Agriculture news in marathi cilantro incoming Increase in Kolhapur | Agrowon

कोल्हापुरात कोथिंबिरीच्या आवकेत वाढ

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 14 जुलै 2020

कोल्हापूर : बाजार समितीत या सप्ताहात कोथिंबीरीची मोठी आवक झाली. कोथिंबीरीची दररोज चाळीस ते पंचेचाळीस हजार पेंढ्या इतकी आवक होती. कोथिंबीरीस शेकडा १०० ते ६०० रुपये इतका दर मिळत आहे.

कोल्हापूर : बाजार समितीत या सप्ताहात कोथिंबीरीची मोठी आवक झाली. कोथिंबीरीची दररोज चाळीस ते पंचेचाळीस हजार पेंढ्या इतकी आवक होती. कोथिंबीरीस शेकडा १०० ते ६०० रुपये इतका दर मिळत आहे.

आवकेत वाढ झाल्याने दरही स्थिर राहू शकले नाहीत. गेल्या महिन्यामध्ये कोथिंबीरीची मोठी चणचण निर्माण झाली होती. साधारणत: जून च्या पहिल्या सप्ताहापर्यंत कोथिंबीरीला चांगले दर मिळत होते. याच दरम्यान जिल्ह्यात बहुतांशी ठिकाणी पावसाच्या चांगल्या सरी झाल्याने शेतकऱ्यांनी कोथिंबीर लागवडीला प्राधान्य दिले.

जूलैच्या पहिल्या सप्ताहापासून कोथिंबीरीच्या आवकेत थोडी थोडी वाढ होत गेली. जूनच्या पहिल्या सप्ताहापर्यंत कोथिंबीरीची दररोज आवक २५ ते ३० हजार पेंढ्या इतकी होती. यात दररोज वाढ होत आहे. गेल्या सप्ताहात ही आवक चाळीस हजार पेंढ्याच्या वर गेली. यामुळे दरही स्थिर राहू शकले नसल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

सार्वजनिक कार्यक्रमही स्थागित असल्याने त्याचा मोठा परिणाम कोथिंबीरीच्या मागणीवर झाला आहे. कोथिंबीरीच्या तुलनेत मेथीच्या आवकेत मात्र फारशी वाढ झाली नाही. मेथीची आवक पाच ते दहा हजार पेंढ्या इतकी राहिली. मेथीस शेकडा ७०० ते १००० रुपये दर मिळाला. पालक, पोकळा शेपूस शेकडा ४०० ते ५०० रुपये दर मिळाला.

ओल्या मिरचीस दहा किलोस १०० ते ३०० रूपये

ओली मिरची, टोमॅटोची आवक इतर भाज्यांच्या तुलनेत अधिक होती. तिची दररोज एक ते दीड हजार पोत्यांची आवक झाली. ओल्या मिरचीस दहा किलोस १०० ते ३०० रुपये दर होता. टोमॅटोस दहा किलोस १०० ते ३५० रुपये दर होता. ढोबळ्या मिरचीची दोनशे ते तीनशे पोती आवक राहिली. ढोबळ्या मिरचीस दहा किलोस २०० ते ४०० रुपये दर होता. फळांमध्ये डाळिंबाची २० ते ३० कॅरेट आवक झाली. डाळिंबास किलोस १० ते ५० रुपये दर होता. अननास डझनास १०० ते ४०० रुपये दर होता.


इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादमध्ये आज रानभाज्या महोत्सवऔरंगाबाद  ः ‘‘वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
सांगलीत ६८ हजार शेतकऱ्यांनी उतरवला...सांगली  ः जिल्ह्यातील ६८ हजार ०१८...
रिसोडमध्ये पावसाची उघडीपवाशीम  ः राज्यात बऱ्याच भागात पाऊस धुमाकूळ...
वाशीम जिल्ह्यात एक लाख ४२ हजार हेक्टर...वाशीम ः पंतप्रधान पीकविमा योजनेत जिल्ह्यातील...
खानदेशात ताग लागवडीला पसंतीजळगाव  ः कमी पाण्यात व उशिरा लागवड करूनही...
पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत घटकोल्हापूर : पश्चिम भागात पावसाचा जोर घटल्याने...
परभणी विभागात बिजोत्पादन होणार २७ हजार...परभणी : यंदा महाबीजच्या परभणी विभागातील परभणी,...
अकोल्यात पाऊस सुरुचनगर  ः अकोले तालुक्याच्या पश्चिम आदिवासी...
विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांचे...अमरावती : विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांना...
इगतपुरी, नाशिक तालुक्यात वाऱ्यामुळे...नाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात झालेल्या...
विक्रीअभावी मालवंडीत लिंबू उत्पादकांना...मालवंडी, जि. सोलापूर ः बार्शी तालुक्यातील मालवंडी...
सफेद चिप्पी कांदळवन वृक्ष घोषितमुंबई: सफेद चिप्पी (sonneratia alba) या कांदळवन...
यंदा बैल पोळा उत्साहात साजरा होणार रोपळे बुद्रूक , ता.पंढरपूर , जि . सोलापूर...
हलक्‍या ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्‍...महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात बदल होत असून,...
औरंगाबादमध्ये बटाटे २००० ते २४०० रुपये...औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
औसा तालुक्यात उडीद, मूग व्हायरसच्या...औसा, जि. लातूर : तालुक्यातील उडीद आणि मूग ही पिके...
शेतमजुरांसाठी कौशल्याधारीत प्रशिक्षण...नाशिक: बदलत्या पीक पद्धतीमध्ये कीडनाशक फवारणी,...
कोल्हापूर जिल्ह्यात वादळ, पुराचा उसाला...कोल्हापूर: जोरदार वाऱ्यासह सुरु असलेल्या पावसाने...
पुणे जिल्ह्यात पावसामुळे भात लागवडीला...पुणे ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून पुणे...
पाथरूडच्या बंधाऱ्यांत मुबलक पाणीपाथरूड, जि. उस्मानाबाद : येथील दुधना नदीवर...