सप्तशृंगी गड येथे ‘स्वच्छता हीच सेवा’अंंतर्गत स्वच्छता अभियान

सप्तशृंगी गड येथे ‘स्वच्छता हीच सेवा’अंंतर्गत स्वच्छता अभियान
सप्तशृंगी गड येथे ‘स्वच्छता हीच सेवा’अंंतर्गत स्वच्छता अभियान

नाशिक  : शासनाच्या ‘स्वच्छता हीच सेवा’ अभियानांतर्गत सप्तशृंगीगड ग्रामपंचायतीने प्लॅस्टिकबंदीचा ठरावच ग्रामसभेत संमत केला आहे. या ठिकाणी नवरात्रोत्सवानिमित्त जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्वरी यांनी सलग दोन दिवस येऊन यात्रेची तयारीची पाहणी केली. तसेच, अभियानांतर्गत येथे आलेल्या अधिकाऱ्यांनी सलग दोन तास श्रमदान करून जवळपास तीन ट्रॉली प्लॅस्टिक व इतर कचरा जमा केला. गडावर प्लॅस्टिक आढळल्यास अथवा वापरल्यास ५०० ते ५००० रुपये दंड आकारण्यात येत आहे. एस. भुवनेश्वरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधिन शेळकंदे यांनी गडावरील पिण्याच्या पाण्याचे स्रोत, परिसर स्वच्छता, आरोग्य सुविधा आदी बाबत संपूर्ण पाहणी केली. या वेळी पहिल्या पायरी लगतच आडोशाला ग्रामपंचायतीच्या एका भूखंडावर मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक कचरा दिसल्याने साफसफाई करण्यात आली. या वेळी उपस्थित कळवणचे तहसीलदार बी. एन. कापसे, गटविकास अधिकारी डी. एम. बहिरम व सुरगाणा तहसीलदार सूर्यवंशी यांनी श्रमदान केले. सलग दोन तास श्रमदान करीत सरपंच, सदस्य, कळवण पंचायत समिती आरोग्य विभाग, ग्रामस्थ व कर्मचारी आदींनी जवळपास तीन ट्रॉली प्लॅस्टिक व इतर कचरा गोळा केला. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आरोग्य, पाणीपुरवठा, पाणी शुद्धीकरण, तलाव स्वच्छता व परिसर स्वच्छता याबाबत प्रत्येक्ष भेट देऊन सरपंच व ग्रामसेवक यांना सूचना केल्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com