हिंगोली ः जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात ३ लाख ५८ हजार ४०३ हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे.
टेक्नोवन
सीआयसीआर’ने विकसित केली कापूस वेचणी बॅग
कापूस वेचणीतील महिलांचे श्रम कमी व्हावे याकरिता केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने कापूस वेचणी बॅग विकसित केली आहे.
नागपूर ः कापूस वेचणीतील महिलांचे श्रम कमी व्हावे याकरिता केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने कापूस वेचणी बॅग विकसित केली आहे. सात किलो रुई इतकी क्षमता या बॅगची असून, स्वच्छ कापूस उत्पादनाला देखील यामुळे हातभार लागेल, असा विश्वास बॅगच्या लोकार्पण प्रसंगी संस्थेचे संचालक डॉ. वाय.जी. प्रसाद यांनी व्यक्त केला.
शासकीय खरेदीकामी गव्हर्न्मेंट मार्केटप्लेस (ईजेम) वर देखील ही बॅग उपलब्ध राहणार असून, उत्पादनाचा करार नागपुरातील मेसर्स एसएसआर इंटरप्रायजेससोबत करण्यात आला आहे.
कापूस शेतीत कापूस वेचणी आणि तो तात्पुरता जवळ साठविणे हे काम जिकिरीचे ठरते. विशेषतः महिलांना या कामात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेता केंद्रीय कापूस संशोधन संस्थेअंतर्गत असलेल्या ‘केव्हीके’च्या वतीने खास वेचणी केलेल्या कापसाच्या तात्पुरत्या साठवणुकीसाठी बॅग विकसित केली गेली आहे. सात किलो इतकी या बॅगची साठवण क्षमता आहे. या बॅगचे डिझाइन ‘केव्हीके’च्या विषय विषयतज्ज्ञ सुनीता चव्हाण यांनी केले आहे.
या बॅगच्या देशांतर्गत व्यावसायिक वापरास मान्यता देण्यात आली आहे. यानिमित्ताने झालेल्या कार्यक्रमाला डॉ. वाय.जी. प्रसाद, सुनीता चव्हाण, डॉ. सिद्धार्थ वासनिक, डॉ. जी. बालसुब्रमणी, शारदा साळवे, ईशान रोडगे उपस्थित होते.
उत्पादनासाठी करार
सध्या या बॅगच्या उत्पादनासंदर्भाने नागपुरातील मेसर्स एसएसआर इंटरप्रायजेससोबत करार करण्यात आला आहे. त्याशिवाय इतर व्यावसायिकांनी देखील याकामासाठी पुढे यावे, असे आवाहन केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने केले आहे. ही बॅग घालण्यास सोपी, उच्च कार्यक्षमता असलेली, स्वच्छ वेचणीस पूरक असल्याचा दावा करण्यात आला आहे.
- 1 of 23
- ››