टंचाई असताना नगरमध्ये युरियाचा बफर स्टॉक

खरीप हंगाम सुरू झाल्याने शेतकऱ्यांची खते मिळवण्यासाठी धडपड सुरू आहे. नगर जिल्ह्यातील बहुतांश भागात तीव्र टंचाई असतानाही युरिया खताचा बफर स्टॉक करून ठेवला जात आहे.
टंचाई असताना नगरमध्ये युरियाचा बफर स्टॉक In the city when there is scarcity Buffer stock of urea
टंचाई असताना नगरमध्ये युरियाचा बफर स्टॉक In the city when there is scarcity Buffer stock of urea

पुणे नगर : खरीप हंगाम सुरू झाल्याने शेतकऱ्यांची खते मिळवण्यासाठी धडपड सुरू आहे. नगर जिल्ह्यातील बहुतांश भागात तीव्र टंचाई असतानाही युरिया खताचा बफर स्टॉक करून ठेवला जात आहे. आतापर्यंत सुमारे साडेपाच हजार टन युरिया खत साठवून ठेवले असल्याची माहिती कृषी विभागाने दिली. शेतकऱ्यांची मात्र विक्रेत्यांकडे युरिया देण्यासाठी याचना सुरूच आहे. त्याचाच फायदा घेऊन काही ठिकाणी लिंकिंग करून तर काही ठिकाणी चढ्या दराने खताची विक्री होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.   नगर जिल्ह्यात यंदा पावणे सात लाख हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी होण्याचा अंदाज धरून कृषी विभागाने खते व बियाणांचे नियोजन केले आहे. जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या बाजरी, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना युरियाची अधिक गरज असते. सध्या पेरण्याला काही भागात सुरूवात झाली असून, खते, बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु आहे. सर्वाधिक मागणी असलेल्या युरियाची यंदाही बहुतांश भागात टंचाई निर्माण झाली आहे.  युरियाची उपलब्धता नगर जिल्ह्यासाठी आतापर्यत युरियाची १ लाख ६ हजार ८६९ टन मागणी केलेली असून, ८१ हजार ९१० टन खत पुरवठा करायला मंजुरी मिळाली आहे. ४५ हजार १९३ टन पुरवठा झालेला आहे. त्यातील ३२ हजार २०३ खताची विक्री केली असून, ११ हजार ९९० टन युरिया शिल्लक आहे, असे कृषी विभागातून सांगण्यात आले. टंचाईच्या काळात खताची मागणी वाढली तर शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होऊ नये म्हणून युरिया पुरवठा करण्यासाठी युरियाचा बफर स्टॉक करण्याला शासनाची परवानगी आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती काम करीत आहेत. समितीचे जिल्हाधिकारी अध्यक्ष असले तरी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि कृषी विकास अधिकारी यांची भूमिका यात महत्त्वाची असते. त्यांनीच वस्तुस्थिती जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनात आणून देणे गरजेचे आहे. मात्र नगर जिल्ह्यात असे होताना दिसत नाही.  दरम्यान, सध्या जिल्हाभर युरियाची टंचाई असतानाही कृषी विभागाने युरियाचा बफर स्टॉक केली जात आहे. आतापर्यंत सुमारे साडेपाच हजार टन खत स्टॉकमध्ये साठवून ठेवले आहे. ८ हजार १० टनापर्यंत युरिया खत साठवून ठेवण्याची परवानगी असल्याचे अधिकारी सांगत आहेत. विशेष म्हणजे खते, बियाणांचा काळाबाजार, चढ्या भावाने विक्री होऊ नये यासाठी तालुका व जिल्हा पातळीवर भरारी पथके कार्यरत आहेत. तरीही सर्रासपणे युरिया सोबत लिंकिंग केले जात आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com