शेतात घेतलेल्या तुतीच्या पिकावरच रेशीम अळ्यांचे संगोपन करून कोषांचे उत्पादन घेतले जाते.
ताज्या घडामोडी
‘वान’च्या पाण्याविरुद्ध नागरिकांचे धरणे
अकोला : तेल्हारा तालुक्यातील वान प्रकल्पाचे पाणी बाळापूर मतदार संघात ६९ गावांना देण्यास विरोध वाढत आहे. तेल्हारा तहसील कार्यालयासमोर शेकडो नागरिकांनी मंगळवारी (ता.२४) धरणे आंदोलन केले.
अकोला : तेल्हारा तालुक्यातील वान प्रकल्पाचे पाणी बाळापूर मतदार संघात ६९ गावांना देण्यास विरोध वाढत आहे. तेल्हारा तहसील कार्यालयासमोर शेकडो नागरिकांनी मंगळवारी (ता.२४) धरणे आंदोलन केले. याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
वान प्रकल्पातील पाणी आरक्षित करीत ते बाळापूर मतदार संघातील गावांना देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर झाला आहे. याची माहिती मिळताच वान प्रकल्पाच्या क्षेत्रातील शेतकरी व नागरिकांमधून विरोध वाढलं आहे. वान प्रकल्पासाठी आम्ही जमिनी दिल्या. त्यामुळे त्यातील पाणी आता इतर कुठेही नेले जाऊ नये, अशी मागणी आंदोलकांनी शासनाकडे केली आहे.
यापूर्वी रास्ता रोको, निवेदन, पत्रकार परिषद घेत शेतकऱ्यांनी भूमिका मांडली. कुठल्याही स्थितीत आता नवीन योजनांसाठी वान प्रकल्पातील पाणी आरक्षित केले जाऊ नये, अशी भूमिका नागरिकांनी घेतली आहे.
वारी भैरवडगड येथे वान नदीवर साकारलेला हा प्रकल्प मुळात तेल्हारा व संग्रामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी बांधण्यात आला. दोन्ही तालुक्यातील हजारो हेक्टर शेतीचे सिंचन याद्वारे होणे अपेक्षित होते. परंतु, प्रकल्प बांधल्यानंतर त्यातील पाण्याची क्षमता ८४.४३४ दलघमी झाली. त्यातील ३ दलघमी पाण्याचे बाष्पीभवन होते. तसेच ३ दलघमीची गळती होते. त्यामुळे प्रकल्पात ७८.४३४ दलघमी पाणी उपलब्ध राहते.
याच पाण्यातून यापूर्वी अकोट, तेल्हारा, जळगाव जामोद शहरांसह ग्रामीण भागातील पाणी पुरवठा योजनांसाठी आरक्षण करण्यात आले आहे. यामुळे सिंचनाच्या पाण्यातील वाटा आधीच कमी झाला. असे असताना आता बाळापूर मतदार संघात पुन्हा ६९ गावांसाठी पिण्याचे पाणी पुरविण्याचा प्रस्ताव शासनाकडे देण्यात आला. यासाठी पाणी आरक्षित केल्यास पुन्हा सिंचनासाठीचे पाणी कमी होईल, अशी भीती आंदोलक व्यक्त करीत आहेत.
यामुळेच पाणी नेण्यास गावागावात विरोध वाढू लागला आहे. हा प्रकार थांबविण्यात यावा, यासाठी मंगळवारी तहसिल कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सर्वपक्षीय नेते, शेतकरी, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
- 1 of 1021
- ››