agriculture news in marathi Claims of 31 thousand farmers for crop insurance refund in Parbhani district | Agrowon

परभणी जिल्ह्यात पीकविमा परताव्यासाठी ३१ हजार शेतकऱ्यांचे दावे

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 29 ऑक्टोबर 2020

परभणी : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत खरीप हंगामात स्थानिक आपत्ती अंतर्गत नुकसान झालेल्या ३१ हजार ७०८ शेतकऱ्यांनी विमा कंपनी तसेच कृषी विभागाकडे पूर्वसूचना करत पीकविमा परताव्यासाठी दावे केले आहेत.

परभणी : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत खरीप हंगामात स्थानिक आपत्ती अंतर्गत नुकसान झालेल्या ३१ हजार ७०८ शेतकऱ्यांनी विमा कंपनी तसेच कृषी विभागाकडे पूर्वसूचना करत पीकविमा परताव्यासाठी दावे केले आहेत. काढणी पश्चात नुकसानीच्या १ हजार ४४८ शेतकऱ्यांनी पूर्वसूचना केल्या आहेत.

पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत यंदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ७ लाख १२९ विमा प्रस्ताव दाखल केले असून ३२ कोटी ९० लाख १४ हजार ६२४ रुपये विमा हप्ता भरून ३ लाख ७६ हजार ८१ हेक्टरवरील खरीप पिकांसाठी विमा संरक्षण घेतले आहे. त्यात ३ लाख १६ हजार ९६६ शेतकऱ्यांनी २ लाख ४० हजार ३३ हेक्टरवरील सोयाबीन, ५९ हजार ६८४ शेतकऱ्यांनी २३ हजार ६६७ हेक्टरवरील कपाशी, १ लाख २४ हजार ८३९ शेतकऱ्यांनी ४५ हजार ८१४ हेक्टरवरील तूर, १ लाख १२ हजार ५८५ शेतकऱ्यांनी ३९ हजार ५७२ हेक्टरवरील मूग, ५१ हजार ४५७ शेतकऱ्यांनी १५ हजार १६९ हेक्टरवरील उडीद, २७ हजार ९१० शेतकऱ्यांनी ९ हजार ४०९ हेक्टरवरील ज्वारी,६ हजार ७०८ शेतकऱ्यांनी २ हजार ४१६ हेक्टरवरील बाजरी या पिकांसाठी विमा संरक्षण घेतले आहे. जिल्ह्यातील एकूण पेरणीक्षेत्राच्या तुलनेत विमा संरक्षित क्षेत्र कमी 
आहे.

स्थानिक आपत्तीअंतर्गत पीकविमा परताव्यासाठी ३१ हजार ७०८ पूर्वसूचना (दावे) प्राप्त झाल्या असून त्यापैकी २ हजार १०२ दावे अपात्र ठरले आहेत.एकूण ९ हजार १६ पू्र्वसूचनाचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.

काढणी पश्चात नुकसानीच्या १ हजार ४४८ पूर्वसूचना प्राप्त असून त्यात परभणी तालुक्यातील १८९, जिंतूर तालुक्यातील ७५६, सेलू तालुक्यातील  १९४, मानवत तालुक्यातील ५७, पाथरी तालुक्यातील ४६, सोनपेठ तालुक्यातील १५, गंगाखेड तालुक्यातील ५८, पालम तालुक्यातील ५६, पूर्णा तालुक्यातील ७७ पूर्वसूचना प्राप्त झाल्या आहेत. या सर्व पूर्वसूचनांच्या पडताळणीचे  काम बाकी आहे  असे सूत्रांनी सांगितले.

स्थानिक आपत्ती अंतर्गत पूर्वसूचना स्थिती

तालुका एकूण पूर्वसूचना सर्वेक्षण संख्या
परभणी ३२८३ ९०५
जिंतूर ११६७० २९२४
सेलू २१५० ४२१
मानवत ७१२ १०९
पाथरी १२१२ २१६
सोनपेठ १००६ २५५
गंगाखेड ५२०१ १६९१
पालम ३०५४  १२१८
पूर्णा ३४२१ १२७७

 


इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यात पावसाचा जोर ओसरलाऔरंगाबाद : मराठवाड्यात गुरूवारच्या (ता.२२) तुलनेत...
औरंगाबाद जिल्ह्यात हमीभावातील ज्वारी,...औरंगाबाद : जिल्ह्यात आधारभूत दराने खरेदी केंद्र...
नांदेड जिल्ह्यात खरीप पिके पाण्याखालीनांदेड : जिल्ह्यात बुधवारनंतर गुरुवारी झालेल्या...
खानदेशात कांद्याच्या रोपवाटिका...जळगाव : खानदेशात कांदा रोपवाटिकांमध्ये रोपे...
अतिवृष्टीचा हिंगोलीतील ७१ गावांत दणकाहिंगोली ः जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात जुलै...
चिपळूणमधील दीड हजार जणांना पुरातून...रत्नागिरी : अतिवृष्टीचा तडाखा चिपळूण, खेड,...
‘हतनूर’चे ३६ दरवाजे उघडलेजळगाव : तापीनदीवरील भुसावळनजीकच्या हतनूर धरणाच्या...
`रावळगाव`च्या जप्त साखर विक्रीतून ‘...नाशिक : ‘‘मालेगाव तालुक्यातील एस.जे. शुगर रावळगाव...
पेठ, त्र्यंबकेश्वरला मुसळधारनाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात पेठ,...
बुलडाण्यातील खरीप पीकविमा प्रश्नावर...बुलडाणा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या खरीप...
पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने कामबंद...वाशीम : जिल्ह्यात पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने...
शेकडो घरे पाण्याखाली; दरड कोसळून...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात गुरुवारी (ता. २२)...
पुणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पावसाचा...पुणे : पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार...
अतिवृष्टी, पुराचा अकोल्यातील ३३ हजार...अकोला : जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे ३३ हजार...
गोसीखुर्द प्रकल्पाचे ३१ दरवाजे उघडले नागपूर : विदर्भात सर्वदूर पावसाने जनजीवन विस्कळीत...
सातारा जिल्ह्यातील पाच धरणांतून ७५ हजार... सातारा : गेले तीन दिवस सातारा जिल्ह्याच्‍या...
भारतीय उपवासाचं थाई पीकथायलंडच्या हिरव्यागार वातावरणात धकधकत्या बाईकवर...
मुख्यमंत्र्यांनी घेतला पूरस्थितीचा...मुंबई : गेल्या २४ तासांत अतिवृष्टीमुळे विशेषतः...
सोलापूर जिल्ह्यात शेतीपंपांची साडेतीन...सोलापूर ः जिल्ह्यातील ३ लाख ५८ हजार ९३०...
कोल्हापूर जिल्ह्याला पावसाने झोडपलेकोल्हापूर : जिल्ह्याला बुधवारी (ता.२१) दुपारपासून...