Agriculture news in marathi Churshi polling for Gram Panchayats in Solapur | Agrowon

सोलापुरात ग्रामपंचायतींसाठी चुरशीने मतदान 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 16 जानेवारी 2021

सोलापूर जिल्ह्यातील ५९० ग्रामपंचायतींसाठी दुपारपर्यंत सरासरी ३२.५२ टक्के मतदान झाले आहे. पंढरपूर तालुक्‍यात सर्वाधिक ३४.४३ टक्के मतदान झाले. 

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ५९० ग्रामपंचायतींसाठी दुपारपर्यंत सरासरी ३२.५२ टक्के मतदान झाले आहे. पंढरपूर तालुक्‍यात सर्वाधिक ३४.४३ टक्के मतदान झाले. शाब्दिक चकमकी आणि काही किरकोळ वाद वगळता मतदान शांततेत आणि चुरशीने पार पडले. 

जिल्ह्यातील ५९० ग्रामपंचायतींसाठी सकाळी साडेसात वाजता मतदानास प्रारंभ झाला. जिल्ह्यातील ५९० ग्रामपंचायतींसाठी ६ लाख २० हजार २२३ स्त्री मतदार व सहा लाख ६३ हजार १९६ पुरुष मतदार व इतर १७ असे मिळून एकूण १२ लाख ८६ हजार ४३१ मतदार आहेत. पहिल्या दोन तासांत जिल्ह्यात १२.५४ टक्के मतदान झाले होते. या पहिल्या टप्प्यात मतदानाचा वेग संथ असल्याचे आकडेवारीवरून दिसते.

मात्र, दुसऱ्या दोन तासांच्या टप्प्यात मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाली आहे. सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत जिल्ह्यातील दोन लाख १४९ स्त्री, दोन लाख १८ हजार २३१ पुरुष व इतर दोन अशा एकूण चार लाख १८ हजार ३८२ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

दुपारपर्यंत करमाळ्यात ३१.३४ टक्के , माढा ३०.६७, बार्शी ३१.३०, उत्तर सोलापूर ३३.७३, मोहोळ ३३.५९, पंढरपूर ३४.४३, माळशिरस ३०.८३, सांगोला ३४.११, मंगळवेढा ३०.८९, दक्षिण सोलापूर ३३.६३, अक्कलकोट ३१.३६ टक्के मतदान झाले होते. 

दुपारी दोननंतर मात्र मतदानाने काहीशी गती घेतली. उत्तर सोलापुरातील तळेहिप्परगा येथे आम्हाला मतदान कर असे म्हणत दमदाटी केल्यावरून भोसले आणि भिंगारे या दोन गटात दगडफेकीचा प्रकार घडला. यात चारजण गंभीर जखमी झाले. तसेच काही ठिकाणी किरकोळ वादावादी वगळता मतदान शांततेत पार पडले. 


इतर ताज्या घडामोडी
बीड जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा पेच बीड : जिल्हा बँकेच्या १९ संचालक मंडळाच्या होऊ...
 खानदेशात केळीच्या दरात सुधारणा जळगाव : खानदेशात केळीच्या किमान दरात सुधारणा झाली...
‘सोलापूर, पुण्यात वन्यप्राणी हल्ला...सोलापूर ः ‘‘पुणे आणि सोलापूर वनविभागांतर्गत...
अनवलीतील नीरा भाटघरच्या कॅनॉलची...सोलापूर ः ‘‘पंढरपूर तालुक्यातील अनवली येथील नीरा...
‘पोकरा’तंर्गत योजनेत भाग घ्या ः देशमुखनांदेड : ‘‘नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेतंर्गत...
न्याहळोद येथे कोथिंबिरीचे भाव पडले न्याहळोद, जि. धुळे : कोथिंबिरीचे भाव पडल्याने...
रखडलेल्या सूक्ष्म सिंचन फायलींचा मार्ग...अकोला ः गेल्या तीन वर्षांमध्ये प्रलंबित असलेले...
जवसाचे आरोग्यदायी महत्त्व जाणावे ः डॉ....अकोला ः शेतकऱ्यांनी जवसाचे उत्पन्न घेताना तेलाचा...
नांदेडमध्ये हरभऱ्याला सर्वसाधारण ४५००...नांदेड : नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीतंर्गत...
बुलडाणा : दूध उत्पादक, विक्रेत्यांना...बुलडाणा : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी...
शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी नवरदेवाची...नाशिक खामखेडा ता. देवळा : देवळा तालुक्यातील...
आमदारांच्या कुटुंबीयांसाठीच जिल्हा...नगर : जिल्हा बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत...
नविन विहीर योजनेतून सोडतीद्वारे...औरंगाबाद: राष्ट्रीय कृषी विकास योजनेतंर्गत अनु....
पंढरपुरात माघवारीनिमित्त श्री विठ्ठल-...पंढरपूर, जि. सोलापूर : माघवारी जया शुद्ध...
सीताफळ निर्यात वाढण्यासाठी तज्ज्ञांचे...बीड : केंद्र सरकारने डिसेंबर २०१८ कृषी निर्यात...
पुसदमध्ये ‘पणन’ची कापूस खरेदी बंदआरेगाव, जि. यवतमाळ : पुसद तालुक्यात सोमवार (ता....
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेत...पुणे : पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या प्रभावी...
काँग्रेस-राष्ट्रवादीचा सांगलीत ‘...सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेचे...
नियमित कांदा निर्यात सुरू राहण्यासाठी...नाशिक : जिल्ह्यात कांदा महत्त्वाचे पीक आहे. मात्र...
गारपीटग्रस्तांचे पंचनामे करा ः...नागपूर : कुही तालुक्यात पाऊस व गारपिटीमुळे मिरची...