Agriculture news in marathi, Citrus in the state is Rs. 800 to 4600 per quintal | Agrowon

राज्यात मोसंबी ८०० ते ४६०० रुपये प्रतिक्विंटल

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 8 ऑक्टोबर 2021

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. ७) मोसंबीची ५७ क्विंटल आवक झाली. तिला १२०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान, तर सरासरी २१०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.

औरंगाबादमध्ये क्विंटलला १२०० ते ३००० रुपये 

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. ७) मोसंबीची ५७ क्विंटल आवक झाली. तिला १२०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान, तर सरासरी २१०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.

औरंगाबाद बाजार समितीमध्ये ३० सप्टेंबरला २९ क्विंटल आवक झालेल्या मोसंबीला १५०० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. २ सप्टेंबरला ५५ क्विंटल आवक झालेल्या मोसंबीचे दर १५०० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. ३ सप्टेंबरला ५२ क्विंटल आवक झालेल्या मोसंबीला २००० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. चार सप्टेंबरला ३७ क्विंटल आवक झालेल्या मोसंबीचे दर २००० ते ३२०० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान राहिले.

५ सप्टेंबरला ५८ क्विंटल आवक झालेल्या मोसंबीचे दर १५०० ते ३००० रुपये प्रतिक्‍विंटल दरम्यान राहिले. ६ सप्टेंबरला १०९ क्विंटल आवक झालेल्या मोसंबीला १२०० ते ३२०० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.

नगरमध्ये क्विंटलला १००० ते ४००० रुपये 

नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता. ७) १६२ क्विंटल मोसंबीची आवक झाली. दर १ हजार ते ४ हजार व सरासरी २ हजार ५०० रुपयांचा मिळाला. गेल्या काही दिवसांपासून मोसंबीचे दर स्थिर आहेत.  

नगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मोसंबीची दर दिवसाला साधारण १६० ते १७० क्विंटलची आवक होत आहे. सोमवारी (ता. ४) ५६ क्विंटलची आवक होऊन १ हजार ते ४ हजार व सरासरी २ हजार ५०० रुपयांचा दर मिळाला. २ सप्टेंबर रोजी ३९ क्विंटलची आवक होऊन १ हजार ते ४ हजार व सरासरी २ हजार ५०० रुपयांचा दर मिळाला होता.

नाशिकमध्ये क्विंटलला १५०० ते ४००० रुपये

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ-बाजार आवारात बुधवारी (ता.६) मोसंबीची आवक २४० क्विंटल झाली. चालू सप्ताहात ही उच्चांकी आवक राहिली. त्यास प्रतिक्विंटल १५०० ते ४००० रुपये असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ३००० रुपये मिळाले, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

मंगळवारी (ता.५) मोसंबीची आवक १६० क्विंटल झाली. त्यास १५०० ते ४००० असा प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ३००० रुपये होता. सोमवारी (ता.४) मोसंबीची आवक १८० क्विंटल झाली. त्यास १५०० ते ४००० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ३००० रुपये होता.  शुक्रवारी (ता.१)मोसंबीची आवक ९१ क्विंटल झाली. त्यास १५०० ते ४००० असा दर मिळाला.

सर्वसाधारण दर ३००० रुपये होता. गुरुवारी (ता.३०) आवक ११० क्विंटल झाली. त्यास १५०० ते ४००० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ३००० रुपये होता. रविवारी (ता.३) व शनिवारी (ता.२) फळ बाजार बंद असल्याने आवक झाली नाही.मागील आठवड्यापासून बाजार समितीत मोसंबीची आवक सर्वसाधारण होती. आवकेत चढ उतार दिसून दिसून आले; मात्र दर स्थिर आहेत. सध्या नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर फळांना मागणी वाढत आहे. त्यामुळे दरात सुधारणा होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तविली.

अकोल्यात क्विंटलला २४०० ते ३००० रुपये

अकोला ः येथील बाजारात मोसंबीची दररोज पाच ते सात टनांची आवक होत आहे. तिला किमान २४०० ते कमाल ३००० रुपयांदरम्यान प्रतिक्विंटलला दर मिळत आहे. सध्या बाजारात गेल्या काही दिवसांपासून मोसंबीची सातत्याने मोठ्या प्रमाणात आवक होत आहे.

अकोला ही फळांसाठी एक चांगली बाजारपेठ आहे. त्यामुळे या ठिकाणी राज्याच्या विविध भागातून फळे विक्रीला येतात. सध्या प्रामुख्याने मराठवाड्यातून अकोल्यात मोसंबी विक्रीला येत आहे. जालना भागातील मोसंबीची चार ते पाच वाहने दररोज येत असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले.  उच्च दर्जाची मोसंबी २८०० ते ३००० दरम्यान विकत आहे. तर दुय्यम दर्जाला २४०० ते २६०० दरम्यान प्रतिक्विंटल दरमिळत आहे, असे व्यापारी सूत्रांकडून सांगण्यात आले. गुरुवारी (ता. ७) येथील बाजारात मोसंबीला २४०० पासून दर मिळाला.

परभणीत क्विंटलला ८०० ते २५०० रुपये

परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे -भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी (ता.७) मोसंबीची २५ क्विंटल आवक होती. मोसंबीला प्रतिक्विंटल किमान ८०० ते कमाल २५०० रुपये, तर सरासरी १६५० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

सध्या येथील मार्केटमध्ये जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातून तसेच स्थानिक परिसरातून दररोज सरासरी २० ते ८० क्विंटल मोसंबीची आवक येत आहे. प्रतिक्विंटल ७०० ते २५०० रुपयांपर्यंत दर मिळत आहेत. गेल्या काही आठवड्यांपासून मोसंबीचे दर स्थिर आहेत. गुरुवारी (ता.७) मोसंबीची २५ क्विंटल आवक झाली होती. त्या वेळी घाऊक विक्रीचे दर प्रतिक्विंटल ८०० ते २५०० रुपये होते. तर किरकोळ विक्री प्रतिकिलो २५ ते ५० रुपये दराने सुरू होती, असे व्यापारी अब्दुल माजीद यांनी सांगितले.

जळगावात क्विंटलला २४०० ते ४६०० रुपये 

जळगाव ः  कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.७) मोसंबीची १८ क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल २४०० ते ४६०० रुपये प्रतिक्विंटल असा मिळाला. आवक पाचोरा, जामनेर, औरंगाबादमधील सोयगाव, सिल्लोड आदी भागातून होत आहे. सणासुदीमुळे दर स्थिर असल्याची माहिती मिळाली. 

पुण्यात प्रतिक्विंटलला २५०० ते ४००० रुपये

पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. ७) मोसंबीची सुमारे ५० टन आवक झाली. आंबेबहराचा हंगाम सुरू झाला आहे. प्रतिकिलोला २५ ते ४० रुपये दर होता. तर ३ डझनाला १८० ते ३०० रुपये दर 
होता. 

मोसंबीची प्रामुख्याने आवक ही नगर, औरंगाबाद, जालना परिसरांतून होत आहे. ही आवक आणखी दोन महिने सुरू राहील, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.

नांदेडमध्ये क्विंटलला २००० ते ३००० रुपये 

नांदेड : नांदेड येथील कामठा फळबाजारात सध्या मोसंबी २००० ते तीन हजार रुपये क्विंटल दराने विक्री होत आहे. सध्या बाजारात आठ ते दहा टन मोसंबीची आवक होत असल्याची माहिती ठोक व्यापारी मोहम्मद कलीम यांनी दिली.

नांदेड जिल्ह्यात लिंबगाव तसेच आसपासच्या भागात शेतकरी मोसंबीचे पीक फळबाग घेतात. ही मोसंबी शहरातील कामठा बाजारात विक्रीसाठी आणली जाते. सध्या बाजारात लिमगाव परिसरातील शेतकरी मोसंबी विक्रीसाठी आणत आहेत. कामठा बाजारात दररोज आठ ते दहा टन मोसंबीची आवक होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. 

या मोसंबीस प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये दर मिळत आहे. तर किरकोळ बाजारात ४० ते ६० रुपये किलो दराने मोसंबी विकत असल्याचे व्यापारी महम्मद सलीम यांनी सांगितले. शहरात काही ठिकाणी शेतकरीही स्वतः मोसंबी विकत आहेत. यात ठोक बाजारापेक्षा त्यांना चांगला दर मिळत असल्याचे लिंबगाव येथील शेतकरी सदाशिव कदम यांनी सांगितले.


इतर बाजारभाव बातम्या
सोलापुरात सिमला मिरची, वांगी, गवार तेजीतसोलापूर ः सोलापूर बाजार समितीच्या आवारात...
नाशिकमध्ये डाळिंब दरात सुधारणानाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
शेवगा २००० रुपये प्रतिदहा किलोपुणे ः पुणे बाजार समितीमध्ये रविवारी (ता.२८)...
राज्यात कांदा ३०० ते ३५०० रुपये क्विंटलसोलापुरात क्विंटलला १००० ते ३५०० रुपये...
नाशिकमध्ये घेवड्याच्या आवकेत वाढ; दर...नाशिक : येथील बाजार समितीमध्ये वालपापडी-...
नगर येथे टोमॅटो, घेवडा दरात सुधारणानाशिक नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी बाजार...
बहुतांश भाजीपाल्याचे दर स्थिरपुणे ः पुणे बाजार समितीमध्ये रविवारी (ता.२१)...
राज्यात भेंडी ६०० ते ४५०० रुपये क्विंटलऔरंगाबादमध्ये क्विंटलला २५०० ते ३००० रुपये...
सोलापुरात वांग्यांच्या, टोमॅटोच्या दरात...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नगर बाजार समितीत भाजीपाला आवक स्थिरनगरः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
औरंगाबादमध्ये मक्याला हमी दराच्या आतच दरऔरंगाबाद : येथील कृषी बाजार समितीमध्ये मक्याची...
नाशिकमध्ये डाळिंबांच्या दरात तेजी;आवक...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
पुण्यात भाजीपाल्यांचे दर स्थिर पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी...
राज्यात लिंबे २५० ते २६०० रुपये क्विंटलअकोल्यात क्विंटलला ८०० ते १२०० रुपये अकोला ः...
नगरमध्ये टोमॅटो, वांगी, कारल्याला अधिक...नगर : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
सोलापुरात गवार, भेंडी, हिरव्या...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कळमणा बाजार समितीत सोयाबीन ५७५० रुपयांवरनागपूर ः कळमणा बाजार समितीत सोयाबीन दरात घसरण...
हिरवी मिरची, कोबी, शेवगा दरांत वाढपुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
केळी दरांवर दबाव वाढताचजळगाव ः खानदेशात केळी दरांवर दबाव वाढतच आहे....
सोयाबीनच्या दरात वाशीममध्ये सुधारणावाशीम : वाशीम कृषी उत्पन्न बाजार समितीत...