व्यवस्थापन मोसंबी बहराचे

सध्याच्या वातावरणात मोसंबीच्या आंबे बहराच्या फळांची गळ होण्यास सुरुवात झालेली आहे. अशावेळी बागेत पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. पाण्याचा निचरा करावा.
citrus fruit crop advisory
citrus fruit crop advisory

सध्याच्या वातावरणात मोसंबीच्या आंबे बहराच्या फळांची गळ होण्यास सुरुवात झालेली आहे. अशावेळी बागेत पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. पाण्याचा निचरा करावा. मृगाच्या नवीन पालवीवर पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसत आहे. त्यासाठी  नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात. आंबे बहराचे व्यवस्थापन

  • उन्हाळ्यात पाण्याची उपलब्धता असणाऱ्या शेतकऱ्यांनी आंबे बहर घेतलेला आहे. सद्यःस्थितीत आंबेबहाराच्या बागेत कवडी पडायला सुरुवात झालेली दिसत आहे. या बहाराची फळे ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यात तयार होतात. परंतु यावर्षी ऑगस्टच्या शेवटी बहार सुरू होईल. फळामध्ये गोडी वाढविण्यासाठी शिफारशीनुसार पोटॅशचा वापर करावा. पोटॅशची झाडाच्या वयाप्रमाणे वेगवेगळी मात्रा द्यावी लागते. सात ते आठ वर्षे वयाच्या झाडांना ठिबक संचातून दर चौथ्या दिवशी एकरी ५० किलो पोटॅश द्यावे.
  • सध्या सर्वत्र पर्जन्यमान चांगले आहे. पावसाचे पाणी जमिनीत चांगल्याप्रकारे मुरलेले आहे. मात्र या काळात जोराचा पाऊस झाल्यास, आंबेबहाराच्या फळांची गळ मोठ्या प्रमाणावर होणार आहे. काही ठिकाणी फळगळ होण्यास सुरुवात झाली आहे. अशावेळी बागेत पाणी साचू देऊ नये. पाण्याचा निचरा करावा. अन्यथा फळगळीच्या प्रमाणात वाढ होऊन जास्त नुकसान होऊ शकते. यासाठी ऑगस्ट महिन्यापासून एक महिन्याच्या अंतराने नॅपथेलिक असेटिक ॲसिड १० मिलिग्रॅम अधिक युरिया १० ग्रॅम अधिक कार्बेन्डाझिम १ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.( राष्ट्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थेची शिफारस)
  • आंबेबहारातील फळांची प्रत उत्तम असते. पावसाळ्यात फळांच्या देठाजवळ बुरशीचा शिरकाव जास्त होतो. पावसाचे पाणी जमिनीवर पडून माती घेऊन उडतात, त्यासाठी झाडाखाली गवताचे आच्छादन करावे.  फळांचा मातीसोबत येणारा संबंध टाळला जाईल.
  • मृग बहराचे व्यवस्थापन  

  • सध्या मृग बहराची फळे बोराच्या व सुपारीच्या आकाराची झाली आहेत. यावर्षी उन्हाळ्यात जादा ताण नसल्यामुळे आणि मृगाचा पाऊस वेळेवर झाल्यामुळे बहुतांश ठिकाणी मृगबहाराच्या फळांची गळ होताना दिसत आहे. मृगाचा पाऊस हळूहळू झाला असता तर ही परिस्थिती उद्भवली नसती. 
  • फळे बोराच्या आकाराची झाल्यावर, फळांच्या देठावर कोलेट्रोट्रीकम या बुरशीची वाढ होऊन फळे काळसर पडून गळतात. 
  • नियंत्रण-(फवारणी प्रति लिटर पाणी) कार्बेन्डाझिम २.५ ग्रॅम 

    किडीचा प्रादुर्भाव  नियंत्रण (फवारणी प्रति लिटर पाणी) पाने खाणारी अळी निंबोळीवर आधारित कीटकनाशक (ॲझाडिरॅक्टिन १५०० पीपीएम ) ५ मिलि रस शोषण करणाऱ्या किडी

  • क्विनॉलफॉस २ मिलि किंवा
  • इमिडाक्लोप्रीड ०.५ मिलि ​  (ॲग्रेस्को शिफारस आहे)
  • नवीन लागवडीचे व्यवस्थापन

  • नवीन लागवड केलेल्या रोपावर, डोळा बांधलेल्या भागापासून खाली नवीन फूट आल्यास सिकेटरच्या मदतीने काढून टाकावी. त्यामुळे रोप जोमदार वाढीस लागेल. 
  • कलम बांधलेल्या भागावरील पॉलिथिनची पट्टी सोडावी. अन्यथा रोपे पिवळी पडून मरण्याची शक्‍यता असते. 
  • संपर्क- डॉ. संजय पाटील, ९८२२०७१८५४  (प्रमुख, मोसंबी संशोधन केंद्र, बदनापूर, जि.जालना.)

    महाराष्ट्र

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com