Agriculture news in marathi Churshi polling in Sindhudurg; Incident of voting machine malfunction | Agrowon

सिंधुदुर्गमध्ये चुरशीने मतदान; मतदान यंत्रात बिघाड झाल्याची घटना 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 16 जानेवारी 2021

जिल्ह्यातील ६६ ग्रामपंचायतीच्या ४९४ जागांसाठी शुक्रवारी (ता.१५) सकाळी साडेसात वाजल्यापासून शांततेत मतदान सुरू झाले. दुपारी तीन वाजेपर्यंत सरासरी ६० टक्के मतदान झाले आहे.

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील ६६ ग्रामपंचायतीच्या ४९४ जागांसाठी शुक्रवारी (ता.१५) सकाळी साडेसात वाजल्यापासून शांततेत मतदान सुरू झाले. दुपारी तीन वाजेपर्यंत सरासरी ६० टक्के मतदान झाले आहे. सर्व जिल्ह्यात चुरशीने मतदान होताना दिसत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान जिल्ह्यात एका ठिकाणी मतदान यंत्रात बिघाड झाल्याचा प्रकार घडला. 

जिल्ह्यातील ७० ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली होती. त्यापैकी चार ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली आहे. त्यामुळे उर्वरित ६६ ग्रामपंचायतीच्या ४९४ जागांसाठी सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदान प्रकियेला सुरुवात झाली आहे. सकाळपासूनच मतदारांची गर्दी मतदान केंद्राबाहेर दिसून येत होती. सकाळी अकरा वाजेपर्यंत ४५ टक्के तर दुपारी तीन वाजेपर्यंत ६० टक्के मतदान झाले होते. मतदानाची वेळ सांयकाळी साडेपाच वाजेपर्यंत असल्यामुळे मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता आहे. 

दरम्यान सकाळी मतदान प्रक्रिया सुरू झाल्यानंतर जिल्ह्यातील खांबाळे टेंबवाडी येथील मतदान यंत्रात बिघाड झाला. ही माहिती मिळताच तहसीलदार रामदास झळके यांनी तत्काळ मतदान यंत्रात बदल करून मतदान प्रकिया पूर्ववत केली. अर्धातास मतदान प्रकिया रखडली होती. त्यामुळे मतदारांची मोठी रांग मतदान केंद्राबाहेर लागली होती. खांबाळे व्यतिरिक्त कुठेही मतदान प्रकियेत खंड पडलेला नाही.


इतर ताज्या घडामोडी
बीड जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा पेच बीड : जिल्हा बँकेच्या १९ संचालक मंडळाच्या होऊ...
 खानदेशात केळीच्या दरात सुधारणा जळगाव : खानदेशात केळीच्या किमान दरात सुधारणा झाली...
‘सोलापूर, पुण्यात वन्यप्राणी हल्ला...सोलापूर ः ‘‘पुणे आणि सोलापूर वनविभागांतर्गत...
अनवलीतील नीरा भाटघरच्या कॅनॉलची...सोलापूर ः ‘‘पंढरपूर तालुक्यातील अनवली येथील नीरा...
‘पोकरा’तंर्गत योजनेत भाग घ्या ः देशमुखनांदेड : ‘‘नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेतंर्गत...
न्याहळोद येथे कोथिंबिरीचे भाव पडले न्याहळोद, जि. धुळे : कोथिंबिरीचे भाव पडल्याने...
रखडलेल्या सूक्ष्म सिंचन फायलींचा मार्ग...अकोला ः गेल्या तीन वर्षांमध्ये प्रलंबित असलेले...
जवसाचे आरोग्यदायी महत्त्व जाणावे ः डॉ....अकोला ः शेतकऱ्यांनी जवसाचे उत्पन्न घेताना तेलाचा...
नांदेडमध्ये हरभऱ्याला सर्वसाधारण ४५००...नांदेड : नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीतंर्गत...
बुलडाणा : दूध उत्पादक, विक्रेत्यांना...बुलडाणा : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी...
शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी नवरदेवाची...नाशिक खामखेडा ता. देवळा : देवळा तालुक्यातील...
आमदारांच्या कुटुंबीयांसाठीच जिल्हा...नगर : जिल्हा बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत...
नविन विहीर योजनेतून सोडतीद्वारे...औरंगाबाद: राष्ट्रीय कृषी विकास योजनेतंर्गत अनु....
पंढरपुरात माघवारीनिमित्त श्री विठ्ठल-...पंढरपूर, जि. सोलापूर : माघवारी जया शुद्ध...
सीताफळ निर्यात वाढण्यासाठी तज्ज्ञांचे...बीड : केंद्र सरकारने डिसेंबर २०१८ कृषी निर्यात...
पुसदमध्ये ‘पणन’ची कापूस खरेदी बंदआरेगाव, जि. यवतमाळ : पुसद तालुक्यात सोमवार (ता....
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेत...पुणे : पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या प्रभावी...
काँग्रेस-राष्ट्रवादीचा सांगलीत ‘...सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेचे...
नियमित कांदा निर्यात सुरू राहण्यासाठी...नाशिक : जिल्ह्यात कांदा महत्त्वाचे पीक आहे. मात्र...
गारपीटग्रस्तांचे पंचनामे करा ः...नागपूर : कुही तालुक्यात पाऊस व गारपिटीमुळे मिरची...