बुलडाणा : पाण्यासाठी नागरिकांची वणवण

बुलडाणा : पाण्यासाठी नागरिकांची वणवण

बुलडाणा : एकीकडे लोकसभा निवडणुकीचा धुमधडाका सुरू आहे. दुसरीकडे मात्र नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी फरफट सुरू आहे. मार्च संपायच्या आतच जिल्ह्यात टँकरची संख्या शंभरपेक्षा अधिक झाली आहे. दिवसेंदिवस त्यात भर पडत आहे. जिल्ह्यात सध्या १०३ गावांमधील सुमारे एक लाखापेक्षा अधिक लोकसंख्येला १०८ टँकरच्या माध्यमातून पाणी पुरविण्यात येत आहे. 

या वर्षात कमी पाऊस झाला. त्यामुळे प्रकल्पात पाणीसाठा झाला नाही. शिवाय जमिनीतही पाणी न जिरल्याने पाणी पातळी घसरली. यामुळे दिवाळीनंतरच पाणीटंचाई सुरू झाली होती. सिंचनावरही या पाणी समस्येचा मोठा ताण निर्माण झाला आहे. पाणीटंचाईची झळ नागरिकांप्रमाणेच जनावरांना, वन्यजीवांनाही झेलावी लागत आहे.

पावसाळ्यापूर्वी एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांचा कालावधी अद्याप शिल्लक आहे. पाणीटंचाईमुळे या वर्षी ग्रामीण भागात कूलरच्या वापरावरही निर्बंध येण्याची चिन्हे आहेत. सध्या उष्णता वाढली असतानाही बाजारपेठेत कूलरला फार मागणी नसल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे.   

जिल्ह्यात पाणीटंचाईची तीव्रता प्रामुख्याने सिंदखेडराजा, मोताळा, खामगाव, शेगाव, नांदुरा, देऊळगावराजा तालुक्यात सर्वाधिक आहे. या तालुक्यातील ग्रामीण भागातून दररोज टँकर सुरू करण्याबाबतचे प्रस्ताव तहसील प्रशासनाकडे दाखल होत आहेत.

आणखी तीन गावांसाठी टँकर मंजूर पाणीटंचाई लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने सिंदखेड राजा तालुक्यातील निमखेड गावाला ७१९ लोकसंख्येसाठी एक टँकर मंजूर केले. खामगाव तालुक्यातील गणेशपूर येथील २४२१ लोकसंख्येसाठी एक, तर नायदेवी गावच्या ११७२ लोकसंख्येसाठी एक टँकर सुरू करण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com