नगरमध्ये सव्वीस महसूल मंडळांत पन्नास टक्क्यांपेक्षा कमी पाऊस

नगरमध्ये सव्वीस महसूल मंडळांत पन्नास टक्क्यांपेक्षा कमी पाऊस
नगरमध्ये सव्वीस महसूल मंडळांत पन्नास टक्क्यांपेक्षा कमी पाऊस

नगर ः नगर जिल्ह्यामध्ये अजूनही पुरेसा पाऊस नाही. आतापर्यंत झालेल्या पावसाच्या नोंदीनुसार जिल्ह्यामधील २६ महसूल मंडळांत पन्नास टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. साधारण पंचवीस महसूल मंडळांत ७५ टक्के तर ९ महसूल मंडळांत शंभर टक्क्यांच्या जवळपास पाऊस झाला. चार महसूल मंडळांत तर पंचवीस टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस झाला आहे.

नगर जिल्ह्यामध्ये यंदा पावसाळ्याचे तीन महिने उरकत आले असतानाही अजूनही अनेक भागांत जोराचा पाऊस नाही. त्याचा खरिपावर परिणाम झाला असून रब्बीची चिंता लागली आहे. गेल्या वर्षी खरिपात आणि रब्बी हंगामात मोठे नुकसान झाले. चारा आणि पाणीटंचाईला तोंड द्यावे लागले. यंदा परिस्थिती सुधारण्याची आशा असताना पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांना मात्र घोर लागला आहे. अल्प पावसावर पिके तराललेली दिसत असली तरी उत्पादनात घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जोराचा पाऊस नसल्याने टंचाईशी सामना करावा लागत असून परतीचा पाऊस चांगला झाला नाही तर रब्बी हंगामही धोक्यात येण्याची शक्यता आहे.

यंदा आतापर्यंत पेडगाव, चिंभळा, बेलवंडी, देवदैठण, मांडवगण, कर्जत, कोंभळी, माही, मिरजगाव, अरणगाव, नान्नज, तहाराबाद, बाभळेश्वर, चांदा, कापुरवाडी, चास, नागापूर, वाळकी, माणिकदौंडी, चापडगाव, एरंडगाव, वडझिरे, निघोज, टाकळी ढोकेश्वर, भाळवणी पिंपरणे या महसूल मंडळांत २०० मिलिमीटरपर्यंत म्हणजे पन्नास टक्‍क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. राशीन, भांबोरी, खर्डा, नायगाव, उंदीरगाव, देवळाली प्रवरा, सात्रळ, लोणी, शिर्डी, घोडेगाव, वडाळा बहिरोबा, जेऊर, रुईछत्तीशी, केडगाव, चिचोंडी पाटील, सावेडी, कोरडगाव, करंजी, बोधेगाव, भातकुडगाव, ढोरजळगाव, सुपा, शिबलापूर, तळेगाव, समनापूर, साकुर या महसूल मंडळांत ३०० मिलिमीटरपर्यंत म्हणजे ७५ टक्केच्या जवळपास पाऊस झालेला आहे. तर वांबोरी, पुणतांबा, नेवासा बुद्रुक, नेवासा खुर्द, सलाबतपूर, संगमनेर, धांदरफळ, कोपरगाव, रवंदे या नऊ महसूल मंडळांत शंभर टक्क्यांच्या जवळपास पाऊस झालेला आहे. 

अकोल्यातील अवघ्या पाच महसूल मंडळांत शंभर टक्‍क्यांपेक्षा जास्ती पाऊस झाला असल्याची महसूल विभागाकडे नोंद आहे. विशेष म्हणजे पावसाच्या नोंदीची टक्केवारी फुगलेली दिसत असली तरी अजूनही कोणत्याच भागात पाणी साठवण झाले नाही. 

चार महसूल मंडळांत अल्प पाऊस नगर जिल्ह्यामध्ये ४९७ मिलिमीटर पावसाची सरासरी असून आतापर्यंत काष्टी, बेलापूर, मिरी, पळशी या चार महसूल मंडळांत शंभर मिलिमीटरपेक्षा कमी पाऊस झालेला आहे. अकोले तालुक्यातील शेंडी महसूल मंडळांत सर्वाधिक ४ हजार ५८७, साकीरवाडी मंडळात १४४०, राजूर मंडळात १२३२, अकोले मंडळात १०६८, ब्राह्मणवाडा मंडळात ८८७, समशेरपूर मंडळात ८०८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत सर्वात कमी पळशी (ता. पारनेर) महसूल मंडळात ७३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याच्या सरीसरीच्या तुलनेत आतापर्यंत ८१.२२ टक्के पाऊस झाल्याची नोंद आहे. गेल्यावर्षी आतापर्यंत साठ टक्के पाऊस झाला होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com