Agriculture news in marathi Cilantro prices fell | Agrowon

न्याहळोद येथे कोथिंबिरीचे भाव पडले 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 24 फेब्रुवारी 2021

कोथिंबिरीचे भाव पडल्याने शेतकरी संकटात सापडला असून, कोथिंबीर लागवडीसाठी केलेला खर्चही कोथिंबीर विकून निघणार नाही, अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.

न्याहळोद, जि. धुळे : कोथिंबिरीचे भाव पडल्याने शेतकरी संकटात सापडला असून, कोथिंबीर लागवडीसाठी केलेला खर्चही कोथिंबीर विकून निघणार नाही, अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. दोन दिवसांपूर्वी अवकाळी पावसाचा फटका रब्बी हंगामातील पिकांना बसला असतानाच पिकविलेल्या शेतमालालाही आता भाव मिळत नाही, अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे. 

न्याहळोद येथील शेतकरी यशवंत माळी यांनी त्यांच्या शेतात कोथिंबीर लावली होती. कोथिंबिरीची देखरेख, मशागत करून त्यांना भरघोस उत्पादन आल्याने त्यांना कोथिंबीर विकून दोन पैसे हातात येतील व घेतलेले कर्जही फेडता येईल, अशी आशा होती. यामुळे त्यांनी १६ मजूर ६० रुपयांप्रमाणे कोथिंबीर काढण्यासाठी लावले.

काढलेली कोथिंबीर गोळा करण्यासाठी शंभर रुपये रोजंदारीने शेतमजूर लावला. त्यानंतर गोळा केलेली कोथिंबीर धुळे येथे मार्केट कमिटीत विकण्यासाठी आणली. यासाठी त्यांना गाडीभाडे पाचशे रुपये द्यावे लागले. असा सर्व मिळून खर्च त्यांना १ हजार ५६० रुपये आला. मात्र जेव्हा कोथिंबिरीची विक्री झाली तेव्हा केवळ १ हजार ८५ रुपये मिळाले. त्यातही हमाली व तोलाई वजा जाता हातात फक्त नऊशे रुपये आले, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 

खर्च १ हजार ५६० व उत्पन्न केवळ ९०० रुपये येऊन तब्बल ६६० रुपयांची तूट आली. यात दोन महिन्यांचे राबणे जोडलेले नाही. अशाच प्रकारे जर शेतीचे गणित तुटीचे असेल तर शेती का आणि कशासाठी करायची? शेतकरी जेव्हा शेतमाल पिकवितो, तेव्हा योग्य दरात शेतमाल विकला जात नाही. अशातच सक्तीची वीजबिल वसुली, कर्जवसुलीसाठी शेतकरी पैसा कुठून आणणार, असा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे कोथिंबिरीचे उत्पादन करणाऱ्या शेतकरी बांधवांना ‘खायापिया कुछ नहीं ग्लास फोडा बारा आणा’ असे म्हणायची वेळ आली आहे. 


इतर बाजारभाव बातम्या
सांगलीत बेदाण्याचे सौदे पंधरा दिवस बंदच सांगली ः कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने सांगली...
उन्हाळ कांद्याच्या आवकेसह दरात हळूहळू...नाशिक : जिल्ह्यात गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब...
लवंगी, बेडगी, लाल मिरचीला नगरच्या...नगर ः नगर येथील बाजार समितीत गेल्या दोन ते अडीच...
काबुली हरभऱ्याच्या दरात किंचित सुधारणाजळगाव : खानदेशात काबुली हरभरा दर यंदा टिकून आहेत...
संभाव्य टाळेबंदीमुळे फूल बाजार कोमेजला पुणे : गुढीपाडव्या निमित्त फुलांची वाढलेली मागणी...
कोरोना संकटामुळे हापूसची आवक कमी, दर...पुणे : गुढीपाडव्यासाठी ग्राहकांची हापूसला मोठी...
सोयाबीनची गुढी सात हजारांपार !वाशीम /लातूर/ अकोला ः वाशीम बाजार समितीत सोमवारी...
सोलापुरात बेदाण्याला प्रतिकिलोला २६५...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नगर जिल्ह्यात कांद्याचे दर अस्थिरपुणे नगर : कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या...
केळीला विक्रमी १६०० रुपये दरजळगाव ः  खानदेशात चांगल्या दर्जाच्या केळीला...
 खानदेशात कांद्याची आवक वाढतच दर दबावातजळगाव :  खानदेशात गेल्या आठवड्यात लाल...
काबुली हरभऱ्याचे दर खानदेशात टिकूनजळगाव :  खानदेशात काबुली हरभऱ्याचे दर यंदा...
लातूर, अकोल्यात तुरीने ओलांडला सात...लातूर/अकोला ः राज्यात काही दिवसांपासून तूर, हरभरा...
खानदेशातील बाजारांमध्ये मक्याची आवक घटलीजळगाव : खानदेशात बाजारात मक्याची आवक मध्यंतरी...
औरंगाबादेत आंबा खातोय भाव, ज्वारीचे दर...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
नगरमध्ये कारले, हिरव्या मिरचीच्या दरात...नगर : येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार...
सोलापुरात हिरवी मिरची, गवार, भेंडी...सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीच्या दरात...नाशिक  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
नाशिकमध्ये लेट खरीप कांद्याची आवक वाढलीनाशिक : जिल्ह्यात मार्चअखेर, बँक बंदमुळे रोकड...
सोयाबीनला उच्चांकी सहा हजारांचा भावलातूर/अकोला ः गेल्या काही दिवसांपासून राज्यात...