Agriculture news in marathi Citrus in the state is Rs. 1000 to 4000 per quintal | Agrowon

राज्यात मोसंबी १००० ते ४००० रुपये प्रतिक्विंटल

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. २०) मोसंबींची २० क्विंटल आवक झाली. त्यांना १००० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.

औरंगाबादमध्ये १००० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. २०) मोसंबींची २० क्विंटल आवक झाली. त्यांना १००० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.

औरंगाबाद बाजार समितीमध्ये १० सप्टेंबरला १५ क्विंटल आवक झाली. त्यांना १५०० ते ३५०० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. १२ सप्टेंबरला ११ क्विंटल आवक झालेल्या मोसंबींचे दर २२०० ते ३५०० रुपये प्रति क्विंटल राहिले. १३ सप्टेंबरला मोसंबींची आवक ४२ क्विंटल, तर दर १००० ते २५०० रुपये प्रति क्‍विंटल राहिले. 

१४ सप्टेंबरला ३४ क्विंटल आवक झालेल्या मोसंबीला १२०० ते २२०० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. १५ सप्टेंबरला मोसंबींची आवक ३७ क्विंटल, तर दर ५०० ते २५०० रुपये प्रति क्विंटल राहिले. १६ सप्टेंबरला ३२ क्विंटल आवक झालेल्या मोसंबीला ६०० ते २६०० रुपये प्रति क्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.

सांगलीत मोसंबी १००० ते ४००० रूपये प्रतिक्विंटल

सांगली : येथील विष्णूअण्‍णा पाटील फळे व भाजीपाला दुय्यम बाजार आवारात गुरुवारी (ता. १७) मोसंबीची ५२ क्विंटल आवक झाली. त्यास १००० ते ४०००, तर सरासरी ३५०० रुपये असा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

येथील बाजार समितीत नागपूर आणि नाशिक जिल्ह्यातून आवक येते. बुधवारी (ता.१६) मोसंबींची १५० क्विंटल आवक झाली होती. मोसंबीस प्रति क्विंटल २५०० ते ४५००, तर सरासरी ३५०० रुपये असा दर होता. सोमवारी (ता. १४) मोसंबींची ५१० क्विंटल आवक झाली. त्यास प्रति क्विंटल २००० ते ४०००, तर सरासरी ३००० रुपये असा दर मिळाला. शनिवारी (ता.१२) मोसंबीची २१३ क्विंटल आवक झाली होती. मोसंबीस प्रति क्विंटल २००० ते ४५००, तर सरासरी ३२०० रुपये असा दर होता. 

शुक्रवारी (ता.११) मोसंबींची २५ क्विंटल आवक झाली. त्यास प्रति क्विंटल २००० ते ४५००, तर सरासरी ३२०० रुपये असा दर मिळाला. गुरुवारी (ता.१०) मोसंबींची ७२ क्विंटल आवक झाली होती. मोसंबीस प्रति क्विंटल २००० ते ४५०० तर ३५०० रुपये असा दर होता. बाजार समितीत मोसंबीची आवक कमी, अधिक असून दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

नाशिकमध्ये १८०० ते ४००० रुपये 

नाशिक येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता.१६) मोसंबींची आवक २५० क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल १८०० ते ४००० रुपये असा दर मिळाला. सर्वसाधारण दर २८०० रुपये होते, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

सप्ताहात फळांची होणारी आवक कमी, जास्त असल्याने मागणीनुसार दर मिळत आहेत. मंगळवारी (ता.१५) मोसंबींची आवक १०० क्विंटल झाली. त्यास १८०० ते ४००० असा प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर २००० रूपये होते. सोमवारी (ता.१४) मोसंबीची आवक १३० क्विंटल झाली. त्यास २००० ते ४००० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ३००० होता.

रविवारी (ता.१३) मोसंबीची फळ बाजार बंद असल्याने आवक झाली नाही. शनिवारी (ता.१२) मोसंबीची आवक १४० क्विंटल झाली. त्यास २००० ते ४००० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ३००० होता. शुक्रवारी (ता.११) मोसंबीची आवक १५० क्विंटल झाली. त्यास २००० ते ४००० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ३००० होता.  गुरुवारी (ता.१०) मोसंबीची आवक २१० क्विंटल झाली. त्यास २०००ते ४००० दर मिळाला. सर्वसाधारण दर ३००० होता.
मागील आठवड्यापासून बाजार समितीत मोसंबीची आवक सर्वसाधारण होती. आवकेच्या तुलनेत दरात चढ उतार होताना दिसून येत आहे.

नगरमध्ये १ हजार ते ३५०० रुपये दर

 नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता.१७) मोंसबींची चार क्विंटलची आवक झाली. मोंसबीला प्रती क्विंटल एक हजार ते साडेतीन हजार, तर सरासरी २२५० रुपयांचा दर मिळाला आहे. सततच्या पावसाने मोसंबींचे नुकसान होत आहे. बाजारातही आवकेवर परिणाम होताना दिसत 
आहे. 

नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज साधारण पाच ते दहा क्विंटलची आवक होत असते. सध्या मात्र सततचा पाऊस व होणारे नुकसान, यामुळे आवकेवर आणि दरांवरही परिणाम दिसत आहे. मंगळवारी (ता.१५) सहा क्विंटलची आवक होऊन प्रती क्विंटल एक हजार ते साडेतीन हजार चारशे व सरासरी दोन हजार दोनशे पन्नास रुपयांचा दर मिळाला. 

सोमवारी मोसंबींची (ता. १४) ४ क्विंटलची आवक झाली. दर एक हजार ते तीन हजार व सरासरी दोन हजारांचा  मिळाला आहे, असे बाजार समितीतून सांगण्यात आले. येत्या पंधरा दिवसांत बाजार समितीत मोंसबींची आवक वाढणार असल्याचा अंदाजही बाजार समितीने व्यक्त केला आहे.

परभणीत १००० ते २५०० रूपये दर

परभणी  येथील पाथरी रस्त्यावरील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी (ता.१७) मोसंबींची १५० क्विंटल आवक होती. मोसंबीला प्रतिक्विंटल १००० ते २५०० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

गेल्या महिनाभरापासून येथील मार्केटमध्ये मोसंबींची आवक सुरु झाली आहे. स्थानिक परिसरातून तसेच जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातून आवक होत आहे. गेल्या महिनाभरातील प्रत्येक गुरुवारी मोसंबीची १२५ ते १५० क्विंटल आवक झाली. त्यावेळी सरासरी १००० ते २५०० रुपये दर मिळाले. महिनाभरापासून हेच दर आहेत. 

गुरुवारी (ता.१७) मोसंबीची १५० क्विंटल आवक झाली. त्यावेळी घाऊक विक्रीचे दर प्रतिक्विंटल १००० ते २५०० रुपये होते. तर, किरकोळ विक्री प्रतिकिलो ३० ते ५० रुपये दराने सुरु होती, असे व्यापारी मो. फारुख यांनी सांगितले.

नांदेडमध्ये १५०० ते २००० रुपये

नांदेड  : नांदेड शहराजवळील (कामठा बुद्रुक) येथे असलेल्या फळबाजारात गुरुवारी (ता. १७) अडीच टन मोसंबींची आवक झाली. यास १५००  ते  २००० रूपयांचा दर मिळाल्याची माहिती ठोक फळ व्यापारी इम्राण बागवान यांनी दिली.

नांदेड जवळील कामठा बुद्रुक येथे खासगी फळ बाजार आहे. या ठिकाणी देशाच्या अनेक भागातून फळांची आवक होते. येथील बाजारात सध्या मोसंबीची आवक सर्वसाधारण आहे. नांदेड फळ मार्केटमध्ये नागपूर, हैदराबाद, दिल्ली यासह स्थानिक शेतकऱ्यांची मोसंबी बाजारात येते. गुरुवारी (ता. १७) बाजारात अडीच टन मोसंबीची आवक झाली. यास दीड हजार ते दोन हजारु रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला, अशी माहिती बागवान यांनी दिली.

सोलापुरात दहा डझनला ३०० रूपये

सोलापूर : सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात मोसंबीची आवक अगदीच नगण्य राहिली. शिवाय दरही जेमतमच राहिले, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

मोसंबीची आवक बाहेरील जिल्ह्यातून झाली. रोज सुमारे २० ते ४० क्विंटल आवक राहिली. मोसंबीला दहा डझनला किमान १०० रुपये, सरासरी २०० रुपये आणि सर्वाधिक ३०० रुपये दर मिळाला. या आधीच्या सप्ताहातही आवक केवळ १० ते २० क्विंटलच्या आसपास राहिली. त्यावेळी प्रतिक्विंटलला किमान १०० रुपये, सरासरी १५० रुपये आणि सर्वाधिक २८० रुपये असा दर मिळाला. २० ते ३० रुपयांच्यया फरकाने दर काहिसे स्थिर राहिल्याचे सांगण्यात आले.

जळगावात १८०० ते २८०० रुपये दर

जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.१७) मोसंबींची २४ क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल १८०० ते २८०० रुपये मिळाले. आवक चाळीसगाव, पाचोरा, जामनेर, औरंगाबाद, जालना आदी भागातून होत आहे. दर्जेदार मोसंबीला बऱ्यापैकी दर मिळत आहे.


इतर बाजारभाव बातम्या
सोयाबीनमध्ये तेजीचाच कलअकोला ः या हंगामातील सोयाबीन काढणी जोरात सुरू...
पुण्यात दसऱ्यानिमित्त फुलबाजार फुलला पुणे ः कोरोना संकटामुळे मार्चपासून सलग पाच...
औरंगाबादमध्ये कांदा सरासरी ३५०० रुपये औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत रताळी १३५० रूपये प्रतिक्विंटलपरभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
राज्यात केळी ४०० ते ११०० रुपये क्विंटलनाशिकमध्ये ४०० ते १००० रूपये प्रतिक्विंटल...
नाशिकमध्ये दोडका सरासरी ४१६५ रूपये नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नगरमध्ये भाजीपाल्याच्या दरात सुधारणा नगर : येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार...
कोल्हापुरात भाजीपाल्याच्या दरात वाढकोल्हापूर :  येथील बाजार समितीत या सप्ताहात...
सोलापुरात गवार, घेवडा, भेंडीतील तेजी...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नाशिकमध्ये डाळिंबाची आवक सर्वसाधारण; दर...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नागपुरात सोयाबीन दरातील तेजीबाबत...नागपूर : संततधार पावसाचा फटका बसल्याने सोयाबीनची...
पुणे बाजारात कांदा दरात सुधारणापुणे ः राज्यात सर्वदूर झालेल्या पावसाचा फटका...
नवरात्रोत्सवामुळे फूल बाजाराला `रंग`पुणे: कोरोना संकटाचा सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
परभणीत आवळ्यांना सरासरी ११०० रुपये दरपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
राज्यात वांगी सरासरी १५०० ते ८००० रूपयेनाशिकमध्ये ३००० ते ५५०० रुपये नाशिक : येथील...
नाशिकमध्ये वांग्यांना ५५०० सरासरी रूपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
अकोल्यात मुगाला सरासरी ५९०० रुपये दरअकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सोलापुरात टोमॅटो, ढोबळी मिरची...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
नाशिकमध्ये वाटाण्यांच्या दरात सुधारणा,...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नगरमध्ये भाजीपाला दरात सुधारणा नगरः जिल्ह्यात सतत होत असलेल्या पावसामुळे मागील...