Agriculture news in Marathi Clear the way for land acquisition of Boramani Airport | Page 2 ||| Agrowon

बोरामणी विमानतळाच्या  भूसंपादनाचा मार्ग मोकळा

टीम अॅग्रोवन
बुधवार, 23 जून 2021

सोलापुरातील बहुचर्चित बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळाची संपादन प्रक्रिया अद्यापही सुरू आहे. परंतु आता धावपट्टीसाठी आवश्यक असलेल्या जमिनीची संपादन प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

सोलापूर ः सोलापुरातील बहुचर्चित बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळाची संपादन प्रक्रिया अद्यापही सुरू आहे. परंतु आता धावपट्टीसाठी आवश्यक असलेल्या जमिनीची संपादन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आतापर्यंत विमानतळासाठी ५७४ हेक्टर जमिनीचे संपादन करण्यात आले आहे. तिसऱ्या टप्प्यात खासगी वाटाघाटीनुसार २९ हेक्टरपैकी २४ हेक्टरची संपादन प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. उर्वरित ४ हेक्टरचे संपादन अंतिम टप्प्यात असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयांकडून सांगण्यात आले. 

संयुक्त पुरोगामी आघाडी सरकाच्या काळात बोरामणी येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ मंजूर झाले. त्यासाठी दोन टप्प्यांत जमिनीचे संपादनही करण्यात आले. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी व भारतीय विमानतळ प्राधिकरण यांच्यात करार होऊनही विमानतळ उभारणीसाठी मुहूर्त मिळाला नाही. धावपट्टीसाठी आवश्यक असलेल्या जमिनीचे संपादन न केल्याने २९ हेक्टर जमिनीचे संपादन करण्याचे आदेश देण्यात आले. २०२० मध्ये शासनाने ५० कोटी रुपये मंजूर केले. २९ हेक्टरपैकी २५ हेक्टरची संपादन प्रक्रिया पूर्ण झाली. उर्वरित ४ हेक्टर न्यायालयीन प्रक्रियेत असल्याने त्याचेही संपादन लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.


इतर बातम्या
सत्तावीस कीडनाशकांच्या बंदीविषयी अहवाल...पुणे ः केंद्रीय कृषी मंत्रालयाने मागील वर्षी...
पंतप्रधान आवास योजनेसाठी ११ लाख नावे...नगर ः ग्रामीण भागातील गरीब, अल्पभूधारक, घर...
राज्यात 'शेतमाल तारणा'तून २७ कोटी...पुणे ः कृषी पणन मंडळाद्वारे बाजार समित्यांद्वारा...
राज्यात आज हलक्या सरींची शक्यता पुणे : राज्याच्या अनेक भागांत पावसाने उघडीप दिली...
पशुचिकित्सा व्यवसायींचा राज्यभर बेमुदत...नगर : पशुचिकित्सा व्यवसायी (डिप्लोमा, पदविकाधारक...
अमरावती : निकृष्ट बियाणेप्रकरणी भरपाईचे...अमरावती ः निकृष्ट बियाण्यासंदर्भाने तालुकास्तरीय...
ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये सर्वसाधारण पावसाची...पुणे : हवामान विभागाने ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याचा...
पीकविमाधारकांना मिळणार २५ टक्के तात्काळ...पुणेः राज्यात प्रतिकूल परिस्थितीमुळे खरीप...
खोटे बोलण्यासाठी नाही, प्रामाणिक...भिलवडी, जि. सांगली : ‘‘मी तत्काळ मदतीबाबत विचार...
सात-बारासह फेरफारही मिळणार आता ऑनलाइन...पुणे : शेती संबंधीच्या दस्ताऐवजांची संगणकीकृत...
सांगली : पूरबाधितांच्या पंचनाम्यांचा...सांगली : महापुरानंतर आता नुकसानीचे पंचनामे सुरू...
अतिवृष्टीने नुकसान; ३४ हजारांवर अर्जअकोला : गेल्या महिन्यात जिल्ह्यात तीन दिवस...
जमीन अधिग्रहणाला विरोध; आळेफाट्यावर...आळेफाटा, जि. पुणे : पुणे-नाशिक हायस्पीड...
नगरमध्ये मिळाला पीकविमा; श्रेयासाठी...नगर : अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर गेल्या...
पदविकाधारकांना खासगी पशुवैद्यकीय...अकोला : दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन व पशुसंवर्धन...
राळेगावमध्ये कपाशीवर बोंडअळीचा...राळेगाव, जि. यवतमाळ : जिल्ह्याचे मुख्य पीक...
परभणीत ४४६ कोटी ५९ लाख रुपये वितरणपरभणी ः चालू आर्थिक वर्षात (२०२१-२२) जुलै...
अनेक नोंदणीधारक शेतकरी ज्वारी...भालेर, जि. नंदुरबार ः जिल्ह्यात शुक्रवार (ता. ३०...
डाळ व्यापाऱ्याची चार कोटींनी फसवणूक नागपूर : डाळ व्यापाऱ्याला आमिष दाखवून साखरेच्या...
महसूली प्रकरणांचा निपटारा तीन टप्प्यांत...नाशिक : सेवाहक्कांतर्गत १००पेक्षा अधिक व राज्यात...