agriculture news in marathi Cilantro in Solapur, Improvement in fenugreek prices | Agrowon

सोलापुरात कोथिंबीर, मेथीच्या दरात सुधारणा

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 2 मार्च 2021

सोलापूर  ः सोलापूरबाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात कोथिंबीर, मेथी, शेपू या भाज्यांच्या दरात सुधारणा झाली.

सोलापूर  ः सोलापूरबाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात कोथिंबीर, मेथी, शेपू या भाज्यांच्या दरात सुधारणा झाली. त्याशिवाय बटाटा, वांगी, सिमला मिरची यांचे दरही पुन्हा स्थिर राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. 

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात कोथिंबीर, मेथी, शेपू या भाज्यांची आवक तशी जेमतेम राहिली. पण मागणी असल्याने त्यांच्या दरात किंचित सुधारणा झाली. भाज्यांची आवक स्थानिक भागातूनच अधिक झाली. प्रत्येकी दहा ते बारा हजार पेंढ्या रोज आवक राहिली.

कोथिंबिरीला शंभर पेंढ्यांसाठी ३०० ते ५०० रुपये, मेथीला ३०० ते ४५० रुपये आणि शेपूला २५० ते ४०० रुपये असा दर मिळाला. त्याशिवाय पालक आणि चुक्यालाही बऱ्‍यापैकी उठाव राहिला. त्यांना प्रत्येकी शंभर पेंढ्यांसाठी २०० ते ३०० रुपये असा दर मिळाला. 
बटाटा, वांगी आणि सिमला मिरचीच्या दरातही गेल्या काही दिवसांपासून चढ-उतार होतो आहे. त्यांची आवक रोज ३० ते १०० क्विंटल अशी आहे.

बटाट्याला प्रतिक्विंटलला किमान ३०० रुपये, सरासरी १००० रुपये आणि सर्वाधिक १५०० रुपये, वांग्यांना किमान ५०० रुपये, सरासरी १२०० रुपये आणि सर्वाधिक १८०० रुपये, सिमला मिरचीला किमान ४०० रुपये, सरासरी ६०० रुपये आणि सर्वाधिक १००० रुपये असा दर मिळाला. काकडी आणि गाजराची आवकही तशी जेमतेम राहिली. पण दर बऱयापैकी होते. काकडीला प्रतिक्विंटलला किमान ५०० रुपये, सरासरी ७०० रुपये आणि सर्वाधिक १००० रुपये, तर गाजराला किमान ३०० रुपये, सरासरी ८०० रुपये आणि सर्वाधिक १२०० रुपये असा दर मिळाला.

कांद्याच्या दरात चढ-उतार

गतसप्ताहात कांद्याच्या दरात मात्र चढ-उतार राहिला. कांद्याची आवक वाढली. या सप्ताहात रोज १०० ते ३५० गाड्यांपर्यंत कांद्याची आवक राहिली. मागणीही तशी जेमतेमच होती. पण  दरात चढ-उतार राहिला. कांद्याला प्रतिक्विंटलला किमान २०० रुपये, सरासरी १७०० रुपये आणि सर्वाधिक ३००० रुपये असा दर मिळाला. प्रतिक्विंटलमागे ३०० ते ५०० रुपयाने हा चढ-उतार होत राहिल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले. 
 


इतर बाजारभाव बातम्या
सांगलीत बेदाण्याचे सौदे पंधरा दिवस बंदच सांगली ः कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने सांगली...
उन्हाळ कांद्याच्या आवकेसह दरात हळूहळू...नाशिक : जिल्ह्यात गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब...
लवंगी, बेडगी, लाल मिरचीला नगरच्या...नगर ः नगर येथील बाजार समितीत गेल्या दोन ते अडीच...
काबुली हरभऱ्याच्या दरात किंचित सुधारणाजळगाव : खानदेशात काबुली हरभरा दर यंदा टिकून आहेत...
संभाव्य टाळेबंदीमुळे फूल बाजार कोमेजला पुणे : गुढीपाडव्या निमित्त फुलांची वाढलेली मागणी...
कोरोना संकटामुळे हापूसची आवक कमी, दर...पुणे : गुढीपाडव्यासाठी ग्राहकांची हापूसला मोठी...
सोयाबीनची गुढी सात हजारांपार !वाशीम /लातूर/ अकोला ः वाशीम बाजार समितीत सोमवारी...
सोलापुरात बेदाण्याला प्रतिकिलोला २६५...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नगर जिल्ह्यात कांद्याचे दर अस्थिरपुणे नगर : कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या...
केळीला विक्रमी १६०० रुपये दरजळगाव ः  खानदेशात चांगल्या दर्जाच्या केळीला...
 खानदेशात कांद्याची आवक वाढतच दर दबावातजळगाव :  खानदेशात गेल्या आठवड्यात लाल...
काबुली हरभऱ्याचे दर खानदेशात टिकूनजळगाव :  खानदेशात काबुली हरभऱ्याचे दर यंदा...
लातूर, अकोल्यात तुरीने ओलांडला सात...लातूर/अकोला ः राज्यात काही दिवसांपासून तूर, हरभरा...
खानदेशातील बाजारांमध्ये मक्याची आवक घटलीजळगाव : खानदेशात बाजारात मक्याची आवक मध्यंतरी...
औरंगाबादेत आंबा खातोय भाव, ज्वारीचे दर...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
नगरमध्ये कारले, हिरव्या मिरचीच्या दरात...नगर : येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार...
सोलापुरात हिरवी मिरची, गवार, भेंडी...सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीच्या दरात...नाशिक  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
नाशिकमध्ये लेट खरीप कांद्याची आवक वाढलीनाशिक : जिल्ह्यात मार्चअखेर, बँक बंदमुळे रोकड...
सोयाबीनला उच्चांकी सहा हजारांचा भावलातूर/अकोला ः गेल्या काही दिवसांपासून राज्यात...