Agriculture news in Marathi, In the city district, Panchamanam covers an area of ​​one million hectares | Agrowon

नगर जिल्ह्यात सव्वाचार लाख हेक्‍टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019

नगर ः मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. आजअखेर चार लाख २८ हजार हेक्‍टर बाधित क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. अतिवृष्टीचा साडेपाच लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना फटका बसला आहे असल्याचे दिसून येत आहे. अजूनही कृषी विभागाचे लोक काही शेतकऱ्यांपर्यंत पोचले नसल्याचे सांगितले जात आहे. 

नगर ः मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. आजअखेर चार लाख २८ हजार हेक्‍टर बाधित क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. अतिवृष्टीचा साडेपाच लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना फटका बसला आहे असल्याचे दिसून येत आहे. अजूनही कृषी विभागाचे लोक काही शेतकऱ्यांपर्यंत पोचले नसल्याचे सांगितले जात आहे. 

नगर जिल्ह्यामध्ये ऑक्‍टोबर महिन्यात जिल्ह्यात तब्बल २०० मिलिमीटर असा उच्चांकी पाऊस झाला. या पावसाने खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विधानसभा निवडणुकीसाठी मतदान आणि मतमोजणी सुरू असताना पावसाने जिल्ह्यात कहर केला. घटलेला जलस्तर वाढला आहे; मात्र पावसाने बाजरी, मका, सोयाबीन, कांदा, कपाशी, फळबागा आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. 

झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. मात्र, पंचनाम्याची गती कमी आहे. त्यामुळे पाऊस उघडून आठ दिवस झाले तरी अजूनही काही शेतकऱ्यांच्या बांधावर कृषी विभागाचे अधिकारी पोचले नाहीत, असे सांगितले जात आहे. 

आजअखेर जिल्ह्यातील चार लाख २८ हजार हेक्‍टरचे पंचनाम्यांचे काम झाले. जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांची संख्या पाच लाख ७० हजार आहे. त्यामुळे सुरवातीला आलेल्या नजर अंदाजापेक्षा नुकसानीची संख्या अधिक असल्याचे समोर येत आहे. 

मदत कधी मिळणार?
राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर महिनाभरातही सरकार झाले नाही. आता राष्ट्रपती राजवट लागू झाली असून सत्तेसाठी नेते मुंबईत तळ ठोकून आहेत. त्यामुळे ऐन दिवाळीत अवकाळी पावसाचे संकट कोसळलेल्या शेतकऱ्यांना आधार मिळाला नाही. केवळ पंचनाम्याचे सोपस्कर पूर्ण केले जात असले तरी मदत नेमकी कधी मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. निवडून दिलेले आणि पराभूत झालेले नेतेही त्याबाबत काहीच बोलत नाहीत.


इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादमध्ये मूग, उडदाची आवक नगण्यऔरंगाबाद: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मूग व...
नाशिकमध्ये हिरवी मिरची २००० ते ५०००...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
सोलापुरात कांदा, कोथिंबीर, मेथीला उठाव...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात कांदा १२० ते ४०० रुपये दहा...कोल्हापूर: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गत...
नगरमध्ये टोमॅटो, शेवग्याचे दर स्थिरनगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
पावसाच्या तडाख्याने साताऱ्यात हातची...कऱ्हाड, जि. सातारा ः चांगल्या पावसामुळे यंदाचा...
परभणी जिल्ह्यात पुरामुळे पिके पाण्याखालीपरभणी  : जायकवाडी आणि माजलगाव धरणातील...
सोयाबीन आले सोंगणीला, मात्र उत्पादन...शिरपूरजैन, जि. वाशीम  ः यावर्षी सातत्याने...
वऱ्हाडातील मोठे प्रकल्प तुडुंबअकोला  ः आत्तापर्यंत झालेल्या पावसाने काही...
खानदेशात पंचनाम्यांच्या प्रतीक्षेत पिके...जळगाव  ः खानदेशात उडीद, मुगाचे अपूर्ण...
पुणे विभागात आडसाली ऊस लागवड क्षेत्र...पुणे  ः चालू वर्षी वेळेवर दाखल झालेल्या...
सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान...सांगली  ः जिल्ह्यातील मिरज, खानापूर, पलूस,...
केळी पिकातील कंद कुजव्या रोगाचे...कंदकुजव्या रोगाचा प्राथमिक प्रसार रोगट कंदापासून...
वाढवा जमिनीतील सेंद्रिय कर्ब...जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढविण्यासाठी...
कृषी विधेयकांस विरोधासाठी इंडिया...नवी दिल्ली : बहुचर्चित कृषी विधेयकांवर राष्ट्रपती...
निकोप स्पर्धेसाठी मोदी सरकारचा प्रयत्नशेती उत्पादन व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन आणि...
नगरमधील ३५ हजार शेतकरी विमा भरपाईपासून...नगर  ः जिल्ह्यात गेल्यावर्षी परतीच्या...
पुण्यात भाजीपाल्याची आवक घटली; दरात वाढपुणे  ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...
रत्नागिरी जिल्ह्यात हळव्या भात कापणीत...रत्नागिरी  : हळवे भात पीक कापणी योग्य झाले...
औरंगाबादमध्ये थेट शेतीमाल विक्रीची ...औरंगाबाद  : औरंगाबाद शहरासह ग्रामीण भागात...