हिंगोली ः जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात ३ लाख ५८ हजार ४०३ हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे.
ताज्या घडामोडी
मोसंबी केंद्राच्या रोपवाटिकेची राष्ट्रीय मानांकनासाठी तपासणी
बदनापूर, जि. जालना : ‘‘राष्ट्रीय पातळीवरील नामांकन मिळविण्यासाठी येथील मोसंबी संशोधन केंद्राच्या रोपवाटिकेची अन् मातृवृक्षांची राष्ट्रीय बागवणी मंडळ समितीतर्फे शनिवारी (ता.२८) तपासणी करण्यात आली.
बदनापूर, जि. जालना : ‘‘राष्ट्रीय पातळीवरील नामांकन मिळविण्यासाठी येथील मोसंबी संशोधन केंद्राच्या रोपवाटिकेची अन् मातृवृक्षांची राष्ट्रीय बागवणी मंडळ समितीतर्फे शनिवारी (ता.२८) तपासणी करण्यात आली.
या समितीमध्ये सोलन (हिमाचल प्रदेश) कृषी विद्यापीठाचे माजी संचालक संशोधन डॉ. जे. पी. शर्मा, राष्ट्रीय बागवणी मंडळाचे उपसंचालक होशियारसिंग, कृषी विज्ञान केंद्राच्या विषय विशेषज्ञ डॉ. दीपाली कांबळे, तंत्र अधिकारी राजेंद्र बेडले आदीं उपस्थित होते.
या वेळी प्रक्षेत्रावर लागवड केलेल्या नुसेलर, काटोल गोल्ड (मोसंबी) साई सरबती (निंबु), नागपूर संत्री (संत्री) आदी जातींची व अलिमो, रंगपूर आदी खुंट रोपांची, तसेच नव्याने लागवड केलेल्या लिंबाच्या दहा जातींची पाहणी केली.
रोपवाटिकेत तयार केलेल्या मोसंबी, लिंबू, संत्रा आदी कलमांची समितीने काटेकोरपणे पाहणी करून संपूर्ण रेकॉर्डची बारकाईने तपासणी केली. या वेळी केंद्राचे प्रमुख शास्रज्ञ डॉ. संजय पाटील यांनी समितीस संपूर्ण शास्त्रीय माहिती देऊन मराठवाड्यातील रोपवाटिका धारकांनी राष्ट्रीय मानांकन मिळवून घ्यावेत, असे आवाहन केले. या वेळी केंद्रातील त्रिवेणी सांगळे, सुरेश गजर आदी उपस्थित होते.