मंगळवेढ्यात पाण्यासाठी पायपीट

मंगळवेढ्यात पाण्यासाठी नागरिकांची पायपीट
मंगळवेढ्यात पाण्यासाठी नागरिकांची पायपीट

सोलापूर : पावसाने पाठ फिरवली असल्याने कायम दुष्काळी असलेल्या मंगळवेढा तालुक्‍यातील ग्रामीण भागात नागरिकांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी होत असलेली पायपीट लक्षात घेऊन प्रशासनाने तत्काळ वाडी-वस्तीवर टॅंकर सुरू करण्याची मागणी नागरिकांतून जोर धरत आहे.

कायम दुष्काळी असलेल्या मंगळवेढ्यातील ग्रामीण भागात सध्या पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. यंदा पाऊस खूपच कमी झाल्याने शेतीच्या उत्पन्नातही मोठ्या प्रमाणात घट झाली. अनेक शेतकऱ्यांचा कांदा पाऊस न झाल्याने जळून गेला. काही शेतकऱ्यांनी हलक्‍याशा झालेल्या पावसावर बाजारातून महागडी खते, बी-बियाणे विकत आणून पेरणी केली होती. मात्र, पेरणी झाल्यावर पाऊस न आल्याने कोणतेही पीक हाती आले नसून जनावरांच्या चाऱ्यांचा प्रश्‍नही गंभीर होत चालला आहे.

सध्या मंगळवेढ्याच्या आसपासच्या गावांमध्ये ऊसतोडणी चालू असल्याने काही प्रमाणात शेतकरी वाडे विकत घेऊन पशुधन जगवत आहेत. जनावरांच्या चाऱ्यासाठी तत्काळ योग्य उपाययोजना करण्याची मागणी शेतकरी व पशुपालकांतून होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com