अमरावती जिल्हा परिषदेत आता व्हॉटसअपवर तक्रारी

citizen whatsapp on complain to Amravati jillha parishad
citizen whatsapp on complain to Amravati jillha parishad

अमरावती ः कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वदूर उपाययोजनांवर भर देण्यात आला आहे. ग्रामीण भागातील जनतेसाठी मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषद प्रशासनाने देखील खबरदारीच्या उपायाअंतर्गत व्हॉटसअपवर तक्रारी स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.

ग्रामीण भागातील जनतेची कामे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून होतात. त्यामुळे जिल्हा परिषदेत नागरिकांची गर्दी होते. त्यातूनच प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता पाहता प्रशासनाकडून खबरदारीच्या उपायांसाठी पुढाकार घेण्यात आला आहे. नागरिकांनी त्यांच्या तक्रारी, समस्या थेट न देता व्हॉटसअपवर पाठविण्याचे आवाहन करण्यात आला आहे. त्याकरिता ९११२२९६१७६ हा क्रमांक देण्यात आला आहे. या क्रमांकासोबतच ईमेलच्या माध्यमातूनही तक्रार करता येणार आहे. 

निवेदन किंवा तक्रार मिळाल्याची पोच तसेच करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती संबंधितांच्या व्हॉटसअपवर देण्यात येणार आहे. तालुकास्तरावर पंचायत समितीमार्फत तक्रारी स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी  सांगितले.

गावातील आशा वर्करच्या माध्यमातून विदेशातून आलेल्या व्यक्‍तींची माहिती मिळविण्याचा प्रयत्न प्रशासन करीत आहे. एखादा व्यक्‍ती परदेशातून आलेला असल्यास आणि ती माहिती त्याने प्रशासनापासून दडवून ठेवलेली असल्यास आशा वर्कर त्याबाबत प्रशासनाला कळवतील, असे देखील आदेशात करण्यात आले आहे.

आठवडी बाजार होणार लॉकआउट ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्यात आल्या. त्यानंतर आता शेकडो लोकांचा संपर्क येणारा आठवडी बाजारदेखील स्थगित करण्याचा विचार प्रशासनाकडून केला जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com