agriculture news in marathi clear the pending work of Bavanthadi project canal farmers demands | Page 2 ||| Agrowon

कालव्या अभावी भंडाऱ्यात रखडले सिंचन

ॲग्रोवन वृत्तसेवा
शनिवार, 17 एप्रिल 2021

भंडारा : बावनथडी प्रकल्पावरील शेतकरी सिंचन सुविधांपासून वंचित असल्याने राहिले आहेत. हे रखडलेले काम पूर्ण करावे, अशी मागणी भंडारा जिल्हा अन्यायग्रस्त शेतकरी समितीने केली आहे. 
 

भंडारा : साठ किलोमीटरचा कालवा पूर्ण होऊन अवघ्या एका किलोमीटरचे बांधकाम रखडले आहे. परिणामी बावनथडी प्रकल्पावरील शेतकरी सिंचन सुविधांपासून वंचित असल्याने राहिले आहेत. हे रखडलेले काम पूर्ण करावे, अशी मागणी भंडारा जिल्हा अन्यायग्रस्त शेतकरी समितीने केली आहे. 

भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात आंतरराज्य बावनथडी प्रकल्प उभारला आहे. या प्रकल्पाच्या पाण्यावर तुमसर आणि मोहाडी तालुक्‍यात सिंचन होते. तुमसर तालुक्या अंतर्गत बावनथडी प्रकल्प लघु कालवा क्रमांक दोनला दहा वर्षांपूर्वी राज्य शासनाने मंजुरी दिली.

बावनथडी प्रकल्पापासून साठ किलोमीटर अंतरापर्यंत खंबाटा गावापर्यंत कालव्याचे काम पूर्ण झाले आहे. परंतु तेथून टाकळीपर्यंत सुमारे एक किलोमीटर बांधकाम पूर्ण झाले नाही. या संदर्भात शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना वारंवार निवेदन दिले. मात्र त्याची कोणतीही दखल घेण्यात आली नाही, असा आरोप आहे. 

खंबाटा (टाकळी) येथील शेतकरी शेतीवर अवलंबून आहेत. उपजीविकेसाठी शेती शिवाय दुसरा कोणताच पर्याय नाही. या वर्षी वैनगंगा आणि सूर नदीला आलेल्या महापुराने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्या नुकसानीची भरपाई व्हावी याकरता शेतकऱ्यांनी उन्हाळी धानाची लागवड केली आहे.

या धानाला आता पाण्याची गरज आहे. परंतु कालव्याचे काम अपूर्ण असल्याने खंबाटा येथील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळत नाही. बावनथडी प्रकल्प लघु कालवा क्रमांक दोनचे बांधकाम पूर्ण करून शेतकऱ्यास सिंचनासाठी पाणी  उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

तुमसर आणि मोहाडी तालुक्‍यातील शेतकरी बावनथडी प्रकल्पाच्या पाण्यावर मोठ्या प्रमाणात पीक घेतात. परंतु कालव्याची झालेली दुरावस्था आणि विविध कारणाने टेल पर्यंत पाणी पोहोचत नाही. तर काही कालव्यांचे काम अद्यापही अपूर्ण आहे. हे काम तातडीने पूर्ण करून क्षतीग्रस्त  कालव्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे.

भंडारा जिल्हा अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने या संदर्भाने अप्पर जिल्हाधिकारी घनश्याम भोगावकर यांच्या माध्यमातून जलसंपदामंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले. या वेळी समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर भिवगडे, विष्णुदास लोणारे, अशोक पवनकर, पुरुषोत्तम गायधने, विकास निंबार्ते, विकास मेश्राम, कोठीराम पवनकार उपस्थित होते.


इतर ताज्या घडामोडी
नाशिक जिल्ह्यात बाजार समित्यांमध्ये...नाशिक : पणन विभागाच्या परिपत्रकात सलग ३...
नाशिक : 'ऑक्सिजन एक्स्प्रेस'द्वारे २७....नाशिक : ‘‘जिल्ह्यातील प्राणवायूची तूट भरून...
सांगलीत केळीच्या क्षेत्रात घट होण्याची...सांगली ः जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात झालेल्या...
रत्नागिरीत ३७ टन काजू बी तारणरत्नागिरी ः काजूचे बाजारातील दर घसरल्यानंतर...
आदिवासी विकास मंडळ करणार गव्हाची खरेदीयवतमाळ : आदिवासी विकास महामंडळाकडून राज्यात...
परभणीत सोयाबीनचे दीड हजार क्विंटल...परभणी ः परभणी तालुक्यात यंदा ११० हेक्टरवर उन्हाळी...
भुईमुगाचे वाण निकृष्ट, कंपन्यांवर...यवतमाळ : जिल्ह्यात भुईमुगाच्या शेंगा न धरण्याचे...
नगरमध्ये महावितरणच्या पायाभूत सुविधांचे...नगर : कृषिपंप वीज धोरण २०२०च्या अंमलबजावणीमुळे...
धान चुकाऱ्याअभावी शेतकऱ्यांची आर्थिक...गोंदिया : गेल्यावर्षी आधारभूत दराने धान विक्री...
सांगलीत खरिपासाठी हवे ३३ हजार ६९०...सांगली  : यंदाच्या खरीप हंगामाची तयारी कृषी...
औरंगाबादमध्ये खरबुजाला सरासरी १०००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
तुलनेत यंदा दुपटीने गाळपकोल्हापूर : गेल्या हंगामापेक्षा यंदाच्या हंगामात...
कृषी सल्ला : कापूस, भुईमूग, कांदा, फळ...जमिनीची खोल नांगरट करावी. त्यामुळे जमिनीत...
अस्वलाकडून होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकरी...भंडारा : जंगलालगत असलेल्या शेतीत वन्यप्राण्यांचा...
अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल, ‘...मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर...
अति उष्ण, ढगाळ हवामानआठवडा अखेरपर्यंत ते १००६ हेप्टापास्कल इतके राहतील...
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचे...पुणे ः बहुप्रतीक्षित पुणे-नाशिक सेमी हायस्पीड...
नाशिक : माथाडी युनियनकडून ‘काम बंद’नाशिक : राज्य शासनाच्या विविध माथाडी मंडळातील...
पुणे ‘जि.प.’तर्फे कर्मचाऱ्यांना मिळणार...पुणे ः ‘‘जिल्हा परिषदेच्या बक्षिस योजनेतून आता...
‘खरिपात सोयाबीनचे घरचेच बियाणे वापरा’सातारा : येत्या खरीप हंगामात  सोयाबीनचे...