पालकमंत्र्यांवर पुण्यातील नागरिकांचा रोष 

पालकमंत्री चंद्रकांत पाटील
पालकमंत्री चंद्रकांत पाटील

पुणे  : अरण्येश्‍वर भागातील टांगेवाला कॉलनी येथे पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी गेलेले पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली, तसेच येथून निघून जा, अशा घोषणाही नागरिकांनी दिल्या. दरम्यान, या घटना राजकारणासाठी घडविल्या जातात, असा आरोप पाटील यांनी केला आहे. 

पुण्यात अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची दाणादाण उडाली. सरकारी यंत्रणा मदतीसाठी उशिरा आली, अशी नागरिकांची तक्रार आहे. या आपत्तीमध्ये नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यात पालकमंत्रीच शहरात नाही, अशी लोकांची भावना होती. नागरिकांच्या या रोषाचा शुक्रवारी चंद्रकांत पाटील यांना सामना करावा लागला. 

टांगेवाला कॉलनी येथे ते पाहणी करण्यासाठी गेले असता, नागरिकांनी त्यांना निघून जाण्यास सांगितले. चंद्रकांत पाटील यांचा निषेध आणि हाय हायच्या घोषणा देण्यात आल्या. ते फक्त फोटोसाठी आल्याचा आरोप संतप्त नागरिकांनी केला. त्यामुळे पाटील यांना तिथून काढता पाय घ्यावा लागला. या दरम्यान त्यांच्या सुरक्षारक्षकांनी हमरीतुमरी केल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. 

राजकारणासाठी हा प्रकार  वादाचा कोणताही प्रकार नागरिकांनी केल्याच्या वृत्ताचा चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत इन्कार केला. मात्र काही लोक राजकारणासाठी असे प्रकार घडवून आणतात, असा आरोपही त्यांनी केला. ही वेळ राजकारणाची नाही, तर खांद्याला खांदा लावून लढण्याची आहे, असे ते म्हणाले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com