग्रस्तांना एक हेक्टरसाठी मिळणार...मुंबई : राज्यात विविध भागांत आलेल्या...
राज्याचा पाणीसाठा ६१ टक्क्यांवर;...पुणे : जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला...
‘दावणीची दौलत’ चाऱ्याअभावी खचली; दक्षिण...कोल्हापूर/ सांगली : बारमाही पाण्याने भरलेल्या...