agriculture news in marathi clear the pending center assitance to state : AGM Dada Bhuse | Agrowon

केंद्राकडे राज्याची प्रलंबित मदत तातडीने द्या : कृषिमंत्री दादा भुसे

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 10 एप्रिल 2020

केंद्र सरकारच्या वाट्याच्या योजनांमधील ५० टक्के निधी अडकून पडला आहे, तो तातडीने राज्य सरकारकडे वर्ग करावा. सध्याची परिस्थिती व झालेले नुकसान यांचा अंदाज घेऊन पुढील वर्षाचे नियोजन करावे, अशी मागणी राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्याकडे केली आहे 

नाशिक : कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्याने राज्यातील शेतकरी अडचणीत आहे. या परिस्थितीत राज्यातील फळपिकांसह भाजीपाला पिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या वाट्याच्या योजनांमधील ५० टक्के निधी अडकून पडला आहे, तो तातडीने राज्य सरकारकडे वर्ग करावा. सध्याची परिस्थिती व झालेले नुकसान यांचा अंदाज घेऊन पुढील वर्षाचे नियोजन करावे, अशी मागणी राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्याकडे केली आहे 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय कृषिमंत्री श्री.तोमर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे विविध राज्यांचा कृषी विषयक आढावा घेतला. यानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात बुधवारी (ता.८) झालेल्या ‘व्हिसी’त कृषिमंत्री श्री.भुसे यांनी राज्यातील स्थितीची माहिती दिली. कृषिमंत्री भुसे यांनी सांगितले की, राज्यातील द्राक्ष, केळी, आंबा, टरबूज, संत्रा ही पिके काढणीसाठी अली आहेत. मात्र अनेक अडचणी निर्माण झाल्या आहे. पुरवठा साखळी अडचणीत सापडली आहे. कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणावर असताना इतर राज्याप्रमाणे खरेदीची करून परताव्याची हमी द्यावी. राज्यात फुलशेती करणारे शेतकरी यांसह कृषीसोबत असलेल्या पूरक उद्योगाच्या पोल्ट्री, दूध व मत्स्यव्यवसाय यासाठी मदतीची गरज आहे, ती केंद्राने लवकरात लवकर पाठवावी अशी मागणी यावेळी केली.

राज्यातील काही शेतकऱ्यांच्या शेतात व घरात अजून कपाशी पडून आहे. त्याची खरेदी कशी होईल याबाबत लक्ष वेधले. कोरोना लॉकडाऊनमुळे बाजारपेठ नसल्याने शेतमाल पडून आहे, त्यास बाजारपेठ उपलब्ध नाही. शेतकरी मोठ्या मेहनतीने धनधान्य पिकवतो त्यासाठी बाजारपेठ उपलब्ध झाली पाहिजे, असेही कृषिमंत्री श्री.भुसे यांनी केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी जिल्हाधिकारी सुरज मांढरे, जिल्हा अधीक्षक अधिकारी संजीव पडवळ आदी उपस्थित होते.

केंद्रीय कृषिमंत्री यांच्याशी झालेल्या चर्चेतील मुद्दे व मागण्या

  •   निर्यात प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी केंद्राने मदत करावी
  •   वाहतूक करण्यासाठी वॅगन उपलब्ध करून द्याव्या
  •   मनुष्यबळ कमी असल्याने वॅगनमधून माल खाली करताना वेळ लागत आहे, त्यासाठी हॉलटिंग चार्जेस आकारू नये.
  •   इतर राज्यांप्रमाणे कांद्याचीही खरेदी करून परताव्याची हमी द्यावी.
  •   द्राक्षापासून बेदाणा निर्मितीसाठी आवश्यक रसायने उपलब्ध करून द्यावी.
  •   पंतप्रधान सन्मान निधीची प्रलंबित मदत तत्काळ शेतकऱ्यांनी द्यावी.

इतर अॅग्रो विशेष
बळीराजालाच बळी देण्याचा प्रकार?शेती क्षेत्रातील सुधारणाविषयक तीन वटहुकूम असोत...
नाशिकमध्ये कांदा निर्यातबंदीमुळे कामकाज...नाशिक : केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा...
मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूचऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे...
बुलडाणा : नवीन सोयाबीनला चिखलीत ३८८१...बुलडाणा ः या हंगामात लागवड केलेल्या सोयाबीनची...
पावसाने पुन्हा दाणादाणपुणेः मराठवाड्यासह नाशिक, नगर, पुणे आणि...
फवारणी विषबाधाप्रकरण स्वित्झर्लंडच्या...यवतमाळ: यवतमाळ जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांनी २०१७...
अभूतपूर्व गदारोळात कृषी विधेयके मंजूरनवी दिल्ली: गगनभेदी घोषणा, धक्काबुक्की,...
‘आत्मा’चे पंचवार्षिक आराखडे रखडलेपुणे: शेतकऱ्यांपर्यंत कृषी विषयक योजना कशा...
‘पोकरा’ प्रकल्पातील वैयक्तिक लाभ...नांदेड : कोरोना (कोवीड -१९) संसर्गामुळे शासनाच्या...
मूग खरेदी एक ऑक्टोबरपासूनमुंबई: हमीभावाने मूग खरेदीच्या मान्यतेचा प्रस्ताव...
मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यतापुणे ः राज्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार...
मुसळधार पावसाचा तडाखापुणे ः  मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही...
कुटुंबातील सदस्याला शेतकरी अपघात विमा...पुणे ः गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा...
मैत्रीची अन्नधान्य व्यापारातील भागीदारी...आडगाव (जि. नाशिक) येथील गोरक्ष लभडे आणि संदीप...
मराठवाड्यात मुसळधारेचा अंदाजपुणे ः विदर्भ आणि तेलंगणा दरम्यान चक्राकार...
बचत गटांच्या उत्पादनांची माहिती एका...मुंबई: महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्यरत...
पंजाब, हरियानात कृषी विधेयके...नवी दिल्लीः लोकसभेत मंजूर झालेल्या कृषी...
यांत्रिकीकरण अभियानाच्या अर्ज...पुणे:  राज्यात चालू वर्षीही कृषी...
मराठवाड्यात पावसाचा जोर कायमऔरंगाबाद : मराठवाड्यात शनिवारी (ता. १९)...
राज्यात ठिकठिकाणी जोरदार सरीपुणे ः राज्यात तुरळक ठिकाणी होत असलेल्या पावसाचा...