बिलाची थकीत रक्कम न भरल्यास आता थेट वीजतोडणीची (कनेक्शन कट) कारवाई करण्याचा इशारा महावितरणने राज्
अॅग्रो विशेष
शेतकऱ्याची व्याख्या, वर्गीकरणाची गरज ः पोपट पवार
लहान शेतकरी वंचित राहत असून, खऱ्या अर्थाने शेती, शेतकरी आणि गावांचा विकास करायचा असेल, तर शेतकऱ्याची व्याख्या आणि वर्गीकरण करण्याची गरज आहे.
पुणे ः शेतकऱ्यांच्या नावाखाली अनेक धनदांडगे उद्योजक, उद्योगपती, राजकीय नेते फायदा घेत आहेत. त्यामुळे लहान शेतकरी वंचित राहत असून, खऱ्या अर्थाने शेती, शेतकरी आणि गावांचा विकास करायचा असेल, तर शेतकऱ्याची व्याख्या आणि वर्गीकरण करण्याची गरज आहे, असे मत आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांनी मांडले.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्तालापात शुक्रवारी (ता. ४) पवार बोलत होते. या वेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी आणि पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश भोईटे उपस्थित होते. पवार म्हणाले, ‘‘हवामानाच्या लहरीपणामुळे शेती आता बिनभरवाशाची झाली आहे.
त्यातच शेतीचे तुकडे होऊ लागल्याने शेती करणे अधिकच अवघड झाले आहे. शेती अधिक किफायतशीर होण्यासाठी शेतीला शाश्वत वीज पाणी आणि पिकाला हमी भाव मिळण्याची गरज आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांचे पाणी आणि पर्यावरणावर एकच धोरण असले पाहिजे. तसेच शेतकऱ्याची व्याख्या देखील होणे गरजेचे आहे.
सध्या शेतकऱ्यांच्या नावाखाली अनेक धनदांडगे उद्योजक, उद्योगपती, राजकीय नेते फायदा घेत आहेत. त्यामुळे लहान शेतकरी वंचित राहत असून, खऱ्या अर्थाने शेती आणि शेतकरी आणि गावांचा विकास करायचा असेल, तर शेतकऱ्याची व्याख्या आणि वर्गीकरण करण्याची गरज आहे. तसेच शेतीचे पिढ्यान् पिढ्यांचे वाद सोडविण्यासाठी सरकारी खर्चाने सर्व शेतीची मोजणी होऊ वाद सोडविण्याची गरज आहे.
तर चीन सारखे धोरण स्वीकारावे लागेल
शेतीच्या वाटपामुळे शेती तुकड्या-तुकड्यांत झाली आहे. यामुळे शेती करणे अवघड होत असून, भविष्यात असेच तुकडे शेतीचे होत राहिले, तर चीनसारखे सर्व शेतीच शासकीय मालकीची करण्याचे धोरण आपल्याला स्वीकारावे लागेल.
कृषी विद्यापीठे बनली स्पर्धा परीक्षांची केंद्रे
राज्यातील कृषी विद्यापीठांमधून संशोधन आणि विस्तार होण्याची गरज असताना, सध्याची कृषी विद्यापीठे ही स्पर्धा परीक्षांची केंद्रे झाली आहेत. शेतकऱ्यांची म्हणणारी मुले ही कृषी संशोधन आणि विस्तारामध्ये रस न घेता, प्रशासकीय अधिकारी होण्याच्या मागे लागतात. यासाठीच ते कृषी विद्यापीठांमध्ये प्रवेश करतात. यातून कृषी क्षेत्राकडे दुर्लक्ष होत असून, नवनवीन कृषी संशोधनाला खीळ बसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
- 1 of 655
- ››