agriculture news in marathi Citrus fruit advisory | Agrowon

लिंबूवर्गीय फळपीक सल्ला

केंन्द्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था, नागपूर.
शनिवार, 2 मे 2020

शेतीमध्ये काम करण्याची परवानगी असली तरी ते काम स्वतःची आणि आपल्या कामगारांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेऊन करावयाचे आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येक मजूरांमध्ये दोन मीटरचे अंतर राखावे. प्रत्येकाने चेहऱ्याभोवती घट्ट मास्क लावावा. दर काही वेळानंतर साबणाने हात स्वच्छ धुवून व्यक्तीशः स्वच्छता राखावी. शेतीची उपकरणे व यंत्रे चांगल्या प्रकारे स्वच्छ करावीत

शेतीमध्ये काम करण्याची परवानगी असली तरी ते काम स्वतःची आणि आपल्या कामगारांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेऊन करावयाचे आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येक मजूरांमध्ये दोन मीटरचे अंतर राखावे. प्रत्येकाने चेहऱ्याभोवती घट्ट मास्क लावावा. दर काही वेळानंतर साबणाने हात स्वच्छ धुवून व्यक्तीशः स्वच्छता राखावी. शेतीची उपकरणे व यंत्रे चांगल्या प्रकारे स्वच्छ करावीत.

 • अंबिया बहारात झालेल्या फळ धारणेसाठी सिंचन सुरू ठेवावे. येणारा उन्हाळा व वाढत्या तापमानाला अनुसरून पाण्याच्या पाळीमधील अंतर ६ ते ७ दिवसांचे करावे.
 • संत्रा व मोसंबीच्या ८ वर्षाच्या झाडाला ६५ लीटर दिवसाआड प्रती झाड आणि १० वर्ष आणि त्यावरील झाडाला २०० लीटर दिवसआड प्रती झाड पाणी द्यावे.
 • लिंबाच्या १ वर्षाच्या झाडाला ११ लीटर, २ वर्षाच्या झाडाला १६ लीटर, ८ वर्ष आणि त्यावरील झाडाला १०० लीटर पाणी दिवसआड प्रती झाड या प्रमाणात द्यावे.
 • उन्हाळ्यातील फळगळती थांबवण्यासाठी झाडांच्या बुंध्याभोवती शेतातील गवत, तणस ,गव्हांडा इ. सेंद्रिय घटकांचा थर देऊन आच्छादन करावे. यामुळे पाण्याचे बाष्पीभवन कमी होते. जमिनित ओलावा टिकून राहतो. अंबिया बहाराची फळगळ कमी होण्यास मदत होते.
 • १ वर्षाच्या संत्रा झाडाला १०८ ग्रॅम युरिया किंवा २५० ग्रॅम अमोनियम सल्फेट व १५७ ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट सोबत प्रत्येकी २५ ग्रॅम झिंक सल्फेट, फेरस सल्फेट आणि मँगेनीज सल्फेट द्यावे. दोन वर्षाच्या झाडास दुप्पट, तीन वर्षाच्या तिप्पट आणि चार वर्षाच्या झाडाला चौपट खतांची मात्रा २०-२५ किलो शेणखतात मिसळून द्यावी. ही रासायनिक आणि सेंन्द्रीय खते झाडाच्या भोवती व माती ओलसर असताना द्यावीत.
 • थ्रीप्स, पाने पोखरणारी अळी आणि मिलीबग या कीडींचा प्रार्दुभाव आढळून येत आहे. त्यांच्या नियंत्रणाकरीता, फवारणी प्रती लीटर पाण्यात इमिडाक्लोप्रीड ०.५ मिली किंवा डायमिथोएट २ मिली. मिसळून आवश्यकतेनुसार दुसरी फवारणी १५ दिवसांच्या अंतराने करावी.
 • मिली बग नियंत्रणासाठी, बागेतील व परिसरातील मुंग्यांची वारूळे नष्ट करावी. झाडांच्या बुंध्यावर व पानांवर फवारणी प्रती लीटर पाण्यात क्लोरपायरीफॉस (२० ईसी) २ मिली मिसळून फवारणी करावी.
 • या महिन्यात संत्र्यावर कोळ्याचाही प्रार्दुभाव दिसून येतो. या कीडीच्या नियंत्रणासाठी फवारणी प्रती लीटर पाण्यात डायकोफॉल (१.८ ईसी) २ मिली मिसळून १५ दिवसानंतर पुन्हा दुसरी फवारणी करावी.
 •  मिली बग नियंत्रणासाठी, मुंग्यांची वारूळे नष्ट करावी. झाडांच्या बुंध्यावर व पानांवर क्लोरपायरीफॉस (२० ईसी) २ मिली प्रति लीटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
 •  मृग बहार बागेमध्ये वाळलेल्या फांद्याच्या २ सेंमी खालील ओला भाग काढून टाकावा. अशा झाडांवर कार्बेनडाझीम १ ग्रॅम प्रती लीटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
 •  अंबिया बहाराची फळगळ थांबण्यासाठी २-४ डी हे १.५ ग्रॅम किंवा जिबरेलिक आम्ल १.५ ग्रॅम अधिक युरिया १ किलो प्रती १०० लीटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. जास्त फळगळ असल्यास फवारणी १५ दिवसांनी पुन्हा करावी. नियमित देखरेखीखाली सिंचन सुरू ठेवावे.
 •  नर्सरी धारकांनी पन्हेरी उगवणीसाठी १ भाग काळीमाती, १ भाग रेती, वाळू आणि १ भाग कुजलेले शेणखत यांचे मिश्रण सिमेंट कॉंक्रीटच्या प्लॅटफार्मवर १.५ फूट जाडीचा थर करून पसरवावे. यावर पाणी टाकून ते पूर्णपणे ओले करावे. यावर १०० मायक्रॉंन जाडीचा पारदर्शक पॉलीथिन पेपरने झाकावे. यातून वाफ बाहेर जाऊ नये, यासाठी पेपर चारही बाजूने पक्की झाकावे.

संपर्क-  ०७१२- २५००८१३
(केंन्द्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था, नागपूर.)


इतर फळबाग
मणीगळ, मणी विरळणी यांकडे लक्ष द्यावेसध्याच्या परिस्थितीत द्राक्ष बागेतील वातावरणाचा...
कृषी सल्ला ( कोकण विभाग)नारळ   फळधारणा वाढत्या तापमानासोबतच...
आंब्यावरील कीड, रोग नियंत्रण व्यवस्थापनकोकणातील हवामानाची सद्यःस्थिती जाणून घेता काही...
तापमानात घट होण्याच्या स्थितीत...सध्याच्या परिस्थितीत निवार चक्रीवादळ तमिळनाडू व...
ढगाळ, पावसाळी वातावरणात करावयाच्या...सध्याच्या परिस्थितीत ठिकठिकाणी ढगाळ वातावरण असून...
हिवरेबाजार शिवारात सीताफळांचा गोडवाआदर्श गाव हिवरेबाजार (ता.जि. नगर) गावासह...
थंडीमध्ये केळी बागेची घ्यावयाची काळजीसद्यःस्थितीत खानदेश व महाराष्ट्रातील अन्य भागात...
कीड रोगांच्या नियंत्रणासाठी आतापासूनच...कोकण विभागातील उष्ण व दमट हवामान आंबा पिकावर...
पावसाळी वातावरण, ओलाव्याचे बागेतील...गेल्या आठवड्यात बऱ्याच ठिकाणी पावसाळी वातावरण...
केळी पिकावरील मर रोगाचे व्यवस्थापनझाडावरील जुन्या पानांच्या देठाकडील तळभागी फिकट...
डाळिंबातील बुरशीजन्य मर रोगाचे...फळ तोडणीनंतर ताणावर असताना किंवा पिकाच्या...
डाळिंब फळबागेचे हंगामनिहाय नियोजनतेलकट डागासाठी, पिठ्या ढेकूण किंवा बागेतील...
द्राक्ष पीक : पावसामुळे उद्भवलेल्या...सध्याच्या परिस्थितीचा विचार करता, सर्व द्राक्ष...
काजूसाठी हवामान आधारित फळपीक विमा योजना...ही योजना काजू पीक विम्यासाठी अधिसूचित कोल्हापूर,...
नारळावरील चक्राकार पांढरी माशीरुगोज चक्राकार पांढरी माशीच्या प्रादुर्भावामुळे...
द्राक्ष फळछाटणीनंतरचे अन्नद्रव्य...द्राक्ष वेलीची उत्पादकता ही प्रामुख्याने...
सीताफळावरील पिठ्या ढेकूण नियंत्रण...पिठ्या ढेकूण (मिलीबग)ही कीड झाडाच्या सालीच्या...
केळी पिकावरील कुकुंबर मोझॅक व्हायरसचे...यवतमाळ जिल्ह्यामध्ये महागाव तालुका केळी...
द्राक्ष फळछाटणीनंतरची कार्यवाहीसध्याच्या परिस्थितीत पावसाळी वातावरण संपत आल्याचे...
केळी पिकातील कंद कुजव्या रोगाचे...कंदकुजव्या रोगाचा प्राथमिक प्रसार रोगट कंदापासून...