बोंड अळीसाठी ‘सीआयसीआर’ने विकसित केला विशेष ‘लुअर्स’ 

गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव वेळीच टाळून उपाययोजना करणे शक्‍य व्हावे याकरिता केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने पुढाकार घेत ‘सीआयसीआर फेरोमॅन लुअर्स’ विकसित केला आहे.
luars
luars

नागपूर ः गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव वेळीच टाळून उपाययोजना करणे शक्‍य व्हावे याकरिता केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने पुढाकार घेत ‘सीआयसीआर फेरोमॅन लुअर्स’ विकसित केला आहे. याचा लुअर्स सहा आठवड्यांपर्यंत चालत असल्याचा दावा संशोधक संस्थेने केला असून, इतरही अनेक वैशिष्ट्ये या लुअर्सची असल्याचे सांगण्यात आले. येत्या हंगामात कापूस उत्पादक राज्यांमध्ये प्रत्येकी एक हजार शेतकऱ्यांच्या शेतात याच्या चाचण्या घेण्यात येणार आहेत. 

केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१७ मध्ये गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला होता. त्यानंतर २०१८ मध्ये कमी झाला. २०१९-२० मध्ये देखील प्रादुर्भाव जास्त दिसून आला नाही. २०२०-२१ मध्ये गुलाब बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढीस लागला. गुलाबी बोंड अळीचे हे वारंवार होणारे संक्रमण नियंत्रणासाठी ‘सीआयसीआर फेरोमॅन लुअर्स’ विकसित करण्यात आला आहे. सहा हप्त्यांपर्यंत हा लुअर्स चालते. या वर्षी कापूस उत्पादक राज्यात प्रत्येकी एक हजार ट्रायल या लुअर्सच्या घेण्यात येणार आहेत. त्या माध्यमातून निरीक्षण केले जाईल. 

केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या प्रक्षेत्रावरील चाचण्यांमध्ये या लुअर्सची मॉनिटरिंग ट्रॅपिंग क्षमता अतिशय चांगली असल्याचे निरीक्षणाअंती समोर आले आहे. दरम्यान, एक हजार शेतकऱ्यांच्या शेतावर चाचणी घेण्याकरिता काही भागीदारांना सोबत घेतले जाईल. त्याकरिता इच्छुक असलेल्यांसोबत जाण्यास आम्ही तयार आहोत, असेही सांगण्यात आले. एकरी तीस ट्रॅप लावावे लागतात, अशी माहिती देखील देण्यात आली.  प्रतिक्रिया गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव वेळीच कळण्यासाठी केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने विशेष लुअर्स विकसित केला आहे. या लुअर्सची अनेक वैशिष्ट्ये असून, सध्या हे काम चाचणीच्या अंतिम टप्प्यात आहे. प्रक्षेत्र चाचणी आधीच पूर्ण झाली आहे. येत्या हंगामात शेतकऱ्यांच्या शेतावर चाचणी होईल. त्याचे परिणाम जाणून घेत हे लुअर्स उपलब्ध करून देण्याचा मानस आहे.  - डॉ. वाय.जी. प्रसाद, संचालक, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com