‘खडकपूर्णा’च्या पाण्यासाठी आंदोलन

आंदोलन
आंदोलन

बुलडाणा: जिल्ह्यातील संत चोखासागर खडकपूर्णा प्रकल्पातून मराठवाड्यातील विविध गावे व शहरांना पाणीपुरवठा करण्याच्या हालचालींचा नागरिकांमधून तीव्र विरोध होऊ लागला अाहे. या प्रकल्पातील पाणी वाचवा अशी हाक देत सर्वपक्षीय नेत्यांच्या नेतृत्वात हजारो नागरिक देऊळगावराजातील रस्त्यावर उतरले होते.    दुष्काळाशी लढत असलेल्या देऊळगावराजा तालुक्यातील संत चोखा सागर खडकपूर्णा प्रकल्पातून मराठवाड्यातील जालना, परतूर, मंठा या शहरासह जालना जिल्ह्यातील ९२ गावांना मुख्यमंत्री ग्रामीण पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून पाणी देण्यास मंजुरी देण्यात अाली अाहे. याला देऊळगावराजा, सिंदखेडराजा या तालुक्यांसह जाफराबाद तालुक्यातूनही विरोध दर्शविला जात अाहे.  नागरिकांच्या भावना लक्षात घेता सोमवारी (ता. २८) देऊळगावराजा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, या भागाचे शिवसेनेचे आमदार डॉ. शशिकांत खेडेकर व इतर पक्षाच्या नेत्यांच्या नेतृत्वात अभूतपूर्व असा सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात अाला. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, भाजप, मनसे, शिवसंग्राम, रासप अशा सर्वच पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी या वेळी उपस्थिती लावली. सरकारच्या कृतीचा या वेळी नेत्यांनी भाषणातून समाचार घेतला. मोर्चात सहभाग झालेल्यांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात अाले. आज (ता. २९) मातृतीर्थ सिंदखेडराजा मतदारसंघात कडकडीत बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात अाले.  बुलडाणा जिल्ह्यात तीव्र दुष्काळी परिस्थिती अाहे. कमी पावसामुळे खडकपूर्णा प्रकल्प कोरडा अाहे. मराठवाड्यातील शहरे व गावांसाठी या प्रकल्पातून पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात अाली अाहे. योजनेच्या विहिरींचे खोदकाम खडकपूर्णा परिसरात सुरू असताना नागरिकांनी बुधवारी (ता. २३) विरोध करून ते बंद पाडले होते. त्यानंतर पुन्हा खोदाईचे काम सुरू होते. अाता विरोधाची धार तीव्र झाली असून, गावागावातील नागरिक प्रकल्पातील पाणी देण्यास विरोध करीत अाहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com