नगर जिल्ह्यात हरभरा पेरणीलाही वेग येईना 

In the city district, the sowing of gram could not be accelerated either
In the city district, the sowing of gram could not be accelerated either

नगर ः जिल्ह्यात रब्बीत हरभऱ्याची सुमारे १ लाख २० हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी होत असते. यंदा चांगला झालेला पाऊस व कापसाचे नुकसान झाल्याने त्याजागी रिकामे होणाऱ्या क्षेत्रावर हरभऱ्याची पेरणी होण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र जिल्हाभरात अजून तरी हरभऱ्याच्या पेरणीला वेग आलेला नाही. आतापर्यंत सरासरीच्या तुलनेत अवघ्या २८ टक्के क्षेत्रावर हरभऱ्याची पेरणी झाली आहे. 

जिल्ह्यात रब्बीत ज्वारी, हरभरा, गहू, मकाचे सर्वाधिक क्षेत्र असते. ज्वारीची आतापर्यंत पन्नास टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. हरभऱ्याचे सरासरी क्षेत्र १ लाख १८ हजार १०३ हेक्टर आहे. त्यापैकी आतापर्यंत ३२ हजार ९६० हेक्टरवर म्हणजे २८ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. बाजरी, कापसाच्या जागेवर हरभऱ्याची पेरणी होत असते. 

यंदा ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसामुळे कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्या जागी यंदा हरभऱ्याची पेरणी होण्याचा कृषी विभागाचा अंदाज होता. त्यानुसार बियाण्याचे नियोजन केले होते. मात्र अजून हरभऱ्याच्या पेरणीला फारसा वेग येताना दिसत नाही. मात्र यंदा दरवर्षीच्या तुलनेत हरभऱ्याचे क्षेत्र वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

आतापर्यंत कर्जत तालुक्यात सर्वाधिक पेरणी झाली असून, अकोल्यात पेरणी क्षेत्र मात्र अल्प आहे. कोपरगाव, श्रीरामपूर, राहाता तालुक्यातील अजून एकाही शेतकऱ्याने हरभरा पेरलेला नाही, असे कृषी विभागाच्या अहवालात म्हटले आहे.

हरभऱ्याचे पेरणी झालेले क्षेत्र (हेक्टर)
नगर   ५०४१
पारनेर  ४१०६
श्रीगोंदा  २०७८ 
कर्जत  ७२६१ 
जामखेड  ३३४०  
शेवगाव  ३९११ 
पाथर्डी  ४५७० 
नेवासा  ५४५ 
राहुरी  १२५६  
संगमनेर ६७३
अकोले १७९
कोपरगाव 
श्रीरामपूर 
राहाता 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com