राज्यात मोसंबी १००० ते ४००० रुपये प्रतिक्विंटल

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. २०) मोसंबींची २० क्विंटल आवक झाली. त्यांना १००० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.
 Citrus in the state is Rs. 1000 to 4000 per quintal
Citrus in the state is Rs. 1000 to 4000 per quintal

औरंगाबादमध्ये १००० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. २०) मोसंबींची २० क्विंटल आवक झाली. त्यांना १००० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.

औरंगाबाद बाजार समितीमध्ये १० सप्टेंबरला १५ क्विंटल आवक झाली. त्यांना १५०० ते ३५०० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. १२ सप्टेंबरला ११ क्विंटल आवक झालेल्या मोसंबींचे दर २२०० ते ३५०० रुपये प्रति क्विंटल राहिले. १३ सप्टेंबरला मोसंबींची आवक ४२ क्विंटल, तर दर १००० ते २५०० रुपये प्रति क्‍विंटल राहिले. 

१४ सप्टेंबरला ३४ क्विंटल आवक झालेल्या मोसंबीला १२०० ते २२०० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. १५ सप्टेंबरला मोसंबींची आवक ३७ क्विंटल, तर दर ५०० ते २५०० रुपये प्रति क्विंटल राहिले. १६ सप्टेंबरला ३२ क्विंटल आवक झालेल्या मोसंबीला ६०० ते २६०० रुपये प्रति क्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.

सांगलीत मोसंबी १००० ते ४००० रूपये प्रतिक्विंटल

सांगली : येथील विष्णूअण्‍णा पाटील फळे व भाजीपाला दुय्यम बाजार आवारात गुरुवारी (ता. १७) मोसंबीची ५२ क्विंटल आवक झाली. त्यास १००० ते ४०००, तर सरासरी ३५०० रुपये असा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

येथील बाजार समितीत नागपूर आणि नाशिक जिल्ह्यातून आवक येते. बुधवारी (ता.१६) मोसंबींची १५० क्विंटल आवक झाली होती. मोसंबीस प्रति क्विंटल २५०० ते ४५००, तर सरासरी ३५०० रुपये असा दर होता. सोमवारी (ता. १४) मोसंबींची ५१० क्विंटल आवक झाली. त्यास प्रति क्विंटल २००० ते ४०००, तर सरासरी ३००० रुपये असा दर मिळाला. शनिवारी (ता.१२) मोसंबीची २१३ क्विंटल आवक झाली होती. मोसंबीस प्रति क्विंटल २००० ते ४५००, तर सरासरी ३२०० रुपये असा दर होता. 

शुक्रवारी (ता.११) मोसंबींची २५ क्विंटल आवक झाली. त्यास प्रति क्विंटल २००० ते ४५००, तर सरासरी ३२०० रुपये असा दर मिळाला. गुरुवारी (ता.१०) मोसंबींची ७२ क्विंटल आवक झाली होती. मोसंबीस प्रति क्विंटल २००० ते ४५०० तर ३५०० रुपये असा दर होता. बाजार समितीत मोसंबीची आवक कमी, अधिक असून दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

नाशिकमध्ये १८०० ते ४००० रुपये 

नाशिक येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता.१६) मोसंबींची आवक २५० क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल १८०० ते ४००० रुपये असा दर मिळाला. सर्वसाधारण दर २८०० रुपये होते, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

सप्ताहात फळांची होणारी आवक कमी, जास्त असल्याने मागणीनुसार दर मिळत आहेत. मंगळवारी (ता.१५) मोसंबींची आवक १०० क्विंटल झाली. त्यास १८०० ते ४००० असा प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर २००० रूपये होते. सोमवारी (ता.१४) मोसंबीची आवक १३० क्विंटल झाली. त्यास २००० ते ४००० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ३००० होता.

रविवारी (ता.१३) मोसंबीची फळ बाजार बंद असल्याने आवक झाली नाही. शनिवारी (ता.१२) मोसंबीची आवक १४० क्विंटल झाली. त्यास २००० ते ४००० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ३००० होता. शुक्रवारी (ता.११) मोसंबीची आवक १५० क्विंटल झाली. त्यास २००० ते ४००० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ३००० होता.  गुरुवारी (ता.१०) मोसंबीची आवक २१० क्विंटल झाली. त्यास २०००ते ४००० दर मिळाला. सर्वसाधारण दर ३००० होता. मागील आठवड्यापासून बाजार समितीत मोसंबीची आवक सर्वसाधारण होती. आवकेच्या तुलनेत दरात चढ उतार होताना दिसून येत आहे.

नगरमध्ये १ हजार ते ३५०० रुपये दर

 नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता.१७) मोंसबींची चार क्विंटलची आवक झाली. मोंसबीला प्रती क्विंटल एक हजार ते साडेतीन हजार, तर सरासरी २२५० रुपयांचा दर मिळाला आहे. सततच्या पावसाने मोसंबींचे नुकसान होत आहे. बाजारातही आवकेवर परिणाम होताना दिसत  आहे. 

नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज साधारण पाच ते दहा क्विंटलची आवक होत असते. सध्या मात्र सततचा पाऊस व होणारे नुकसान, यामुळे आवकेवर आणि दरांवरही परिणाम दिसत आहे. मंगळवारी (ता.१५) सहा क्विंटलची आवक होऊन प्रती क्विंटल एक हजार ते साडेतीन हजार चारशे व सरासरी दोन हजार दोनशे पन्नास रुपयांचा दर मिळाला. 

सोमवारी मोसंबींची (ता. १४) ४ क्विंटलची आवक झाली. दर एक हजार ते तीन हजार व सरासरी दोन हजारांचा  मिळाला आहे, असे बाजार समितीतून सांगण्यात आले. येत्या पंधरा दिवसांत बाजार समितीत मोंसबींची आवक वाढणार असल्याचा अंदाजही बाजार समितीने व्यक्त केला आहे.

परभणीत १००० ते २५०० रूपये दर

परभणी  येथील पाथरी रस्त्यावरील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी (ता.१७) मोसंबींची १५० क्विंटल आवक होती. मोसंबीला प्रतिक्विंटल १००० ते २५०० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

गेल्या महिनाभरापासून येथील मार्केटमध्ये मोसंबींची आवक सुरु झाली आहे. स्थानिक परिसरातून तसेच जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातून आवक होत आहे. गेल्या महिनाभरातील प्रत्येक गुरुवारी मोसंबीची १२५ ते १५० क्विंटल आवक झाली. त्यावेळी सरासरी १००० ते २५०० रुपये दर मिळाले. महिनाभरापासून हेच दर आहेत. 

गुरुवारी (ता.१७) मोसंबीची १५० क्विंटल आवक झाली. त्यावेळी घाऊक विक्रीचे दर प्रतिक्विंटल १००० ते २५०० रुपये होते. तर, किरकोळ विक्री प्रतिकिलो ३० ते ५० रुपये दराने सुरु होती, असे व्यापारी मो. फारुख यांनी सांगितले.

नांदेडमध्ये १५०० ते २००० रुपये

नांदेड  : नांदेड शहराजवळील (कामठा बुद्रुक) येथे असलेल्या फळबाजारात गुरुवारी (ता. १७) अडीच टन मोसंबींची आवक झाली. यास १५००  ते  २००० रूपयांचा दर मिळाल्याची माहिती ठोक फळ व्यापारी इम्राण बागवान यांनी दिली.

नांदेड जवळील कामठा बुद्रुक येथे खासगी फळ बाजार आहे. या ठिकाणी देशाच्या अनेक भागातून फळांची आवक होते. येथील बाजारात सध्या मोसंबीची आवक सर्वसाधारण आहे. नांदेड फळ मार्केटमध्ये नागपूर, हैदराबाद, दिल्ली यासह स्थानिक शेतकऱ्यांची मोसंबी बाजारात येते. गुरुवारी (ता. १७) बाजारात अडीच टन मोसंबीची आवक झाली. यास दीड हजार ते दोन हजारु रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला, अशी माहिती बागवान यांनी दिली.

सोलापुरात दहा डझनला ३०० रूपये

सोलापूर : सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात मोसंबीची आवक अगदीच नगण्य राहिली. शिवाय दरही जेमतमच राहिले, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

मोसंबीची आवक बाहेरील जिल्ह्यातून झाली. रोज सुमारे २० ते ४० क्विंटल आवक राहिली. मोसंबीला दहा डझनला किमान १०० रुपये, सरासरी २०० रुपये आणि सर्वाधिक ३०० रुपये दर मिळाला. या आधीच्या सप्ताहातही आवक केवळ १० ते २० क्विंटलच्या आसपास राहिली. त्यावेळी प्रतिक्विंटलला किमान १०० रुपये, सरासरी १५० रुपये आणि सर्वाधिक २८० रुपये असा दर मिळाला. २० ते ३० रुपयांच्यया फरकाने दर काहिसे स्थिर राहिल्याचे सांगण्यात आले.

जळगावात १८०० ते २८०० रुपये दर

जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.१७) मोसंबींची २४ क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल १८०० ते २८०० रुपये मिळाले. आवक चाळीसगाव, पाचोरा, जामनेर, औरंगाबाद, जालना आदी भागातून होत आहे. दर्जेदार मोसंबीला बऱ्यापैकी दर मिळत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com