सिडको जमीन घोटाळ्याची होणार न्यायालयीन चौकशी : मुख्यमंत्री

विधीमंडळ अधिवेशन
विधीमंडळ अधिवेशन

नागपूर : नवी मुंबईतील सिडकोच्या २४ एकर जमीन घोटाळ्याची न्यायालयीन चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (ता. ६) विधान परिषदेत केली. त्यानंतर पावसामुळे वीजपुरवठा खंडित असल्याने कामकाज सोमवारपर्यंत (ता.९) तहकूब करण्यात आले.

कोयना प्रकल्पग्रस्तांना देण्यात आलेली १७६७ कोटी रुपयांची जमीन बांधकाम व्यावसायिक मनीष भतीजा आणि संजय भालेराव यांना अवघ्या साडेतीन कोटी रुपयांत विकण्यात आली असून, हा व्यवहार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडील नगरविकास खाते, सिडको आणि भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्या संगनमताने झाल्याचा दावा काँग्रेस नेत्यांनी केला. या संदर्भाने मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेत निवेदन केले. या कथित घोटाळ्याची चौकशी न्यायालयामार्फत केली जाईल; तोवर संपूर्ण व्यवहारांना स्थगिती दिली जात असल्याचे त्यांनी जाहीर केले.

दरम्यान, नागपुरात गुरुवारी (ता.५) रात्रीपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे वीजपुरवठा खंडित होता आणि जनरेटर रूममध्ये पावसाचे पाणी शिरल्याने ते सुरू करणेदेखील धोकादायक झाले होते. त्यामुळे विधिमंडळाचा परिसर अंधारात बुडाला. विधानसभेचे कामकाज आधीच तहकूब करण्यात आले. त्यानंतर विधान परिषदेचे कामकाजही सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आल्याची घोषणा झाली.

विरोधी पक्षनेता धनंजय मुंडे यांनी इतिहासात पहिल्यांदाच पावसामुळे अधिवेशन रद्द झाल्याचा प्रकार या सरकारच्या काळात घडला, असा आरोप केला. सचिवस्तरीय समितीने आपल्या अहवालात नागपुरात अधिवेशन घेऊ नये, असे सांगितले होते; परंतु या अहवालाकडे दुर्लक्ष करून बालहट्टाप्रमाणे अधिवेशन मुंबईऐवजी नागपूरला घेण्यात आले आणि पावसामुळे ते रद्द करावे लागले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com