कोरोना रोखण्यासाठी नागरिकांचे सहकार्य हवे ः भुजबळ

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असून तो रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. या प्रयत्नांना नागरिकांच्या सहकार्याची जोड आवश्यक असून नागरिकांनी ते करावे, असे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.
Citizens' cooperation is needed to stop Corona: Bhujbal
Citizens' cooperation is needed to stop Corona: Bhujbal

नाशिक : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असून तो रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. या प्रयत्नांना नागरिकांच्या सहकार्याची जोड आवश्यक असून नागरिकांनी ते करावे, असे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

पालकमंत्री भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी (ता. ८) कोविड-१९ आढावा व उपाय योजनांबाबत चांदवड येथील मध्यवर्ती प्रशासकीय सभागृहात चांदवड, देवळा, बागलाण या तालुक्यांची कोरोना संसर्गाबाबत आढावा बैठक पार पडली.यावेळी श्री. भुजबळ बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, खासदार डॉ. भारती पवार, जि. प. उपाध्यक्ष सयाजीराव गायकवाड, आमदार दिलीप बोरसे, जिल्हा परिषद सदस्य नूतन आहेर, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार, प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे, तहसीलदार प्रदीप पाटील, दत्ता शेजुळ, जितेंद्र इंगळे यांच्यासह अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते.

श्री. भुजबळ म्हणाले, तालुकानिहाय, शहरनिहाय, गावनिहाय आपत्ती व्यवस्थापन समित्यांची स्थापना करून कोविडबाबत करावयाच्या उपाययोजनांबाबत माहिती तसेच जनजागृती करण्यात यावी. आरोग्य विभागाने ‘डोअर टू डोअर’ तपासणी करून रुग्णांचा शोध घ्यावा. मृत्यू दर कमी करण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न करण्यात यावे. कोमॉर्बीड रुग्णांचा शोध घेऊन त्यांची नियमित तपासणी करण्यात यावी. या वर्गातील रुग्णांना योग्य ते औषधोपचार करून त्यावर लक्ष ठेवण्यात यावे. शहरात नव्याने रुग्ण वाढणार नाहीत त्यासाठी सूक्ष्म कंटेन्मेंट झोनचा वापर करावा. यासाठी पोलिस प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना यावेळी श्री. भुजबळ यांनी दिल्या.

जिल्हा सामान्य रुग्णालयात नव्याने सुरू झालेल्या शासकीय कोव्हीड टेस्टिंग लॅबमध्ये संशयितांचा स्त्राव पाठवावा, जेणेकरून जलद गतीने अहवाल मिळतील. ज्या तालुक्यामध्ये ऑक्सिजन बेड्स उपलब्ध नसतील त्या ठिकाणी कायमस्वरूपी ऑक्सिजन बेड्सची निर्मिती करण्यात यावी. यावेळी डॉ. भारती पवार,  बाळासाहेब क्षीरसागर, दिलीप बोरसे यांनी चर्चेत भाग घेऊन विविध सूचना केल्या.

द्राक्ष व्यापाऱ्यांबाबत विशेष काळजी घ्या सटाणा तालुक्यात द्राक्ष बागायतदार यांनी बाहेरून येणाऱ्या व्यापारी लोकांबाबत विशेष काळजी घ्यावी, यासाठी आरोग्य विभाग आणि पोलिस प्रशासन यांनी समन्वय राखत योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना श्री. भुजबळ यांनी दिल्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com