Agriculture news in Marathi, Citizens for the conservation of the trees, the staff said | Agrowon

वृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी सरसावले
टीम अॅग्रोवन
सोमवार, 15 जुलै 2019

परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये यंदा लागवड करण्यात आलेल्या वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी सुजाण नागरिक, तसेच विद्यापीठाचे आजी-माजी कर्मचारी सरसावले आहेत. सर्वांच्या सहभागातून वृक्षांना सुरक्षा कुंपण लावण्यात येणार आहेत.

परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये यंदा लागवड करण्यात आलेल्या वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी सुजाण नागरिक, तसेच विद्यापीठाचे आजी-माजी कर्मचारी सरसावले आहेत. सर्वांच्या सहभागातून वृक्षांना सुरक्षा कुंपण लावण्यात येणार आहेत.

कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांच्या संकल्पनेतून कृषी विद्यापीठामध्ये स्‍वच्‍छ परिसर, हरित परिसर, सुरक्षित परिसर उपक्रम राबविला जात आहे. परभणी येथील कृषी विद्यापीठ परिसर, तसेच विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील मराठवाडा विभागातील विविध संशोधन केंद्र, महाविद्यालय, कृषी विज्ञान केंद्र आदी ठिकाणच्या प्रक्षेत्रावर या वर्षी एक लाख वृक्ष लागवड तसेच मोहीम सोमवार (ता. १) हरित क्रांतीचे प्रणेते (कै.) वसंतराव नाईक यांच्‍या जयंतीपासून हाती घेण्यात आली. 

आजवर विविध ठिकाणच्या प्रक्षेत्रावर हजारो वृक्षांची लागवड करण्‍यात आली आहे. डॉ. ढवण यांनी परिसरात येणाऱ्या व्‍यक्‍तींनी वृक्षसंवर्धनाची जबाबदारी घेण्‍याचे आवाहन केले होते. या आवाहनास प्रतिसाद देत विद्यापीठ परिसरात मॅार्निग आणि इव्‍हनिंग वॉकसाठी येणाऱ्या सुजाण नागरिकांनी सुरक्षा कुंपण खरेदीसाठी रोख मदत देऊन योगदान दिले. यामध्ये शहरातील नागरिक, डॉक्‍टरांचा ग्रुप, विद्यापीठातील सेवानिवृत्त कर्मचारी, विद्यापीठ कर्मचारी पतसंस्‍था आदींसह अनेकांनी वैयक्‍तिकरीत्या मदत देऊन योगदान दिले. 

कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी स्वतः १०  हजार रुपये, डॉ. हिराकांत काळपांडे यांनी २० हजार रुपये मदत देऊन प्रारंभ करण्यात आला. डॉ. ढवण यांच्याकडे शुक्रवारी (ता. १२) देणगीची रक्कम सुपूर्त करण्‍यात आली.

या वेळी डॉक्टर्स ग्रुपच्या डॉ. सुभदा दिवाण, डॉ. संध्‍या मानवतकर, डॉ. प्रियंका मुळे, डॉ. भारती आहुजा, डॉ. स्मिता खोडके, सेवानिवृत कर्मचारी संघाचे शिवाजीराव काकडे, विद्यापीठ पतसंस्‍थेचे प्रा. राजाभाऊ बोराडे, डॉ. राजेश कदम, डॉ. प्रवीण घाडगे, कृष्‍णा जावळे, डॉ. टी. बी. भुक्तार, एकनाथ कदम, ए. डी. काळे, डॉ. हिराकांत काळपांडे, डॉ. वीणा भालेराव, श्री. कोकणे, डॉ. जयकुमार देशमुख, डॉ. रणजित चव्‍हाण, विलास कौसडीकर उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. हिराकांत काळपांडे यांनी केले.

इतर ताज्या घडामोडी
पुणे बाजार समिती प्रशासकपदी वर्णी...पुणे  : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे...
प्रतिकूल हवामानामुळे जुन्नर तालुक्यातील...नारायणगाव, जि. पुणे  : दोन महिन्यांपासून...
नगर जिल्ह्यातील दहा ते अकरा तालुक्यांवर...नगर  ः राज्याच्या काही भागांत जोरदार पावसाने...
पीक नुकसानीबाबत शेतकऱ्याने मांडली कृषी... कऱ्हाड, जि. सातारा ः घरात हुतं नव्हतं...
खानदेशात कापूस पिकात मर रोग, मूळकूजजळगाव ः खानदेशात जळगाव, धुळे व नंदुरबार...
...अन् नारायण राणे काँग्रेसमध्ये गेले...मुंबई  ः कोणताही अन्याय सहन करायचा नाही, या...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात केळी, नारळ, सुपारी... सिंधुदुर्ग  ः कुणी तीन लाख तर कुणी दोन...
राष्ट्रपतींनी घेतला सूतकताईचा अनुभववर्धा  ः राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी...
पीएच.डी.साठी गुरुवारी सामाईक प्रवेश...पुणे ः  राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतील...
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-... भंडारा  ः विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस...
कोयना धरणातून ६७ टीएमसी पाण्याचा विसर्गसातारा : या महिन्याच्या सुरवातीपासून मुसळधार...
मराठवाड्यात पाणीसाठ्याची स्थिती विदारकऔरंगाबाद : अर्धा पावसाळा लोटला तरीही मराठवाड्यात...
बुलडाणा जिल्ह्यात निर्माण झाली १३२५...बुलडाणाः जिल्हा प्रशासन व भारतीय जैन संघटना...
कोकणात नुकसानभरपाईचे वेगळे निकष लावा :...रत्नागिरी : ‘‘सांगली, कोल्हापूरप्रमाणेच कोकणातील...
सिंधुदुर्गात अतिवृष्टीने महावितरणचे चार...सिंधुदुर्ग : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि...
शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर...जालना : सेंद्रिय शेतीमध्ये रासायनिक खतांचा...
परभणी जिल्ह्यात पाण्याअभावी फळबाग...परभणी : जिल्ह्यात गतवर्षीची दुष्काळी स्थिती आणि...
औरंगाबादेत कांदे १००० ते १६०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगावच्या पश्‍चिम भागातील प्रकल्प कोरडेचजळगाव ः खानदेशात अनेक भागांत पाऊसमान चांगले असले...
प्रौढांपेक्षा अळ्यांच्या वेगळ्या...गेल्या काही वर्षांमध्ये हानीकारक ठरणाऱ्या किडी...