agriculture news in marathi Clean milk production is essential for good health | Page 2 ||| Agrowon

चांगल्या आरोग्यासाठी स्वच्छ दूध उत्पादन आवश्यक

डॉ. किर्ती जाधव, डॉ. लिना धोटे
बुधवार, 18 मार्च 2020

स्वच्छ दूध उत्पादनासाठी स्वच्छ वातावरण आणि दुग्धशाळेसोबत भांडी, जनावरे व दूध काढण्याचे साहित्य स्वच्छ असणे आवश्‍यक आहे. याशिवाय जंतू संरक्षणासाठी वापरलेल्या रसायनांचे अवशेष, हार्मोनचे अवशेष इत्यादीपासून गोठा मुक्त असावा.

चांगल्या मानवी आरोग्यासाठी स्वच्छ दूध महत्वाचे असते. अस्वच्छ दूधामुळे टीबी, टायफायड, पॅरा टायफाईड, अंडाशयित ताप, आणि पोटाचे आजार होण्याची शक्यता असते. यापैकी काही जीवाणू दुभत्या जनावरांच्या कासेतून थेट येतात. काही प्रमाणात दूध मल व मुत्र प्रदुषणामुळे दूषित होते.

स्वच्छ दूध उत्पादनासाठी आवश्यक बाबी

स्वच्छ दूध उत्पादनासाठी स्वच्छ वातावरण आणि दुग्धशाळेसोबत भांडी, जनावरे व दूध काढण्याचे साहित्य स्वच्छ असणे आवश्‍यक आहे. याशिवाय जंतू संरक्षणासाठी वापरलेल्या रसायनांचे अवशेष, हार्मोनचे अवशेष इत्यादीपासून गोठा मुक्त असावा.

चांगल्या मानवी आरोग्यासाठी स्वच्छ दूध महत्वाचे असते. अस्वच्छ दूधामुळे टीबी, टायफायड, पॅरा टायफाईड, अंडाशयित ताप, आणि पोटाचे आजार होण्याची शक्यता असते. यापैकी काही जीवाणू दुभत्या जनावरांच्या कासेतून थेट येतात. काही प्रमाणात दूध मल व मुत्र प्रदुषणामुळे दूषित होते.

स्वच्छ दूध उत्पादनासाठी आवश्यक बाबी

जनावरांचे आरोग्य

 • स्वच्छ दुध उत्पादनासाठी दुधाळ प्राणी निरोगी आणि स्वस्थ्य असणे आवश्यक आहे. क्षयरोग, टायफाइड, देवी रोग, लाळ्या खुरकूत, ब्रुसेलोसिस हे जनावरांना होणारे आजार दुधाद्वारे मानवांमध्ये पसरतात.
 • दुध काढण्यापूर्वी गोठा पूर्णपणे स्वच्छ करावा.
 • कासदाह झालेल्या जनावरांच्या दुधाच्या योग्य तपासण्या कराव्यात.
 • संक्रमित जनावरांचे दूध निरोगी जनावरांच्या दुधात मिसळू नये.
 • निरोगी व आजारी जनावरांचे दूध वेगळे ठेवावे.
 • आजारी जनावराचे दूध जीवाणू विरहित केल्यानंतरच वापरावे.

जनावरांची स्वच्छता

 • दूध देण्याच्या किमान १ तासाआधी जनावरांची स्वच्छता करावी. शरीर आणि कासेचा भाग स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावा. कोरड्या कपड्याने जनावराचे शरीर पुसून काढावे.

गोठ्याची स्वच्छता

 • दूध काढण्यापूर्वी गोठा स्वच्छ करणे आवश्‍यक आहे. दिवसातून किमान दोनवेळा जंतूनाशक द्रावणाने जनावरांचा गोठा स्वच्छ करावा.
 • जनावरांची खाद्य उपकरणे स्वच्छ करून घ्यावीत. माशी व डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गोठ्यात डीडीटी चा वापर करावा. गोठ्यात पुरेशा प्रमाणात प्रकाश व हवा येणे आवश्‍यक आहे.

कामगारांची स्वच्छता

 • कामगारांच्या स्वच्छता आणि सवयींचा दुधाच्या स्वच्छतेवर मोठा परिणाम होतो. त्यांचे कपडे स्वच्छ असावेत, नख कापलेली असावेत.
 • काम सुरू होण्यापूर्वी हात जंतुनाशक द्रावणाने धुवावेत. बोलणे, थुंकणे, मद्यपान करणे, सिगारेट ओढणे आणि शिंकणे या गोष्टी कामगारांनी दूध काढतांना टाळाव्यात.

भांड्यांची स्वच्छता

 • स्वच्छ दुध उत्पादनात भांडी स्वच्छ असणे आवश्‍यक आहे. दुधाच्या वापरासाठी वापरलेली दुधाची भांडी प्रत्येक प्रयोगानंतर स्वच्छ असणे आवश्यक आहे.
 • दुधासाठी वापरलेली भांडी घुमट आकाराची असावीत.
 • दूध साठवणुकीसाठी स्टेनलेस स्टीलची भांडी वापरावीत.
 • दुधाची भांडी प्रथम बाहेरून आणि आतून थंड पाण्याने धुवा ,नंतर गरम पाण्याने, नंतर डिटर्जेंट द्रावणाने, नंतर गरम पाण्याने आणि थंड पाण्याने २ मिनिटे वाफेने धुवून (जिवाणूं विरहित) ठेवावीत, आणि नंतर सुकवावीत.

संपर्क - डॉ.किर्ती जाधव, ७७७६०९५१९४
डॉ.लिना धोटे, ७९७२४१३५३३
(पशुवैद्यक महाविद्यालय बिदर, कर्नाटक.)


इतर कृषिपूरक
शेळीपालनासाठी महत्वाचे मुद्दे...शेळीपालन व्यवसाय सुरू करताना पूर्वतयारी करावी....
व्यवस्थापन दुधाळ जनावरांचे...गाई, म्हशींच्या आहारात पशुखाद्याचा योग्य प्रमाणात...
जनावरांतील ताण कमी करा... उन्हाळयात अनेकवेळा तापमान ३५ अंश सेल्सिअसपेक्षा...
शेतकऱ्यांसाठी क्रेडिट कार्ड किसान क्रेडिट कार्डमुळे कर्जाचे पैसे घेण्यासाठी...
असे बनवा घरच्या घरी पशुखाद्यउन्हाळ्यात गाई, म्हशी आणि इतर जनावरांची भूक कमी...
जनावरांच्या जैवसुरक्षेबाबत जागरूक रहाजनावरांना आजाराचा प्रादुर्भाव झाल्यानंतर उपचाराचा...
गाई, म्हशींच्या तपासणीसाठी...पशूपालनातील प्रमुख अडचण म्हणजे गाई, म्हशी माजावर...
ब्रुसेलोसिसकडे नको दुर्लक्षएखाद्या संक्रमित जनावराचे  रक्त, द्रव किंवा...
जनावरांतील उष्माघाताचे नियंत्रणउन्हाच्या संपर्कात आल्यामुळे जनावरांच्या शरीराचे...
पशुपालनात सुरक्षितता महत्त्वाची...पशू सांभाळ, दैनंदिन निगा, चारा-पाण्याची सोय, दूध...
अनुदानाचा योग्य विनियोगअनुदानासाठीची बहुतांश प्रक्रिया बॅंकेमार्फतच...
आजारांपासून कोंबड्यांचे संरक्षणकोंबड्यांना होणाऱ्या आजारांचे वेळीच व्यवस्थापन...
बदलत्या हवामानानुसार जनावरांचे...बदलत्या हवामानानुसार जनावरांच्या आहार, गोठा,...
उत्पादन धिंगरी अळिंबीचेअळिंबीमध्ये भाजीपाला व फळे यांच्या तुलनेत प्रथिने...
फायदेशीर पशुपालनाचे तंत्रगाई,म्हशींची उत्पादकता वाढवायची असेल तर आपल्याकडे...
गाय, म्हशींच्या आहारात बायपास फॅटचा वापरआपल्याला सुरुवातीच्या १०० ते १२० दिवसांत नफा...
स्वच्छतेतून वाढते दुधाची गुणवत्तादुधाची गुणवत्ता कमी होते. अयोग्य दुधामुळे आर्थिक...
अॅझोलाः एक आरोग्यदायी पशुखाद्य जनावरांचे दूध उत्पादन, प्रजनन, वाढ आणि...
दुधातील फॅट कमी राहण्याची कारणे,...दुधातील स्निग्धांश (फॅट) हा प्रतवारीच्या दृष्टीने...
चांगल्या आरोग्यासाठी स्वच्छ दूध उत्पादन...स्वच्छ दूध उत्पादनासाठी स्वच्छ वातावरण आणि...