नाशिक : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना भरपाईचा मार्ग मोकळा

गतवर्षी जुलै व ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. महायुती सरकारच्या काळात या नुकसानीचे पंचनामे देखील करण्यात आले होते. परंतु नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना मिळालेली नव्हती.
Clear the way for compensation to the farmers affected by heavy rains
Clear the way for compensation to the farmers affected by heavy rains

नाशिक : गतवर्षी जुलै व ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. महायुती सरकारच्या काळात या नुकसानीचे पंचनामे देखील करण्यात आले होते. परंतु नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना मिळालेली नव्हती. ही बाब निदर्शनास आल्यानंतर आमदार दिलीप बनकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत या नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना लवकर उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.

एक वर्षाचा कालावधी उलटून देखील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती. याबाबत मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांना तात्काळ कार्यवाही बाबतचे आदेश उपमुख्यमंत्री यांनी दिले असल्याची माहिती आमदार बनकर यांनी दिली.

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात रुपये ३१४२.८४ लाख इतके नुकसान झाले होते. यापैकी एकट्या निफाड तालुक्यामध्ये रुपये १४०२.०५ लाखांचे नुकसान झाले होते. तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम उपलब्ध करून देण्यासंदर्भात शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. यामध्ये जिल्ह्यासाठी ३१४२.८४ लाख रुपये इतके अनुदान उपलब्ध करून देण्यात आले असल्याचे माहिती आमदार बनकर यांनी सांगितले.

नुकसानभरपाईची रक्कम मिळावी यासाठी नाशिक विभागाचे तत्कालीन विभागीय आयुक्त राजाराम माने, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे तसेच उपआयुक्त दिलीप स्वामी यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. त्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री छगन भुजबळ तसेच मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोर राजे निंबाळकर तसेच महसूल, कृषी व ग्रामविकास विभागाच्या सर्वच अधिकारी वर्गाचे आमदार दिलीपराव बनकर यांनी आभार व्यक्त केले.

प्रचलित नियमानुसार शेती बहुवार्षिक फळपिकाच्या नुकसानीकरिता मदत ते ३३ टक्के अथवा नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना देण्यात येईल. संबंधित बाधितांच्या बँक खात्यात मदतीची रक्कम थेट जमा होणार आहे. नुकसान भरपाई आपल्या खात्यामध्ये जमा झाली किंवा नाही याची सर्व शेतकऱ्यांनी खात्री करुन घ्यावी. - दिलीप बनकर, आमदार निफाड

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com