Cilantro prices continue to rise in the state
Cilantro prices continue to rise in the state

राज्यात कोथिंबिरीच्या दरात तेजी कायम

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवार (ता.२०) कोथिंबिरीची आवक ६२ हजार १०० जुड्या झाली. प्रतिशेकडा जुड्यांना गावरान कोथिंबिरीला किमान ७००० ते कमाल १८१०० रुपये असा दर मिळाला.

नाशिकात क्विंटलला ७००० ते १८१०० रुपये

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवार (ता.२०) कोथिंबिरीची आवक ६२ हजार १०० जुड्या झाली. प्रतिशेकडा जुड्यांना गावरान कोथिंबिरीला किमान ७००० ते कमाल १८१०० रुपये असा दर मिळाला. सर्वसाधारण दर १२००० रुपये, तर हायब्रीड कोथिंबिरीला किमान ५००० ते कमाल १५२०० रुपये दर मिळाला. सर्वसाधारण दर ८००० रुपये दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

मंगळवारी (ता.१९) आवक ५७ हजार ३०० जुड्या झाली. प्रतिशेकडा जुड्यांना गावरान कोथिंबिरीला किमान ४००० ते कमाल १५०००रुपये असा दर मिळाला. सर्वसाधारण दर १०५०० रुपये, तर हायब्रीड कोथिंबिरीला किमान ४२०० ते कमाल १३००० रुपये असा मिळाला. सर्वसाधारण दर ६५०० रुपये दर मिळाला.

सोमवारी (ता.१८) आवक ६७ हजार ५०० जुड्या झाली. तिला प्रतिशेकडा जुड्यांना गावरान कोथिंबिरीला किमान ४००० ते कमाल १५००० रुपये असा दर मिळाला. सर्वसाधारण दर १०५०० रुपये, तर हायब्रीड कोथिंबिरीला किमान ४००० ते कमाल १५१०० रुपये असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ७८०० रुपये दर मिळाला. रविवारी (ता.१७) कोथिंबिरीची आवक ५८ हजार ६०० जुड्या झाली. तिला प्रतिशेकडा जुड्यांना गावरान कोथिंबिरीला किमान ३००० ते कमाल १८५०० रुपये असा दर मिळाला. सर्वसाधारण दर १०००० रुपये, तर हायब्रीड कोथिंबिरीला किमान ४००० ते कमाल १८५०० रुपये असा दर मिळाला. सर्वसाधारण दर १०००० रुपये दर मिळाला.

शनिवारी (ता.१६) आवक ६७ हजार ८०० जुड्या झाली. तिला प्रतिशेकडा जुड्यांना गावरान कोथिंबिरीला किमान ४००० ते कमाल १७५५५ रुपये असा दर मिळाला.  शुक्रवारी (ता.१५) आवक ४० हजार ५०० जुड्या झाली. तिला प्रतिशेकडा जुड्यांना गावरान कोथिंबिरीला किमान ४००० ते कमाल १००५५ रुपये असा दर मिळाला. 

गेल्या आठवड्याभरापासून कोथिंबिरीचे दर वाढत चालल्याचे दिसून आले. उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आलेल्या गावरान कोथिंबिरीला रविवार(ता.१७) रोजी १८,५०० उच्चांकी दर मिळाला. तर बुधवारी (ता.२०) सरासरी दरात उच्चांकी १२,००० दर मिळाला.

अकोल्यात क्विंटलला सरासरी १० हजार रुपये 

अकोला ः येथील भाजी बाजारात गुरुवारी (ता.२१) कोथिंबीर १०० रुपये प्रतिकिलो दराने विक्री झाली. क्विंटलला १० हजारांचा दर मिळाला. बाजारात २० क्विंटलपर्यंत कोथिंबिरीची आवक झाली होती, अशी माहिती व्यापारी सूत्रांकडून देण्यात आली. 

गेल्या काळात झालेल्या सततच्या पावसाने भाजीपाल्यासह कोथिंबिरीचे मोठे नुकसान केले. सध्या बाजारात मागणी वाढलेली असताना तुलनेने पुरवठा कमी आहे. यामुळे कोथिंबिरीचे दर मागील काही दिवसांपासून वधारलेले आहेत. गेल्या आठवड्यात हा दर १०० रुपयांपेक्षा अधिक झाला होता. आता पाऊस ओसरल्यानंतर आवक वाढू लागली आहे. परिणामी दर १०० रुपयांपर्यंत पोचला आहे. 

गुरुवारी चांगल्या प्रतीची कोथिंबीर सरासरी १०० रुपये प्रतिकिलोने विक्री झाली. दुय्यम दर्जाची कोथिंबीर ८० ते १०० रुपयांदरम्यान विकली जात होती. किरकोळ बाजारात कोथिंबीर सर्रास २०० रुपये किलोने विकत आहे. आणखी काही दिवस कोथिंबिरीचे दर स्थिर राहू शकतात, असेही व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले. गुरुवारी स्थानिक शेतकऱ्यांनीच अधिक प्रमाणात कोथिंबीर विक्रीसाठी आणली होती.

कोल्हापुरात शेकडा ८०० ते ३००० रुपये कोल्हापूर: येथील बाजार समितीत कोथिंबिरीस शेकडा ८०० ते ३००० रुपये इतका दर मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोथिंबिरीच्या दरात वाढ होत आहे, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. 

बाजार समितीत सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील कोथिंबीर उत्पादक गावांबरोबरच बेळगाव सीमा भागातून कोथिंबिरीची आवक होत आहे. पंधरवड्यापूर्वी कोथिंबिरीस शेकडा पाचशे ते हजार रुपयांपर्यंत दर होता. गणेशोत्सवाच्या दरम्यान तर कोथिंबीर इस केवळ ३०० ते ४०० रुपये शेकडा इतकाच दर मिळत होता. परंतु गेल्या आठ दिवसात हळूहळू कोथिंबिरीच्या दरात वाढ होत गेली.

मध्यंतरीच्या काळात दर नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी कोथिंबिरीची लागवड केली नाही. यामुळे बाजारात कोथिंबिरीची चणचण निर्माण झाली. याचा परिणाम सध्या कोथिंबिरीच्या दरवाढीवर होतअसल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. ही स्थिती आणखी आठ ते दहा दिवस तरी निश्चित राहील, असे व्यापारी सूत्रांनी सांगितले.

नागपुरात क्विंटलला १०००० ते १५००० रुपये 

नागपूर ः गेल्या आठवड्यात पाच हजार रुपये क्‍विंटलपर्यंत असलेल्या कोथिंबिरीच्या दरात मोठी तेजी अनुभवली जात आहे. सद्यःस्थितीत नागपूरच्या कळमणा बाजारात कोथिंबीर १० ते १५ हजार रुपये क्‍विंटलने विकली जात आहे. 

कळमणा बाजार समितीत तीन ते १४ ऑक्‍टोंबर या कालावधीत सरासरी १५० क्‍विंटल कोथिंबिरीची आवक होत होती. तीन हजार ते पाच हजार रुपये सरासरी दर कोथिंबिरीला होता. त्यानंतरच्या काळात आवक स्थिर असली तरी दरात मात्र तेजी आली आहे. त्यामुळे कोथिंबिरीचे दर १० हजार ते १५ हजार रुपयांवर पोचले आहेत. घाऊक बाजारातच दर वाढल्याने किरकोळ बाजारातही ग्राहकांना वाढीव दरात कोथिंबीर खरेदी करावी लागत आहे.

किरकोळ बाजारात २०० रुपये अशा उच्चांकी दराने कोथिंबिरीची खरेदी होत आहे. राज्यात सर्वदूर पावसाने भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. त्याच्याच परिणामी भाजीपाला उत्पादकांचे नुकसान झाल्याने ही तेजी आल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली.

परभणीत क्विंटलला ६००० ते १३००० रुपये परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी (ता.२१) कोथिंबिरीची ४५ क्विंटल आवक होती. कोथिंबिरीला प्रतिक्विंटल किमान ६००० ते कमाल १३००० रुपये, तर सरासरी ९५०० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

सध्या येथील मार्केटमध्ये स्थानिक परिसरातून तसेच मध्य प्रदेशातील इंदोर येथून अकोला मार्केटमध्ये आलेल्या कोथिंबिरीची आवक होत आहे. पावसामुळे नुकसान झाल्याने कोथिंबिरीची आवक कमी झाली आहे. गेल्या महिनाभरातील प्रत्येक गुरुवारी सरासरी ४० ते ६० क्विंटल आवक झाली. त्या वेळी प्रतिक्विंटल ६००० ते १२०० रुपये दर मिळाले.

गुरुवारी (ता.२१) कोथिंबिरीची ४५ क्विंटल आवक झाली. त्यावेळी घाऊक विक्रीचे दर प्रतिक्विंटल ६००० ते १३००० रुपये होते, तर किरकोळ विक्री प्रतिकिलो २०० ते २५० दराने सुरु होती, असे व्यापारी प्रकाश बोराडे यांनी सांगितले.

नगरला कोथिंबिरीची २५०० जोड्या आवक  नगर : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत २५०० जोड्यांची कोथिंबिरीची आवक झाली. बाजार समितीत आवक कमी झाली असून मागणी मात्र वाढली आहे. नगर जिल्ह्यामध्ये पाऊस झाल्यामुळे भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचा परिणाम कोथंबिरीच्या उत्पादनावर झाला असल्याचे दिसून येत आहे. १८ ऑक्टोबर रोजी १९०० जुड्यांची आवक झाली. १५ ऑक्टोबर रोजी सहा हजार जुड्यांची आवक झाली, असे कृषी उत्पन्न बाजार समितीतून सांगण्यात आले.

पुण्यात शेकड्याला ७०० ते ८००० रुपये पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.२१) कोथिंबिरीच्या सुमारे ५० हजार जुड्या आवक झाली होती. या वेळी शेकड्याला ३ ते ५ हजार रुपये दर होता. कोथिंबिरीचे दर वाढला. त्यामुळे गुजरात राज्यातून सुमारे २ टेम्पो आवक झाली होती. तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर बाजार समितीमधील नारायणगाव उपबाजारात बुधवारी (ता. २०) कोथिंबिरीच्या सुमारे ४७ हजार जुड्या आवक झाली होती. या वेळी शेकड्याला ७०० ते ८ हजार रुपये दर होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com