‘ई-नाम’द्वारे १०० कोटी पेमेंट झाल्याचा दावा 

गेल्या चार वर्षांत ‘ई-नाम’ अंतर्गत ४ हजार ५५६ कोटीच्या १५० लाख क्विंटलची उलाढाल होऊन, १०० कोटींचे ऑनलाइन पेमेंट झाल्याचा दावा राज्य कृषी पणन मंडळाने केला आहे.
e_nam
e_nam

पुणे ः गेल्या चार वर्षांत ‘ई-नाम’ अंतर्गत ४ हजार ५५६ कोटीच्या १५० लाख क्विंटलची उलाढाल होऊन, १०० कोटींचे ऑनलाइन पेमेंट झाल्याचा दावा राज्य कृषी पणन मंडळाने केला आहे. तर ‘ई-नाम’द्वारे पेमेंट करणारे महाराष्ट्र हे देशातील तिसरे राज्य ठरले आहे. मात्र राज्याच्या बहुतांश बाजार समित्यांमध्ये ऑनलाइन लिलाव होतच नसल्याचे चित्र असून, अनेक बाजार समित्यांमध्ये झालेले व्यवहार नंतर ऑनलाइन दाखविले जात असल्याचे वास्तव आहे. 

पारंपारिक पद्धतीतून शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या शेतीमालास रास्त भाव मिळवून देण्यासाठी केंद्र शासनाने राष्ट्रीय कृषी बाजार (इलेक्ट्रॉनिक नॅशनल ॲग्रिकल्चर मार्केट, ई-नाम) ही योजना एप्रिल २०१६ पासून सुरु केली  आहे. राज्यातील ११८ बाजार समित्यांचा तीन टप्यांमध्ये समावेश करण्यात आला. या योजनेद्वारे शेतमालाची बाजार समितीच्या प्रवेशद्वारावरच नोंद, लॉट मॅनेजमेंट, शेतमालाची गुणवत्ता तपासणे, ई-ऑक्शन करणे, शेतमालाचे वजन, सेल ॲग्रिमेंट, सेल बिल व शेतकऱ्यांना ऑनलाइन पेमेंट याप्रमाणे कामकाज करणे अभिप्रेत आहे. मात्र यामधील मोजकेच कामकाज होत असल्याचे चित्र आहे.  ‘ई-नाम’ कार्यप्रणालीद्वारे खरेदी केलेल्या शेतमालाची संपूर्ण रक्कम खरेदीदार व्यापाऱ्याने शेतकऱ्यास व संबंधित घटकांना ऑनलाइन अदा करायची आहे. कोणत्याही प्रकारची शेतकऱ्याला दिलेली उचल अथवा रोख रक्कम वजा करण्याची तरतूद ‘ई-नाम’ संगणक प्रणालीमध्ये नाही. यामुळे ‘ई-नाम’ कार्यप्रणाली शेतकरी हिताची असली, तरी याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र आहे 

दरम्यान, राज्यात वणी बाजार समितीने सर्वाधिक ७२ कोटी ५० कोटी ‘ई-पेमेंट’ केले आहे. तर त्या खालोखाल परभणी, वरोरा, दौंड, भोकर या बाजार समित्यांचे ऑनलाइन पेमेंट प्रत्येकी २ कोटी रुपये तर अमरावती, शिरूर व येवला या बाजार समित्यांनी प्रत्येकी सुमारे १ कोटी रुपये ऑनलाइन पेमेंटद्वारे केले आहेत.  पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर पिछाडीवर  राज्यात सर्वांत मोठ्या समजल्या जाणाऱ्या पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर या बाजार समित्यांनी ‘ई-नाम’ला हरताळ फासल्याचे चित्र आहे. मुंबई बाजार समितीने उभारलेली अत्याधुनिक असेईंग लॅब धुळखात पडली आहे. तर पुणे बाजार समितीमध्ये ‘ई-नाम’द्वारे लिलावच होत नसल्याचे चित्र आहे. 

‘ई-नाम’ची स्थिती 

  • ६० बाजार समित्यांमध्ये असेईंग लॅब कार्यान्वित 
  • ५८ बाजार समित्यांमध्ये मॉईश्चर मीटरचा पुरवठा व लॅब उभारणी प्रगतिपथावर 
  • ७० बाजार समित्यांमध्ये असेईंग सुरु, एकूण ६ लाख ३४ हजार लॉटस् चे असेईंग. 
  • ७३ बाजार समित्यांद्वारे ‘ई-पेमेंट’द्वारे १०६ कोटींचे वितरण 
  • ११.९० लाख शेतकरी, १९ लाख खरेदीदार, व्यापारी नोंदणी 
  • १६ हजार ५० अडते नोंदणी, २५८ शेतकरी उत्पादक कंपन्या 
  • १० शेतकरी उत्पादक कंपन्यांद्वारे २ कोटी ८३ हजार रुपयांची उलाढाल   
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com