agriculture news in Marathi claim of 100 crore payment through e-Nam Maharashtra | Agrowon

‘ई-नाम’द्वारे १०० कोटी पेमेंट झाल्याचा दावा 

गणेश कोरे
बुधवार, 24 फेब्रुवारी 2021

गेल्या चार वर्षांत ‘ई-नाम’ अंतर्गत ४ हजार ५५६ कोटीच्या १५० लाख क्विंटलची उलाढाल होऊन, १०० कोटींचे ऑनलाइन पेमेंट झाल्याचा दावा राज्य कृषी पणन मंडळाने केला आहे.

पुणे ः गेल्या चार वर्षांत ‘ई-नाम’ अंतर्गत ४ हजार ५५६ कोटीच्या १५० लाख क्विंटलची उलाढाल होऊन, १०० कोटींचे ऑनलाइन पेमेंट झाल्याचा दावा राज्य कृषी पणन मंडळाने केला आहे. तर ‘ई-नाम’द्वारे पेमेंट करणारे महाराष्ट्र हे देशातील तिसरे राज्य ठरले आहे. मात्र राज्याच्या बहुतांश बाजार समित्यांमध्ये ऑनलाइन लिलाव होतच नसल्याचे चित्र असून, अनेक बाजार समित्यांमध्ये झालेले व्यवहार नंतर ऑनलाइन दाखविले जात असल्याचे वास्तव आहे. 

पारंपारिक पद्धतीतून शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या शेतीमालास रास्त भाव मिळवून देण्यासाठी केंद्र शासनाने राष्ट्रीय कृषी बाजार (इलेक्ट्रॉनिक नॅशनल ॲग्रिकल्चर मार्केट, ई-नाम) ही योजना एप्रिल २०१६ पासून सुरु केली 
आहे. राज्यातील ११८ बाजार समित्यांचा तीन टप्यांमध्ये समावेश करण्यात आला.

या योजनेद्वारे शेतमालाची बाजार समितीच्या प्रवेशद्वारावरच नोंद, लॉट मॅनेजमेंट, शेतमालाची गुणवत्ता तपासणे, ई-ऑक्शन करणे, शेतमालाचे वजन, सेल ॲग्रिमेंट, सेल बिल व शेतकऱ्यांना ऑनलाइन पेमेंट याप्रमाणे कामकाज करणे अभिप्रेत आहे. मात्र यामधील मोजकेच कामकाज होत असल्याचे चित्र आहे. 

‘ई-नाम’ कार्यप्रणालीद्वारे खरेदी केलेल्या शेतमालाची संपूर्ण रक्कम खरेदीदार व्यापाऱ्याने शेतकऱ्यास व संबंधित घटकांना ऑनलाइन अदा करायची आहे. कोणत्याही प्रकारची शेतकऱ्याला दिलेली उचल अथवा रोख रक्कम वजा करण्याची तरतूद ‘ई-नाम’ संगणक प्रणालीमध्ये नाही. यामुळे ‘ई-नाम’ कार्यप्रणाली शेतकरी हिताची असली, तरी याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र आहे 

दरम्यान, राज्यात वणी बाजार समितीने सर्वाधिक ७२ कोटी ५० कोटी ‘ई-पेमेंट’ केले आहे. तर त्या खालोखाल परभणी, वरोरा, दौंड, भोकर या बाजार समित्यांचे ऑनलाइन पेमेंट प्रत्येकी २ कोटी रुपये तर अमरावती, शिरूर व येवला या बाजार समित्यांनी प्रत्येकी सुमारे १ कोटी रुपये ऑनलाइन पेमेंटद्वारे केले आहेत. 

पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर पिछाडीवर 
राज्यात सर्वांत मोठ्या समजल्या जाणाऱ्या पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर या बाजार समित्यांनी ‘ई-नाम’ला हरताळ फासल्याचे चित्र आहे. मुंबई बाजार समितीने उभारलेली अत्याधुनिक असेईंग लॅब धुळखात पडली आहे. तर पुणे बाजार समितीमध्ये ‘ई-नाम’द्वारे लिलावच होत नसल्याचे चित्र आहे. 

‘ई-नाम’ची स्थिती 

  • ६० बाजार समित्यांमध्ये असेईंग लॅब कार्यान्वित 
  • ५८ बाजार समित्यांमध्ये मॉईश्चर मीटरचा पुरवठा व लॅब उभारणी प्रगतिपथावर 
  • ७० बाजार समित्यांमध्ये असेईंग सुरु, एकूण ६ लाख ३४ हजार लॉटस् चे असेईंग. 
  • ७३ बाजार समित्यांद्वारे ‘ई-पेमेंट’द्वारे १०६ कोटींचे वितरण 
  • ११.९० लाख शेतकरी, १९ लाख खरेदीदार, व्यापारी नोंदणी 
  • १६ हजार ५० अडते नोंदणी, २५८ शेतकरी उत्पादक कंपन्या 
  • १० शेतकरी उत्पादक कंपन्यांद्वारे २ कोटी ८३ हजार रुपयांची उलाढाल 
     

इतर बातम्या
दूध विक्री कमिशनवर नियंत्रण आणा पुणे : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना...
किमान तापमानात वाढ पुणे ः मध्य महाराष्ट्राच्या परिसरात चक्रीय...
देशी कोंबडी पिलांच्या मागणीत ७० टक्के...नगर ः बर्ड फ्लूची लाट ओसरली आहे. मात्र तरीही...
‘पीएम-किसान’चे काम करण्यास महसूलचा नकार अकोला ः पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना...
अकोला : अवकाळी, गारपीटग्रस्तांना १७...अकोला ः गेल्या वर्षात जिल्ह्यात फेब्रुवारी ते मे...
खरिपात सोयाबीन पेरणीवेळी जोड ओळ पद्धत...जालना ः ‘‘येणाऱ्या खरीप हंगामात सोयाबीन पिकात जोड...
अकोला परिमंडळात ४८ तासांत ३४० चोऱ्या उघडअकोला ः अकोला परिमंडळात वीजचोरीच्या घटनांमध्ये...
मराठवाडा रेशीम शेतीचा केंद्र बिंदू ः डॉ...जालना : ‘‘हवामान बदलानुसार योग्य त्या पिकांच्या...
‘पोकरा’मध्ये कामाची प्रक्रिया आता ऑनलाइनमुंबई/औरंगाबाद : नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
राज्यात गहू क्षेत्रात ३८ टक्क्यांनी वाढनगर ः परतीच्या पावसाने पाण्याची बऱ्यापैकी...
‘महाबीज’चे २१० हेक्टरवर सोयाबीन...परभणी ः ‘महाबीज’च्या परभणी विभागांतर्गत सहा...
‘युटोपियन’कडून पाच लाख मेट्रिक टन उसाचे...सोलापूर ः ‘‘यंदा जास्त ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले...
म्हैसाळच्या आवर्तनासाठी पाणी मागणीची...सांगली ः मिरज पूर्व भागासह कवठेमहांकाळ, जत तालुक्...
`सुधारित शिफारशींसाठी शेतकऱ्यांमध्ये...परभणी ः ‘‘सोयाबीन उत्पादकता वाढ तसेच उत्पादन खर्च...
बूथ कमिट्या सक्षम करा : नाना पटोले मुंबई : काँग्रेस पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी सर्व...
प्रत्येक गावांनी पाण्याचे अंदाजपत्रक...पुणे : गावात पडणारा पाऊस व पिकांना लागणारे पाणी...
नेपाळच्या कांदा व्यापाऱ्याला ...नाशिक : जिल्ह्यात शेतमाल विक्री पश्चात...
वीज जोडणी तोडल्यास राज्यभर आंदोलन :...अकोला : आधीच कोरोनामुळे गेले वर्षभर शेतकरी व...
पालखेड उपबाजार आवारात द्राक्ष मण्यांचे...नाशिक : पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीचा...
तीनच दिवसांत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ...नाशिक : सोमवारी ४२३०, बुधवारी ३४८१ आणि गुरुवारी...