सोलापुरात कोथिंबीर, मेथीच्या दरात सुधारणा

सोलापूर ः सोलापूरबाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात कोथिंबीर, मेथी, शेपू या भाज्यांच्या दरात सुधारणा झाली.
Cilantro in Solapur, Improvement in fenugreek prices
Cilantro in Solapur, Improvement in fenugreek prices

सोलापूर  ः सोलापूरबाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात कोथिंबीर, मेथी, शेपू या भाज्यांच्या दरात सुधारणा झाली. त्याशिवाय बटाटा, वांगी, सिमला मिरची यांचे दरही पुन्हा स्थिर राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. 

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात कोथिंबीर, मेथी, शेपू या भाज्यांची आवक तशी जेमतेम राहिली. पण मागणी असल्याने त्यांच्या दरात किंचित सुधारणा झाली. भाज्यांची आवक स्थानिक भागातूनच अधिक झाली. प्रत्येकी दहा ते बारा हजार पेंढ्या रोज आवक राहिली.

कोथिंबिरीला शंभर पेंढ्यांसाठी ३०० ते ५०० रुपये, मेथीला ३०० ते ४५० रुपये आणि शेपूला २५० ते ४०० रुपये असा दर मिळाला. त्याशिवाय पालक आणि चुक्यालाही बऱ्‍यापैकी उठाव राहिला. त्यांना प्रत्येकी शंभर पेंढ्यांसाठी २०० ते ३०० रुपये असा दर मिळाला.  बटाटा, वांगी आणि सिमला मिरचीच्या दरातही गेल्या काही दिवसांपासून चढ-उतार होतो आहे. त्यांची आवक रोज ३० ते १०० क्विंटल अशी आहे.

बटाट्याला प्रतिक्विंटलला किमान ३०० रुपये, सरासरी १००० रुपये आणि सर्वाधिक १५०० रुपये, वांग्यांना किमान ५०० रुपये, सरासरी १२०० रुपये आणि सर्वाधिक १८०० रुपये, सिमला मिरचीला किमान ४०० रुपये, सरासरी ६०० रुपये आणि सर्वाधिक १००० रुपये असा दर मिळाला. काकडी आणि गाजराची आवकही तशी जेमतेम राहिली. पण दर बऱयापैकी होते. काकडीला प्रतिक्विंटलला किमान ५०० रुपये, सरासरी ७०० रुपये आणि सर्वाधिक १००० रुपये, तर गाजराला किमान ३०० रुपये, सरासरी ८०० रुपये आणि सर्वाधिक १२०० रुपये असा दर मिळाला.

कांद्याच्या दरात चढ-उतार

गतसप्ताहात कांद्याच्या दरात मात्र चढ-उतार राहिला. कांद्याची आवक वाढली. या सप्ताहात रोज १०० ते ३५० गाड्यांपर्यंत कांद्याची आवक राहिली. मागणीही तशी जेमतेमच होती. पण  दरात चढ-उतार राहिला. कांद्याला प्रतिक्विंटलला किमान २०० रुपये, सरासरी १७०० रुपये आणि सर्वाधिक ३००० रुपये असा दर मिळाला. प्रतिक्विंटलमागे ३०० ते ५०० रुपयाने हा चढ-उतार होत राहिल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com